प्र. १. अ) साखळी पूर्ण करा
१) परिसंस्था ही ............ आणि अजैविक घटकांनी
बनलेली आहे.
अ) जैविक घटक ब) प्राणी
क) मानव ड) वनस्पती
२) सॅव्हाना या शब्दाचा मूळ अर्थ ........... आहे.
अ) वृक्ष असलेली भूमी ब) विस्तृत बारमाही गवताळ प्रदेश
क) पुष्पभूमी ड) वृक्षहिन गवताळ भूमी
३) आफ्रिकेमध्ये उष्ण कटिबंधीय सदाहरित वने प्रामुख्याने
........... येथे सापडतात.
अ) ॲमेझॉन खोरे ब) सहारा वाळवंट
क) कांगो खोरे ड) सॅव्हाना
४) भूमध्य सागरीय वनांना .......... असेही म्हटले जाते.
अ) कठीण लाकूड असलेली वने ब) चॅपरेल
क) मानवनिर्मित ड) मऊ लाकूड असलेली वने
प्र. २. अ) पुढील विधाने दिलेल्या सुचनेनुसार पूर्ण करा/लिहा:
१) पुढील जीवसंहतींचा विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे असा
क्रम लावा.
अ) टुंड्रा ब) विषुववृत्तीय वर्षावने
क) बोरियल वने ड) वाळवंट
उत्तर →
ब) विषुववृत्तीय वर्षावने
ड) वाळवंट
क) बोरियल वने
अ) टुंड्रा
प्र. २. ब) पुढील पैकी अयोग्य घटक ओळखा :
१) उष्ण कटिबंधीय वर्षावनांमधील वृक्ष
अ) महोगनी ब) एबनी
क) पाईन ड) रोजवूड
२) समशीतोष्ण गवताळ प्रदेश व त्यांचे स्थान
अ) प्रेअरी - उत्तर अमेरिका ब) स्टेप्स् - युरेशिया
क) डाऊन्स - आफ्रिका ड) पपास् - दक्षिण अमेरिका
३) जगातील प्रमुख उष्ण वाळवंट
अ) गोबी - आशिया ब) कलहरी – आफ्रिका
क) अटाकामा – दक्षिण अमेरिका ई) अरेबियन – आफ्रिका
प्र. ३) भौगोलिक कारणे लिहा :
१) वर्षावनातील वृक्षांची पाने रुंद असतात, तर तैगा
वनातील वृक्षांची पाने टोकदार असतात.
उत्तर → वर्षावने व तैगावने येथील वृक्षांच्या ठेवणीवर स्थानिक हवामानाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. वर्षावने ही विषुववृत्तीय प्रदेशात आहेत. तेथे अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडे उंच वाढतात व पाने रुंद असतात.
याउलट, तैगावनात तीव्र हिवाळे व हिमवृष्टीचा कालखंडही असतो. झाडांवर हिम साचू नये म्हणून येथील झाडांची पाने मेणचट व टोकदार असतात, जेणेकरून त्यांवर पडलेला बर्फ/हिम लगेच खाली ओघळून घसरून पडावा.
२) वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात.
उत्तर → वाळवंटी जीवसंहतीमध्ये खुरटी, कमी उंचीची झुडपे असतात. त्या झुडपांची खोडे हीच पाने म्हणून काम करतात व प्रकाश-संश्लेषण क्रियाही करतात. वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असते व झाडा-झुडपांना आपल्यातील पाण्याचे संवर्धन करणे क्रमप्राप्त होते. म्हणूनच या झाडा-झुडपांची खोडे-पाने खूप जाड असतात, जेणेकरून बाष्पीभवनामुळे त्यांच्यातील पाणी संपणार नाही. इतर झाडांच्या पानांना रंध्रे असतात व त्यांतून पाणी उत्सर्जित होत असते. मात्र, वाळवंटातील झाडांच्या पानांच्या रंध्रांच्या जागा टणक /कडक व टोकदार काट्यांच्या स्वरूपात विकसित होतात, जेणेकरून बष्पोत्सर्जन रोखले जाते व त्यामुळे झाडे दीर्घकाळ जगू शकतात; म्हणून वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात.
३) तैगा जीवसंहतीत लाकूडतोड व्यवसायाचा विकास
झालेला आहे.
उत्तर → तैगावने केवळ उत्तर गोलार्धात ५०० ते ६५० उत्तर अक्षवृत्तांदरम्यान आढळतात. एकाच प्रकारच्या सूचिपर्णी वृक्षांची वने हे या वनांचे वैशिष्ट्य आहे. या प्रदेशातील हवामान हे अतिथंड असल्याने इतर व्यवसायांच्या विकासावर नैसर्गिक मर्यादाच आहेत. मात्र, त्या तुलनेत मऊ व हलके लाकूड पुरवणाऱ्या विपुल वनसंपदेमुळे लाकडाचा लगदा, प्लायवुड व कागदनिर्मिती करणाऱ्या गिरण्या यांमुळे वनआधारित उदयोगांना चालना मिळते; म्हणूनच तैगा जीवसंहतीत लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे.
४) भूमध्य सागरीय जीवसंहती चित्रपट निर्मिती व्यवसायास
प्रेरक ठरली आहेत.
उत्तर → दोन्ही गोलार्धांत ३०⁰ ते ४०⁰ अक्षवृत्तांदरम्यान भूमध्य सागरी जीवसंहतीचे प्रदेश आढळतात. उबदार उन्हाळे, सौम्य हिवाळे, , अतिशय आल्हाददायक हवामान आणि विविधांगी फळ-फूल झाडांचे वनक्षेत्र, त्यामुळे सुंदर निसर्गसौंदर्य अशी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये या जीवसंहतीत आढळतात. त्यामुळे पर्याटनाबरोबरच चित्रपटनिर्मिती व्यवसायाची भरभराट या प्रदेशात झालेली दिसून येते.
प्र. ४) टीपा लिहा :
१) समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ जीवसंहतीमधील शेती
व्यवसाय
उत्तर → दक्षिण व उत्तर गोलार्धात ४० अंश अक्षवृत्त पलीकडील समशीतोष्ण प्रदेशात गवताळ प्रदेश आढळतात. सर्वसाधारण उन्हाळा व शित हिवाळे ही या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळ वार्षिक तापमान कक्षा जास्त असते. पावसाचे वार्षिक प्रमाण साधारणतः ५० सेमी असते. मात्र या प्रदेशातील मृदा अत्यंत सुपीक असून त्यात सेंद्रिय घटकांचे प्रमाणही जास्त असते. सुपीक मृदा यामुळे बहुतेक गवताळ प्रदेशांवर कृषी व्यवसाय विस्तारत असून काही प्रदेशांत पशुपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर केला जातो. पोषक जीवसंहती मुळे येथील मानवी जीवन सुखकर असुन आधुनिक पद्धतीने शेती व पशुपालन व्यवसाय केले जातात. हे प्रदेश गहू, मका, माऊस, दूध उत्पादने, लोकर यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात व हे या उत्पादनांचे प्रमुख निर्यात करणारे देशही आहेत. विस्तृत व्यापारी शेती हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे.
२) टुंड्रा जीवसंहतीमधील मानवी जीवन
उत्तर → उत्तर गोलार्धात ६५⁰ ते ९०⁰ अक्षवृत्तांदरम्यान टुंड्रा जीवसंहती आढळते. दीर्घकाळ अतिशीत हिवाळे, अल्पकालीन अतिशय सौम्य उन्हाळे यांमुळे येथील पर्यावरणीय व हवामान परिस्थिती खूपच प्रतिकूल आहे. येथे मानवी वस्ती खूपच तुरळक असून कॅनडा, ग्रीनलँड, सैबेरिया अशा प्रदेशांत लॅप, सॅमाईड, एस्किमो या जमातींच्या वस्त्या आढळतात. शिकार व मासेमारी हेच व्यवसाय येथे शक्य असून यांचे जीवन अतिशय खडतर आहे. एस्किमो जमातीचा आता पाश्चिमात्यांशी संपर्क आल्यापासून त्यांच्या जीवनास आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. आधुनिक सामग्री मिळाल्याने, आता त्यांच्या शिकार करण्याच्या व मासेमारीच्या तंत्रात , बदल होत आहे. मात्र, त्यामुळेच या जीवसंहतीचा वेगाने नाश सुरू झाला आहे.
३) गवताळ प्रदेशातील प्राण्याचे परिस्थितीतील अनुकूलन
उत्तर → पृथ्वीवरील विविध जीवसंहतींत गवताळ प्रदेशाची जीवसंहती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गवताळ जीवसंहतीत उष्ण कटिबंधीय सॅव्हाना आणि समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशांचा समावेश होतो. हे दोन्ही गवताळ प्रदेश आपल्या वैशिष्ट्यपूर्ण फरकांमुळे वेगळे ठरतात व त्याचाच परिणाम तेथे आढळणाऱ्या प्राण्यांच्या अनुकूलन प्रक्रियेतही दिसून येतो.
सॅव्हाना गवताळ प्रदेशात ३ ते ६ मीटरपर्यंत वाढणारे उंच हत्ती गवत असते. साहजिकच छोट्या, कमी उंचीच्या गवतापासून उंच वाढणाऱ्या गवतावर उपजीविका करणारे विविध लहानमोठे तृणभक्षी प्राणी येथे अधिवास करतात. त्यात छोट्या सशापासून महाकाय हत्ती, गेंडा व उंच जिराफापर्यंतच्या विविध तृणभक्षी प्राण्यांचा समावेश होतो. यांपैकी अनेक प्राणी हे खूर असणारे, काटक व वेगाने पळू शकणारे प्राणी आहेत. त्याचप्रमाणे ऋतूप्रमाणे गवताच्या रंगात होणाऱ्या बदलाप्रमाणेही येथे विविध प्राणी आढळतात. बहुतांश तृणभक्षी प्राणी हे गवताप्रमाणे पिवळ्या, तपकिरी रंगसंगतीला अनुकूल अशाच रंगाचे आढळतात. विविध तृणभक्षी प्राण्यांच्या मोठ्या संख्येमुळे येथे मांजरवर्गातील असंख्य मांसभक्षी प्राणी व गिधाडासारखे पक्षीही आहेत.
समशीतोष्ण कटिबंधातील गवत हे प्रामुख्याने आखूड, मऊ व लुसलुशीत असते. या प्रदेशांत असंख्य चराऊ कुरणेच आहेत. त्यामुळे हरीण, काळवीट, गवा, घोडा, कांगारू, गाय, म्हैस, लांडगा, जंगली कुत्रा हे प्राणी येथे आढळतात.
४) सागरीय जीवसंहती
उत्तर → भूपृष्ठाप्रमाणे जलपृष्ठावरही वैविध्यपूर्ण जीवसंहती आढळते. जलीय जीवसंहतीत गोड्या पाण्यातील, खाडीतील, दलदलीतील व सागरी प्रदेशाच्या खाऱ्या पाण्यातील जीवसंहतीदेखील आढळते.
सागरी जीवसंहतीत खोलीनुसार २०० मी खोलीपर्यंतचा वरचा स्तर, १००० मी खोलीपर्यंतचा मधला स्तर, १००० ते ४००० मी खोलीपर्यंतचा खोल स्तर व ४००० मी खोलीपलीकडील अतिखोल स्तराचा समावेश होतो.
जसजशी खोली वाढत जाते तसतसे मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होत जाते; मात्र अंधार व पाण्याचा प्रचंड दाब वाढत जातो. त्याचा परिणाम तेथे आढळणाऱ्या सजीव सृष्टीवर पडतो.
२०० मीटर खोलीपर्यंतच्या वरच्या थरात मासे, सागरी कासव, व सील व विविध प्रकारची प्रवाळ व प्लवके आढळतात. २०० ते १००० मीटर खोलीवर सूर्यप्रकाश अत्यल्प असतो. तेथे कोणतीही वनस्पती आढळत नाही. मात्र, कॅटलफिश, बुल्फफिश, ईल, समुद्री घोडा हे जलचर आढळतात. १००० ते ४००० मीटर खोलीचा हा पूर्णतः अंधारमय स्तर असन येथे थंड व गडद अंधारी पर्यावरणात माकळी, जेलफिश, हॅचेट असे जलचर दिसून येतात. ४००० मी पलीकडील अतिखोल जलस्तरात पाण्याचा दाब अतिप्रचंड असून केवळ अवशेषांवर जगणारे जलचरच येथे आढळतात.
प्र. ५) फरक स्पष्ट करा :
१) जीवसंहती आणि परिसंस्था
जीवसंहती | परिसंस्था |
१) एकाच हवामान प्रदेशातील असंख्य परिसंस्थांच्या एकत्रित , एकसंध व्यवस्थेस व | १) एका विशिष्ठ प्रदेशातील जैविक व अजैविक घटकांतील परस्परावलंबित्व म्हणजे परिसंस्था होय. |
२) जीवसंहती ही व्यापक संकल्पना आहे. | २) परिसंस्था ही जीवसंहतीचा मूळ घटक आहे. |
३) जीवसंहती ही विस्तृत क्षेत्राशी निघडीत असते व ती त्या हवामान प्रदेशातील जैवविविधता | ३) परिसंस्था ही केवळ स्थानिक पर्यावरणीय घटकांशी निगडीत असते. परिसंस्थेत पोषण |
४) जीवसंहती ही एकसंध रचना असते. | ४) परिसंस्था ही स्वतंत्र रचना असते. |
२) उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ
जीवसंहती
उष्ण कटिबंधीय | समशीतोष्ण कटिबंधीय |
१) | १) |
२) | २) |
३) | ३) शेती क्षेत्राचे कुरणांवर अतिक्रमण अतिचराई या समस्या असून संयुक्त संस्थाने, अर्जेंटिना, रशिया इत्यादि प्रमुख देश आढळून येतात. |
३) वर्षावनातील व मोसमी जीवसंहतीतील मानवी व्यवसाय
वर्षावने जीवसंहतीतील मानवी व्यवसाय | मोसमी जीवसंहतीतील मानवी व्यवसाय |
१) | १) |
२) | २) |
३) | ३) काही निवडक भागांत आदिम जमाती, एकंदरीत शेती आधारित सुखकर जीवन, विविध व्यवसायांचे पर्याय उपलब्ध आहेत. |
प्र. ६) सविस्तर उत्तरे लिहा :
१) ओसाड वाळवंटी जीवसंहतीबद्दल खालील
मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण लिहा.
अ) स्थान आ) वनस्पती जीवन
इ) प्राणिजीवन ई) मानवी जीवन
उत्तर →(अ) स्थान : दोन्ही गोलार्धांत २०० ते ३०० अक्षवृत्तांदरम्यान ओसाड वाळवंटी जीवसंहती आढळते. ही जीवसंहती खंडाच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेशात दिसून येते. उष्ण हवामान व पूर्वीय वाऱ्यांमुळे हा भाग ओसाड असतो.
(ब) वनस्पती जीवन : अतिशय जास्त तापमान, कमी पर्जन्य यांमुळे येथे अत्यंत विरळ व तुरळक वनस्पती आढळते. प्रामुख्याने काटेरी, निवडुंगासारख्या खोडाच्या व जाड पानाच्या वनस्पती येथे आढळतात. पाण्याच्या संवर्धनासाठी व बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी करण्यासाठी पानांच्या रंध्रांच्या जागी काटे येतात. त्याव्यतिरिक्त येथे शेरी, घायपात, घाणेरी व तुरळक स्वरूपात खजूर, बाभूळ ही झुडपे दिसून येतात.
(क) प्राणी जीवन : वनस्पतींच्या अभावामुळे येथे विविधांगी व मोठे प्राणी आढळत नाहीत. मात्र बिळात राहणारे छोटे प्राणी येथे खूप असतात. पाल, साप, विंचू, उंदीर, मुंगूस, शेळी, मेंढी, गाढव व उंट हे प्राणी व शहामृग, घुबड, गरूड, ससाणा, गिधाड हे पक्षी व भुंगे, पतंग, वाळवी हे कीटक येथे वास्तव्यास असतात.
(ड) मानवी जीवन : वाळवंटी भागात मानवी जीवन खूप खडतर असते. वस्ती केवळ पाणवठ्याजवळ, अन्यथा भटकी जीवनशैली. पशुपालन व अगदी तुरळक शेती हेच व्यवसाय आढळतात. अन्य कोणत्याही संसाधनाचा अभाव, जीवन अधिकच खडतर करते. मात्र काही प्रदेशांत खनिजांच्या उत्खननामुळे आर्थिक स्तर उंचावत आहे.
२) तुम्ही राहत असलेल्या क्षेत्राजवळ निर्वनीकरण का
होत आहे आणि ते थांबवण्यासाठी तुम्ही कोणत्या
उपाययोजना सुचवाल?
उत्तर → निर्वनीकरणाची प्रक्रिया आज सर्वत्रच व खूप वेगाने होत आहे. निर्वनीकरणाची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत
(१) कृषी क्षेत्राचे वाढते (२) शहरीकरण मार्गांचा विस्तार (३) औदयोगिकीकरण प्रमाण (४) वाहतूक (५) धरणांसारखे बहुउद्देशीय प्रकल्प (६) साधनसंपत्ती व लाकडासाठी वनतोड (७) वणवे (८) वृक्षांवर पडणारे रोग (९) वाळवंटीकरण (१०) नैसर्गिक आपत्ती.
निर्वनीकरण थांबवण्यासाठी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील :
(१) वृक्ष लागवड (२) ओसाड, मोकळ्या जमिनींवर वनीकरण (३) वनतोडीवर बंदी (४) जनजागृती (५) पर्यायी साधनसंपत्तीचा (६) वनांत निवडक क्षेत्रात आलटून-पालटून वनतोड वापर (६) वनांत (७) वणव्यांवर नियंत्रण (८) रोगांवर नियंत्रण.


