उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ स्पष्टीकरण
श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
संत रामदास म्हणतात, श्रोत्यांनो म्हणजेच माझे हे विचार ऐकणाऱ्या लोकांनो ! आज मी तुम्हाला उत्तम माणूस किंवा गुणवान माणूस कोणाला म्हणायचे ? या विषयी माहिती सांगणार आहे . अशा उत्तम माणसाचे गुण सांगणार आह. ही माहिती सांगत असताना गुणवान किंवा उत्तम ज्याला म्हणायचे त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आणि जर ते गुण त्या व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती गुणवान आहे. गुणवान व्यक्तिची ही लक्षणे ऐकून नक्कीच यातून तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल. अशी आशा संत रामदास या पहिल्या ओवीतून व्यक्त करतात.
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये । पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
उत्तम माणसाची लक्षणे सांगत असताना किंवा उत्तमलक्षण भावार्थ पाहत असताना संत रामदास, उत्तम माणसाचे पहिले लक्षण सांगतात की अशी व्यक्ती की तिच्च्यविषयी पहिला गुण सांगतात उत्तम माणसाने कुठेही जात असताना आपण ज्या रस्त्याने किंवा मार्गावरती जात आहोत तो मार्ग कुठे जात आहे ? त्या मार्गामध्ये काही संभाव्य अडचणी तर नाहीत ना ? याची चौकशी करणे गरजेचे आहे. आपल्या हातामध्ये जर एखादे अनोळखी फळ म्हणजे या आधी आपण ते कधी खाले नाही का तर ते ओळखीचे नाही. फळ खण्या अगोदर त्या फळाची माहिती जाणून घ्यावी.
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
आपल्याला जर कोणी आर्जव म्हणजे विनंती केली किंवा मदत मागितली तर त्या विनंतीचा मान राखावा. त्या विनंतीची अवहेलना होणार नाही.याची दक्षता घ्यावी.आपल्यावरती जीवन जगत असताना कितीही वाईट प्रसंग आले तरी पापद्रव्य म्हणजे वाईट मार्गाने पैसा कमवू नये. पैसा हा नेहमी विधायक मार्गाने आणि घाम गाळूनच मिळालेला असावा.असे संत रामदास सांगतात.आपण जर एकादा चांगला मार्ग पकडला असेल.म्हणजेच पुण्याचा मार्ग पकडला असेल म्हणजेच सदमार्ग पकडला असेल .तर तो सदमार्ग कदापी सोडू नये म्हणजे कधी सोडू नये.खरोखर उत्तमलक्षण कवितेचा भावार्थ आजही आपल्याला उपयोगी पडणारा आहे.
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये । संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
संत रामदास उत्तम माणसाचे गुण सांगत असताना एका गुणा विषयी ते म्हणतात, जी व्यक्ती तोंडाळ म्हणजे भांडखोर असते ती सतत कोणाशी ना कोणाशी भांडत असते.अशा व्यक्तीच्या नादाला कदापि लागू नये. आणि त्याच बरोबर हे नुसती बडबड करणारे वाचाळ वीर असतात अशा वाचाळ बडबड्या लोकांशी देखील वाद करत बसू नये. कारण असे केल्याने त्यांच्याबरोबर आपली देखील किंमत कमी होत असते. खरोखर उत्तमलक्षण कवितेचे स्पष्टीकरण खूप जीवणोपयोगी आहे.
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये । शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
आळसामध्ये कधीही सुख मानू नये.आळस हा माणसाचा नेहमी घातच करत असतो,त्यामुळे त्या आळसामध्ये जरी आनंद वाटत असला तरी तो आनंद हा विघातक आहे. म्हणूनच आळसात सुख मानू नका.असा सल्ला संत रामदास देतात. काही लोकांना चुगली करणे म्हणजे चहाडी करणे एखाद्या च्या पाठीमागे बोलणे ही घाणेरडी सवय असते ही सवय तात्काळ सोडावी. आणि कायम संतसंघ किंवा संतांची संगत म्हणजे चांगल्या लोकांची संगत कधीच सोडू नये.
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये । पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
संत रामदास उत्तमलक्षण कवितेत उत्तम माणसाची लक्षणे सांगताना एका ओवीत म्हणतात,जर एखाद्या सभेमध्ये तुम्ही उपस्थित असाल तर त्या वेळी आपले विचार मांडायला हवेत. कारण त्यांच्या मते सभा हे बोलण्याचे ठिकाण आहे. हेच उत्तम माणसाचे लक्षण आहे. काही लोक सभेमध्ये म्हणजे ज्याठिकाणी बोलण्याची संधी आहे. अशा ठिकाणी बोलत नाहीत आणि नको त्या ठिकाणी बाष्कळ पणे म्हणजेच गैरलागू बोलत असतात. अशा लोकांना संत रामदास उत्तम माणसाची लक्षणे सांगताना कानपिचक्या देताना दिसतात. अनेक व्यक्तींना पैजा लावण्याची किंवा शर्यती लावण्याची सवय असते.संत रामदास म्हणतात काही झाली तरी कोणाशी पैज किंवा होड लावू नये.कारण का तर ही पैज एखाद्याच्या जीवावर तीदेखील बेतू शकते.
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये । परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
जीवन जगत असताना कधीकधी आपल्याला कोणाची ना कोणाची मदत ही घ्यावीच लागते. ही घेतलेली मदत म्हणजे एक प्रकारचा उपकारच असतो.आपण जर कधी कुणाचा उपकार घेतला तर त्या व्यक्तीने आपल्यावरती केलेले उपकार विसरू नका.त्या उपकारांची परतफेड करा. त्यांनी आपल्याला मदत केली असेल तर आपण देखील त्यांना मदत करा. परपीडा म्हणजे कधीही जीवनामध्ये दुसऱ्याला त्रास देऊ नका.सर्वात महत्वाचे म्हणजे कधी कोणाचा विश्वास तोडू नका.म्हणजेच विश्वासघात करू नका खरोखरच संत रामदासांचे त्याकाळचे विचार आजच्या काळात देखील तंतोतंत लागू होतात.
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये । आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
उत्तम माणसाची लक्षणे सांगताना संत रामदास सांगतात, व्यापकपण म्हणजेच आपल्या मनाकडे असलेला मोठेपणा होय. तो कधीच कमी होऊ द्यायचा नाही. तो मनाचा मोठेपणा कायम वाढायलाच हवा. जीवन जगत असताना स्वावलंबी बना कधीही पराधेन म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आपण दुसऱ्याचा भार बनेल असे राहू नका. थोडक्यात काय तर जीवनात यशस्वी व्हा.असे संत रामदास यांना म्हणायचे आहे.
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।
संत रामदास म्हणतात, सत्याचा मार्ग म्हणजे जीवन जगत असताना सापडलेला सुयोग्य मार्ग. काहीही झाले तरी देखील आपला सत्याचा मार्ग सोडू नये.आपण जगत असताना खोटेपणाचा आधार घेत असू तर त्या खोटेपणाचा राग यायला हवा. पण अनेकांना तो खोटेपणा स्वाभिमानाची बाब वाटते. अशा लोकांना संत रामदास म्हणतात, असत्याचा म्हणजेच खोटेपणाचा कधीही अभिमान करू नका. कारण खोटेपणा हा सर्वात मोठा दुर्गुण आहे.
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची ।।१०।।
काही लोक समाजामध्ये वागत असताना त्यांचे चुकीचे वागणे पाहून लोक त्यांच्यावर टीका करत असतात. एक प्रकारे समाजामध्ये त्यांची अपकीर्ती झालेली असते. परंतु त्या अपकीर्तीला देखील काही लोक गौरवाची बाब मानत असतात.परंतु ही उत्तम माणसाचे लक्षण नाही. तर माणसाने नेहमी आपली सत्किर्ती वाढेल.असेच वागायला हवे आणि कायम विवेकाची म्हणजेच सारासार विचार यांची कास धरून चांगला मार्ग स्वीकारावा.
स्वाध्याय
कृती १ . आकृत्या पूर्ण करा.
(अ) संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
[१] अपकीर्ती टाळावी .
[२] सत्कीर्ती वाढवावी .
[३] सत्याची वाट धरावी .
(आ) कधीही करू नयेत अशा गोष्टी
[१] पुण्यमार्ग सोडू नये .
[२] सत्याची वाट धरावी .
[३] कुणावरही आपले ओझे लादू नये .
[४] असत्याचा अभिमान बाळगू नये.
(इ) तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
गुण
[१] जिद्द , चिकाटी व आत्मविश्वास .
[२] गरजूंना मदत करणे .
[३] इतरांविषयी वाईट न बोलणे.
दोष
[१] बहिण - भावंडांसोबत मत्सर
[२] कुणावरही लवकर विश्वास ठेवणे .
[३] कधीकधी आळस येतो .
कृती २ . खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
(अ) तोंडाळ - तोंडाळांची भांडू नये.
(आ) संत - संत संघ खंडू नये .
कृती ३ . खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी दक्षता
[१] आळस - आळसात सुख मानू नये , आळस सोडून द्यावा.
[२] परपीडा - दुसऱ्याला कधीही त्रास देऊ नये .
[३] सत्यमार्ग - सत्याचा मार्ग सोडू नये .
कृती ४ . काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा. ‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’
उत्तर : आशयसौंदर्य : उत्तमलक्षण ' या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत . त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे .
काव्यसौंदर्य : समाजात वावरताना व्यक्तीने कोणते Java करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात - लोकांचे मन मोडू नये . लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये , उलट जनभावनांचा आदर करावा तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये अशी संपत्ती हे पापाचे धन असते . म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे . पुण्यमार्ग आचरावा . कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये .
भाषिक वैशिष्ट्ये : वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे . ' तोडू नये , जोडू नये , सोडू नये ' अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे . ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे . पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो .
(आ) ‘सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर : ' उत्तमलक्षण ' या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत . त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे . मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे . माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो . समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे , हे सांगताना संत रामदास म्हणतात - सभेमध्ये वावरताना , आपले मत मांडताना कधीही लाजू नये . स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे . परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये . निरर्थक असे वक्तव्य करू नये . बाष्कळपणे बोलू नये . उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे .
(इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर : ' उत्तमलक्षण ' या ओव्यांमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे . आळस ' हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे . आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात आळसे कार्यभाग नासतो ! ' या समर्थ उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे . माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात , त्यात ' आळस ' हा एक विकार आहे . दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये . आळसामुळे लगती खुंटते .भविष्य अंधारते . आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो . आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही . म्हणून आळसात सुख मानू नये , समाधान मानू नये , असे समर्थ रामदास सांगतात .


