७. हिंदी महासागर - तळरचना आणि सामरिक महत्त्व

Ranjit Shinde


७. हिंदी महासागर - तळरचना आणि सामरिक महत्त्व | Hind Mahasagar Tal Rachana Swadhyay | 11th Geography Swadhyay


प्र.१ ) साखळी पूर्ण करा.
 





































१)
पॅसिफिक



अटलांटिक
महासागर



हिंदी



२)
छागोस



मालदीव



लक्षद्वीप



३)
अश्मोर



क्रिसमस



कोकोस



४)
होर्मुझ



मलाक्का



बाब-एल-मान्देब




प्र. २) भौगोलिक कारणे लिहा 

१) हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरीय भागात क्षारता कमी आहे. 

कारण : १) महासागरामध्ये असणाऱ्या क्षाराच्या प्रमाणास क्षारता असे म्हणतात. क्षारत दरहजारी मोजली जाते. 
२) सर्वसाधारण सर्व सागरांची सरासरी क्षारता ही ३५ दरहजारी इतकी आहे. हिंदी महासागराची क्षारत इतकीच आहे. 
३) हिंदी महासागराचाच एक भाग असलेल्या बंगालचा उपसागर बंदिस्त आहे. त्यामुळे सागरी प्रवाहांचा फारसा प्रभाव येथे पडत नाही. त्यामुळे तेथील आकाश नेहमी ढगाळ असते. 
४) गंगा, पद्मा, ब्रह्मपुत्र, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नदयांचा विसर्ग बंगालच्या उपसागरात होतो. त्यामुळे गोडया पाण्याचा पुरवठा होतो. या विविध कारणांमुळे हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागरीय भागात क्षारता कमी आहे. 

२) हिंदी महासागराचा पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. 

कारण : १) हिंदी महासागराच्या पूर्व भागातील सागरतळ हा भारत-ऑस्ट्रेलिया (इंडो- ऑस्ट्रेलिया) आणि पॅसिफिक भूपट्टांच्या सीमेवर आहे. 
२) जेव्हा दोन भूपट्टांच्या सीमा एकमेकांना धडकतात तेव्हा मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते व भूपृष्ठाला हादरे बसून भूकंप होतो. 
३) भारत-ऑस्ट्रेलिया भूपट्ट व पॅसिफिक भूपट्ट वारंवार एकमेकांवर धडकतात. या दोन भूपट्टांच्या हालचालींमुळे येथे सतत लहान मोठे भूकंप होतच असतात. म्हणून हिंदी महासागराचा पूर्व भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. 

३) दक्षिण हिंदी महासागरात ग्‍वायरची (चक्राकार प्रवाह) निर्मिती होते. 

कारण : १) तापमान, क्षारता, घनता, पृथ्वीचे परिवलन आणि वारे यांमुळे सागर प्रवाह निर्माण होतात. हे प्रवाह प्रामुख्याने विषुववृत्तावर व्यापारी वाऱ्याच्या प्रभावाखाली असल्याने ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात. 
२) पुढे हे प्रवाह प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन प्रश्चिमेकडून उत्तरेकडे व दक्षिणेकडे किना-याजवळ वाहतात. पुढे हे प्रवाह प्रतिव्यापरी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन पश्चिमेकडून पूर्वेकडून वाहत असतात. 
३) पुढे पूर्वेकडील खंडांना हे प्रवाह अडल्यावर ते पुन्हा किनाऱ्याजवळ उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे वाहून आपल्या मूळ प्रवाहास मिळतात. अशाप्रकारे हा चक्राकार आकृतिबंध पूर्ण होतो. 

४) उत्‍तर हिंदी महासागराच्या विषुववृत्‍तीय भागात मान्सूनपूर्वकाळात तापमान उच्च असते. 

कारण : १) मान्सून पूर्व काळात जेव्हा उन्हाळ्यातील अयन दिन जवळ येत असतो. 
२) तेव्हा हिंदी महासागराच्या उत्तर भागात संपूर्ण भारतीय उपखंडाच्या द्वीपकल्पीय भागात सूर्यकिरणे लंबरूप असल्याने सर्वाधिक सौरतापही मिळतो. 
३) या काळात दिनमानही मोठे व रात्रीचा कालावधी लहान असल्याने सर्वाधिक वेळ सौरताप मिळतो. या सर्व कारणांमुळे उत्तर हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागात मान्सूनपूर्व काळात तापमान उच्च असते. 

प्र.३) टिपा लिहा : 

१) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील भूखंडमंचाची रुंदी 

उत्तर → अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचे उत्तरेकडील विभाग आहेत. या दोन ठिकाणी भूखंडमंच म्हणजे समुद्रबुड जमिनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळतात. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील म्हणजेच अरबी समुद्रातील भूखंडमंच विस्तीर्ण आहे. या तुलनेने भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील, म्हणजे बंगालच्या उपसागरातील समुद्रबुड जमीन, भूखंडमंचाची रुंदी कमी आहे. म्हणजेच मात्र गंगा नदीने आपल्या मुखाशी त्रिभूज प्रदेश निर्माण केल्याने तेथे तुलनेने रुंद भूखंडमंच आढळतो. 

२) हिंदी महासागरातील खनिज संसाधने 

उत्तर → खनिजतेल हे या महासागराच्या तळाखालून मिळणारे सर्वाधिक महत्त्वाचे संसाधन आहे. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांच्या किनाऱ्यांच्या अपतट भागात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे मोठे साठे असावेत असा अंदाज आहे. हिंदी महासागरातून मिळणारे दुसरे महत्त्वाचे खनिज संसाधन म्हणजे मँगनीज खडे याचबरोबर निकेल, तांबे, कोबाल्ट खनिजाचे स्रोत आढळतात. याशिवाय इल्मेनाइट, कथिल, टिटॅनियम, फॉस्फराइट, मोनॉसाइट, झिकॉन आणि क्रोमाइट ही खनिजे सागरी किनार्याजवळील वालुकामय भागात मोठ्या प्रमाणात आढळतात. 

३) हिंदी महासागरातील सागरी प्रवाह 

उत्तर → सागरी प्रवाहांचे सर्वसाधारण चक्र हे उत्तर गोलार्धात घडयाळाच्या काटयांच्या दिशेने, तर दक्षिण गोलार्धात ते घडयाळयाच्या काटयांच्या विरूद्ध दिशेने असते. मात्र हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांवर नियतकालिक मोसमी वा-यांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. उन्हाळयात काटयांच्या दिशेने वाहतात आणि तांबडा समुद्र, अरेबियाचा अग्नेय किनारा, भारतीय किनारा, श्रीलंकेला वळसा घालून बंगालचा उपसागर या मार्गाने जाऊन चक्र पूर्ण होते. हिवाळयात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे हा प्रवाह पूर्णतः विरूद्ध दिशेने वाहतो. या प्रवाहाची सुरुवात बंगालच्या उपसागरात होते आणि श्रीलंकेला वळसा घालून भारताची पश्चिम किनारपट्टी, पाकिस्तान, अरेबिया यांना अडून दक्षिणेकडे वळतो. 

४) हिंदी महासागरातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची उपलब्‍धता 

उत्तर → हिंदी महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे सापडतात. त्यामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचाही समावेश होतो. तसेच हिंदी महासागरामधून याची वाहतूकही केली जाते. जगातील सागरी क्षेत्रातून होणा-या एकूण खनिज तेल उत्पादनापैकी ४० टक्के खनिज तेलाचे उत्पादन / उत्खनन हिंदी महासागरामधे होते. हिंदी महासागराचा भाग असलेल्या पर्शियन आखातात वसलेल्या सौदी अरेबिया, इराक, इराण, कतार, संयुक्त अरब अमिरात, ओमान, एडनच्या आखाताजवळील येमेन, अरबी समुद्रातील भारताचे मुंबई हाय, पश्चिम ऑष्ट्रेलिया तटीय क्षेत्र हे सर्व प्रदेश खनिज तेलाची व नैसर्गिक वायूंची मुबलक पुरवठा होत असतो. 

प्र. ४) खालील प्रश्नांची सविस्‍तर उत्‍तरे लिहा 

१) व्यापार आणि सागरी मार्गांच्या दृष्‍टीने हिंदी महासागराचे महत्त्व अधोरेखित करा. 

उत्तर → १) पूर्वीच्या काळी ब्रिटिश, डच व पोर्तुगीजांनी मसाल्याचे पदार्थ, रेशीम व इतर आशियाई उत्पादनांचा व्यापार विकसित केला. त्यादृष्टीने त्यांनी हिंदी महासागराच्या किनारी भागात आणि बेटांवर आपल्या वसाहती व व्यापारी बंदरांची स्थापना केली. उदा. मुंबई बंदर 
२) हिंदी महासागराभोवतालच्या देशांची प्रामुख्याने १९५० च्या दशकापासून आर्थिक प्रगती सुरू झाली. परंतु त्यांचा व्यापार त्यांच्यावर पूर्वी ज्या देशांची सत्ता होती त्या देशांशी तसाच चालू राहिला. 
३) या किनारी प्रदेशातील देशांचे आपापसांतील राजकीय संबंध फारसे सलोख्याचे नसल्यामुळे प्रादेशिक व्यापार मर्यादित राहिला. उदा. भारत-पाकिस्तान, भारत-श्रीलंका. 
४) हिंदी महासागराभोवतालचे देश या महासागरी मार्गाने प्रामुख्याने कच्च्या मालाची निर्यात करून निर्मित वस्तूंची आयात करतात. हिंदी महासागर व त्यालगतचे काही देश खनिज तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. 
५) त्यामुळे त्यांच्या खनिजतेलाची वाहतूक व व्यापार या महासागरातूनच चालतो. याशिवाय लोहखनिज दगडी कोळसा, रबर, चहा यांची वाहतूक या महासागरातूनच होते. पश्चिम ऑस्ट्रेलिया, भारत, द. आफ्रिका हे देश जपानकडे लोहखनिजाची निर्यात करतात. तर ऑस्ट्रेलिया हा देश ग्रेट ब्रिटनकडे दगडी कोळशाची निर्यात या मार्गाने करतो. 
६) मुंबई, कोलकाता (भारत), दारेसलाम ( टांझानिया), दरबान (दक्षिण आफ्रिका), पर्थ (ऑस्ट्रेलिया) ही या महासागर किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत. 
७) आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया हे तीन खंड हिंदी महासागराच्या जलवाहतूक मार्गाने जोडले आहेत. हा महासागर आशियातील काही मोठ्या अर्थव्यवस्थांना आधार देतो. 
८) वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय व्यस्त असणाऱ्या होर्मुझ, मलाक्का आणि बाब - एल मान्देब या तीन गजबजलेल्या सामुद्रधुनी या महासागरात आहेत. 

२) हिंदी महासागरातील भारताचे स्‍थान लक्षात घेता त्‍याच्या सामरिक महत्त्वाचे विवेचन करा. 

उत्तर → १) हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताला मध्यवर्ती व सामरिक स्थान प्राप्त झाले आहे. भारताचे आर्थिक, व्यापारी, राजकीय, लष्करी व राजनैतिक हितसंबंध या महासागराशी निगडित आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने या महासागराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
२) हिंदी महासागर हा शांततेचा पट्टा राहवा, महासत्तांच्या सत्तास्पर्धेपासून मुक्त असावा आणि महासागर परिसरातील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत या दृष्टीने नेहमीच भारताचे परराष्ट्रीय धोरण प्रयत्नशील आहे. उदा. प्रादेशिक सहकार्यासाठी इंडियन ओशन रिम असोसिएशन (IOR ARC) बीम्सटेक (BIMSTECK) गंगा मेकॉग को ऑपरेशन इत्यादी. 
३) या महासागरात कोणत्याही एका देशाचे वर्चस्व निर्माण होऊन सत्तासंघर्ष निर्माण होणे भारताच्या हिताचे नाही. त्यामुळेच भारताने मुत्सद्देगिरीने हिंदी महासागर परिसरातील देशांशी सलोख्याचे राजकीय व आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 
४) त्यादृष्टीने भारत या देशांतील खाणकाम, खनिजतेल व नैसर्गिक वायू उत्पादन आणि पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करीत आहे. म्हणूनच 'असियान देशांशी असलेला भारताचा व्यापार आता दुप्पट झाला आहे. 
५) भारतीय बाजारपेठ आग्नेय आशियातील सर्वांत मोठ्या आपातदारांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. नुकताच थायलंड व सिंगापूरशी झालेला मुक्त व्यापार करार या व्यापारास पूरक असेल. 
६) हिंदी महासागरात चाचेगिरीच्या घटना, सशस्त्र दरोडेखोरी, सागरी आतंकवाद यांत सातत्याने वाढ होत आहे. हे सागरीमार्गाच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन या प्रदेशात आपले नाविक सामर्थ्य वाढविले आहे. 
७) भारतीय नाविक दल जगातील सर्वांत मोठ्या नाविक दलांपैकी एक आहे.
८) सेशेल्स, मादागास्कर लक्षद्वीप, मॉरिशस येथे भारताने नाविक तळ उभारले असून मालदीव काढून ही त्यासाठी स्वीकृती मिळविली आहे. 

३) हिंदी महासागराचे खालील मुद्‌द्यांनुसार वर्णन करा 

अ) सागरी गर्ता ब) सागरी मैदान क) सागरी रांगा ड) सागरी प्रवाह 

अ) सागरी गर्ता : (i) सागरी गर्ता हा महासागरातील अति खोल भाग असतो. या महासागराची सरासरी खोली सुमारे ४००० ते ६००० मी आहे.

(ii) हिंदी महासागरात अशा गर्ता इतर महासागराच्या तुलनेने खूपच कमी आहेत. या महासागरातील बहुतांश गर्ता त्यांच्या पूर्व सीमेकडे आहेत. त्या भारत-ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूपट्टांच्या हास सीमेवर आहेत.

(iii) जावा - सुमात्रा बेटांजवळील सुंदा गर्ता सर्वांत खोल गर्ता असून त्याची खोली सुमारे ७४५० मी आहे आणि ओब गर्ता त्याची खोली सुमारे ६८७५ मी आहे. 

(iv) भूपट्ट हालचालींमुळे हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने अति संवेदनशील आहे..

(v) या भागात २००४ मध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे अति विनाशकारी त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. भारताच्या किनारपट्टीलाही त्यांचा तडाखा बसला होता.


(ब) सागरी मैदान : (i) सागरतळावरील खोलवर असलेल्या सपाट भागास महासागरीय खोरी किंवा सागरी मैदान असे म्हणतात. जागतिक स्तरावर सर्वच महासागरांचा महासागरीय खोरे असा उल्लेख केला जातो. 

(ii) खंडीय भागातून आणलेल्या व सागरी भागात निर्माण झालेल्या अवसादाच्या संचयनासाठी ही खोरी अखेरची स्थाने असतात.

(iii) हिंदी महासागरात दहा प्रमुख खोरी आहेत. यात उत्तरेकडून दक्षिणकडे क्रमानुसार ओमान, अरेबियन, सोमाली, मुस्कान, मादागास्कर, मोझाबीक, अगुल्हास, क्रॉंझे मध्य हिंदी महासागरातील हमॉर्टन पूर्व भागातील दक्षिण ऑस्ट्रेलियन.

(iv) हिंदी महासागर मैदानी प्रदेश, गुळगुळीत, दाट निक्षेपयुक्त सपाट मैदानांनी आणि त्यावरील जलमग्न घटक व शिखरांनी युक्त अस आहेत.

(v) या महासागरातील कटकरचनेमुळे सुमारे ३२० ते ९००० किमी रुंदीची सागरी मैदाने निर्माण झाली आहेत. सागरी 'मैदानांची खोली भूपृष्ठापासून सुमारे ५००० मी पेक्षा अधिक आढळते.


(क) सागरी रांगा : (i) सागरतळावरील पर्वतरांगा या सागर तळाच्या विस्तीर्ण खोलगट भागांचे विलगीकरण करणाऱ्या जलमग्न पर्वतरांगा आहेत. हिंदी महासागरातील मध्य महासागरीय रांग ही मध्य हिंदी महासागरीय रांग म्हणून ओळखली जाते.

(ii) सोमाली या दविपकल्पाच्या जवळ गल्फ ऑफ एडनमधून या रांगेची सुरुवात होते. ही पर्वतरांग दक्षिणेकडे मादागास्कर बेटाच्या पूर्वेस दोन शाखेत विभागली जाते.
  • एक शाखा नैऋत्य दिशेला प्रिन्स एडवर्ड बेटापर्यंत पसरली आहे. 
  • दुसरी शाखा आग्नेय दिशेकडे ॲमस्टरडॅम व सेंट पॉल बेटापर्यंत पसरली आहे.
(iii) ही रांग एकसंध नसून ती अनेक ठिकाणी विभंगामुळे खंडित झाली आहे. उदा. ओवेन विभंग, ॲमस्टरडॅम विभंग,

(iv) हिंदी महासागरात भारताच्या पश्चिमेकडे छागोस हे पठार असून ते मध्य हिंदी महासागरीय रांगेपर्यंत आहे. या पठारावर अनेक लहान मोठ्या बेटांचे समूह आहे. उदा. लक्षद्वीप, मालदीव, दिएगो गार्सिया इत्यादी.

(v) पूर्व हिंदी महासागरात म्हणजे बंगालच्या उपसागरात उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेल्या पर्वत रांगेला नव्वद पूर्व रांग असे म्हटले जावे. ही रांग अंदमान बेटाच्या पश्चिमेकडून सुरू होऊन दक्षिणेला  ॲमस्टरडॅम व सेंट पॉल बेटाच्या पूर्वस संपते.


(ड) सागरी प्रवाह : (i) हिंदी महासागरातील पाण्याच्या प्रवाहांचा आकृतिबंध हा पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील आकृतिबंधापेक्षा खूपच वेगळा आहे.

(ii) मान्सून वाऱ्यांचा प्रभाव उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहांवर स्पष्ट दिसून येतो. हे प्रवाह किनाऱ्याला अनुसरून वाहतात.

(iii) उन्हाळ्यात त्यांची दिशा घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे तर हिवाळ्यात ती घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने असते.

(iv) दक्षिण हिंदी महासागरातील प्रवाहप्रणाली चक्रीय प्रवाह आकृतिबंध तयार करते. या चक्रीय आकृतिबंधाचे दोन प्रवाह आहेत. 
  • दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह: पूर्वीय वान्यांच्या प्रभावाखाली हा प्रवाह पूर्व-पश्चिम वाहतो. 
  • पश्चिम प्रवाह हा पश्चिमी वान्यांच्या प्रभावाखाली असणारा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो.
(v) हा आकृतिबंध चक्राकार असून पश्चिमेकडे मोझांबिक- अगुल्हास प्रवाह व पर्वेकडे पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाहाने पूर्ण होतो.


प्र. ५) जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थाने भरा, नावे द्या व सूची तयार करा 

१) सुंदा गर्ता २) दिएगो गार्सिया ३) नैऋत्य मोसमी वारे  ४) अगुल्हास समुद्रप्रवाह ५) पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह ६) नव्वद पूर्व रांग ७) होर्मुझची सामुद्रधुनी ८) चाबहार बंदर