स्वाध्याय
प्र. १) साखळी पूर्ण करा .
| खडक प्रकार | खडकाचे नाव | कार्य करणाऱ्या मुख्य विदारणाचा प्रकार |
|---|---|---|
| १) अग्निजन्य खडक | १) डोलोमाईट | १) कायिक विदारण |
| २) स्तरित खडक | २) पाटीचा दगड | २) रासायनिक विदारण |
| ३) रुपांतरित खडक | ३) बेसॉल्ट | |
| ४) चुनखडक | ||
| ५) ग्रॅनाईट |
उत्तर -
| खडक प्रकार | खडकाचे नाव | कार्य करणाऱ्या मुख्य विदारणाचा प्रकार |
|---|---|---|
| १) अग्निजन्य खडक | ३) बेसॉल्ट | १) कायिक विदारण |
| २) स्तरित खडक | १) पाटीचा दगडडोलोमाईट | २) रासायनिक विदारण |
| ३) रुपांतरित खडक | २) पाटीचा दगड | १) कायिक विदारण |
| ४) अग्निजन्य खडक | ३) बेसॉल्ट | २) रासायनिक विदारण |
| ५) अग्निजन्य खडक | ५) ग्रॅनाईट | २) रासायनिक विदारण |
| ६) स्तरित खडक | ४) चुनखडक | २) रासायनिक विदारण |
प्र. २) अचूक सहसंबंध ओळखा :
A : विधान, R : कारण
१) A : जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसर ही नेहमी होते.
R : विस्तृत झीजेचे प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर
अवलंबून असतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक
स्पष्टीकरण नाही.
२) A : गुरुत्व बल हा विस्तृत झीज प्रक्रियेवर परिणाम करणारा महत्त्वाचा कारक आहे.
R : गुरुत्व बलामुळे सर्वच गोष्टी भूपृष्ठावर येतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक
स्पष्टीकरण नाही.
३) A : गोठण आणि वितळण विदारण हे वाळवंटी प्रदेशात
नेहमी घडते.
R : खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक
तुटतात.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक
स्पष्टीकरण नाही.
४) A : पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेस साहाय्य करते.
R : भूजलपातळी ही त्यास कारणीभूत असते.
अ) केवळ A बरोबर आहे.
आ) केवळ R बरोबर आहे.
इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक
स्पष्टीकरण आहे.
ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक
स्पष्टीकरण नाही.
प्र. ३) अचूक गट ओळखा :
अ) १) सममित वल
२) समनतिक वली
३) उलथलेली वली
४) आडवा विभंग
ब) १) ब्लॅक फॉरेस्ट
२) व्हॉसजेस
३) हिमालय
४) सातपुडा
क) १) नर्मदा दरी
२) आफ्रिकेची दर
३) तापी दरी
४) ऱ्हाईन दरई
ड) १) ज्वालामुखीय काहील
२) विवर सरोवर
३) खंगारक शंकू
४) लाव्हा पठार
उत्तर - गट (क)
प्र. ४) भौगोलिक कारणे लिहा :
१) तापमान हा कणीय विदारणाचा मुख्य कारक आहे.
कारण - शुष्क कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाण्याच्या उपलब्धते अभावी तापमानातील बदलामुळे विदारण प्रक्रिया घडून येते . उष्ण वाळवंटी प्रदेशात दिवसा प्रचंड तापमान रात्री प्रचंड थंडी यामुळे दैनिक तापमान कक्षा खूप जास्त आढळते . दिवसा खडक प्रचंड उष्णतेमुळे खूप तापतात मात्र खडकातील वेगवेगली खनिजे तापमानाला वेगळा प्रतिसाद देतात परिणामी खडकातील खनिजे वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात परिणामी खडकातील वेगवेगळ्या खनिजांच्या कणांमध्ये ताण निर्माण होतो व सततच्या आकुंचन व प्रसरणामुळे खडकातील खनिज कण सुटे होतात.
२) मानव हा विदारणाचा एक कारक आहे.
कारण - ( १ )मानवामुळे नैसर्गिक विदारणाच्या प्रक्रियेचा वेग वाढतो . मानवाच्या आर्थिक क्रिया उदा . कृषी , लाकूडतोड , रस्ते- धरणे - तलाव निर्मिती , खाणकाम , भूसुरुंग क्रियांमध्ये होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विदारणाचा वेग वाढतो
( २ ) जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून हवेत नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड इ . प्रदूषके हवेत मिसळतात . हवेतील उष्णता व आर्द्रता यांच्या संयुक्त परिणामातून त्यांची आम्ले तयार होतात . त्यांचा परिणाम खडकांवर होऊन फुटतात . उदा . चुनखडक व संगमरवर यांच्या पासून बनलेल्या वास्तूंवरही अशा आम्लांचा मोठा दुष्परिणाम दिसत आहे . उदा . ग्रीसमधील पार्थेनॉन , भारतातील ताजमहल , इजिप्तमधील स्फिंक्स यांचे नुकसान झाले आहे .
३) उतार हा विस्तृत झीजेतील मुख्य घटक आहे.
कारण - ( १ )विस्तृत झीजेच्या घटना ह्या केवळ डोंगराळ , पर्वतीय , पठारी व तीव्र उताराच्या भागातच वेगाने घडतात तर मंद उतारावर हा वेग खूपच कमी असतो .
( २ ) उताराचा भूपृष्ठाशी होणारा कोन जसजसा वाढत जातो तसतसा ह्या प्रक्रियेचा वेगही वाढत जातो . तसेच उंची जास्त असल्यास वेग वाढतो . उदा . सह्याद्रीचा पश्चिम उतार पूर्व उतारा पेक्षा खूपच तीव्र आहे . परिणामी पश्चिम उतारावर विस्तृत झिजेचा वेग जास्त आहे .
४) भस्मीकरणामुळे खडकाचा आकार आणि रंग बदलतो.
कारण - (१) खडकातील काही खनिजांचा वातावरण किंवा पाण्यातील ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन त्यांची ऑक्साईड तयार होतात या क्रियेला ऑक्सिडीकरण किंवा भस्मिकरण असेही म्हणतात.
(२) भस्मीकरणानंतर खडकांचा कठीणपणा कमी होतो आकारमान वाढते आणि त्यांचा रंग बदलतो . लोह व ॲल्युमिनियम युक्त खडक अशाप्रकारेच विदारित होतात .
(३) लोहयुक्त खडकांचा रंग तांबडा होतो ज्याला गंजणे असे म्हणतात तर ॲल्युमिनियम युक्त खडक पिवळ्या रंगाचे होतात .
५) सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत झीजेचा प्रभाव पूर्व
उतारापेक्षा जास्त असेल.
कारण - 1 ) विस्तृत झीजेच्या घटना ह्या केवळ डोंगराळ , पर्वतीय , पठारी व तीव्र उताराच्या भागातच वेगाने घडतात तर मंद उतारावर हा वेग खूपच कमी असतो .
२ ) उताराचा भूपृष्ठाशी होणारा कोन जसजसा वाढत जातो तसतसा ह्या प्रक्रियेचा वेगही वाढत जातो . तसेच उंची जास्त असल्यास वेग वाढतो .
३ ) सह्याद्रीचा पश्चिम उतार पूर्व उतारा पेक्षा खूपच तीव्र आहे . शिवाय पश्चिम उतारावर पडणारा पाऊस खूपच जास्त असल्यामुळे पश्चिमेकडे विस्तृत झीज जास्त वेगाने घडून येते .
प्र. ५) टीपा लिहा :
१) गुरुत्व बल आणि मातलोट
उत्तर - i ) पृथ्वीवर प्रत्येक पदार्थावर गुरुत्व बल कार्य करते . या बलाच्या प्रभावामुळे पृथ्वी सर्व पदार्थांना आपल्या केंद्राकडे खेचते .
ii ) अल्पाईन - हिमाच्छादित प्रदेशात मातलोट ही विस्तृत झीजेचा प्रकार घडतो .
iii ) जेव्हा उपहिमनदीच्या क्षेत्रांमध्ये डोंगरावरून मृदा अतिशय संथ गतीने सरकते यालाच मातलोट असे म्हणतात .
iv ) पाणी गोठलेल्या स्थितीत असते या स्थितीमध्ये बर्फ गुरुत्व बलामुळे पुढे सरकते त्याबरोबर खडकांच्या वरच्या थरातील माती व अवसाद उतारावरून खाली घसरत येऊन संचयीत होते.
v ) या क्रियेला हजारो वर्षांचा काळ लागतो येथील मातीचा पुढे जाण्याचा वेग अतिशय कमी म्हणजे वर्षाला काही मिमी किंवा सेमी एवढाच असतो .
२) विस्तृत झीजेतील पाण्याची भूमिका
उत्तर - i ) उतारावरील चिखल दगड - माती यांचे मिश्रण गुरुत्वाकर्षण बलामुळे उतारावरून खाली घसरते यालाच विस्तृत हालचाल किंवा झीज म्हणतात . ही विदारण व वहन याच्या मधील प्रक्रिया आहे .
ii ) पाण्याच्या प्रवाहामुळे विस्तृत झीजेतील पदार्थाचे वहन होत असले तरी पाण्याच्या ह्या कार्याचा समावेश विस्तृत झीजेत केला जात नाही .
iii ) पण ज्यावेळी पाणी उतारावरील खडकांमध्ये मुरते / सामावले जाते तेव्हा ते जलसंपृक्त होतात . त्यांचा भार , वजन वाढते , परिणामी त्यांच्यावर कार्य करणारे गुरुत्वाकर्षण बलही वाढते व त्यामुळे ते उतारावरून खाली घसरतात .
iv ) पाणी मुरल्यामुळे खडकातील कणांचा आकार वाढतो व ते एकमेकांपासून दुरावतात त्यामुळे विस्तृत झीजेस मदत होते .
३) अपपर्णन
उत्तर- i ) खडक आहे त्याच जागी यांत्रिक पद्धतीने फुटतात त्यांचे कण सुटे होतात अथवा त्यांचे अपघटन किंवा विघटन होते याला विदारण म्हणतात .
ii ) खडकांवर वरच्या थरांचा प्रचंड दाब असतो . मात्र ज्यावेळी हे वरचे थर निघून जातात व हे खडक उघडे पडतात त्यावेळी त्यांच्यावरील दाब कमी झाल्यामुळे खडकांचा वरचा काही सेंटीमीटर ते मीटर जाडीचा थर बाहेरच्या बाजूस वरच्या दिशेने प्रसरण पावतो .
iii ) त्यामुळे खडकांना भेगा पडतात . अशाप्रकारे दाब मुक्त झाल्याने खडकांचे होणारे विदारण म्हणजे स्थानभ्रष्ट विदारण असते.
iv ) या प्रक्रियेत खडकांचे वरचे थर कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे खडकापासून वेगळे होतात . याला अपपर्णन असे म्हणतात .
४) विदारण आणि खडकांचा एकजिनसीपणा
उत्तर- i ) खडक हे एकजिनसी असतात . खडक म्हणजे खनिजांची मिश्रणे असतात . म्हणून जोपर्यंत त्यांच्यावर कोणत्याही बाह्य घटकाचा परिणाम होत नाही तोपर्यंत ते एकसंघ असतात
ii ) विदारण प्रक्रियेत काही खडक हे अधिक प्रतिरोधक असतात तर काही खडक कमी प्रमाणात प्रतिरोध करतात . काही खडक कायिक विदारण सहज भंग होऊ शकत नाही तर कायिक विदारणामुळे काही खडक सहज भंग पावतात उदा . क्वॉर्टझाईट .
iii ) शुष्क परिस्थितीत सहजपणे चुनखडकाचे विदारण होत नाही पण आर्द्र प्रदेशात सहजपणे विदारण होते . आर्द्रप्रदेशात आणि निमशुष्क प्रदेशात ग्रॅनाइट खडक सहजरीत्या वितरित होत नाहीत
iv ) भूपृष्ठावरील खडक एकसंघपणे असतात परंतु हवामान , तापमान , पर्जन्य या घटकांमुळे कमकुवत होतात विदरणात त्यांची हालचाल होत नाही ते फक्त ठिसूळ बनतात पण ते जागा बदलत नाहीत खडकांचा पृष्ठभाग विल ग होतो व मूळ खडकाचा आकार बदलतो .
५) कार्बनन
उत्तर - i वातावरणातील कार्बन डाय - ऑक्साइड पावसाच्या पाण्यात अल्प प्रमाणात मिसळून त्यापासून तयार होणारे सौम्य कार्बनिक आम्ल खडकांमधील खनिजांवर अभिक्रिया करते .
ii ) चुनखडकातील कॅल्शियम हा या आम्लामध्ये विद्राव्य असल्यामुळे तो त्यात विरघळतो परिणामी चुनखडकाचे विदारण घडते .
iii ) मृदेतील मृत सजीवांच्या विघटनातून ( कार्बनी पदार्थ ) निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्साइड आणि हवेतील कार्बन डाय - ऑक्साइड खडकांतील खनिजांच्या संपर्कात येऊन त्याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि यातून खनिजांचे विघटन होते उदा . फेल्डस्पार आणि कार्बोनेट सारखी खनिजे यात बळी पडतात .
iv ) चुनखडकावरील कार्बनन प्रक्रियेदरम्यान द्रवीकरण प्रक्रियेतून कॅल्शियम वाहून जातो व त्यामुळे कॅल्शियम आणि कार्बोनेट वेगळे होतात व खडकाचे विदारण याचा अर्थ कार्बनन आणि द्रवीकरण एकाच वेळी घडून येते .
प्र. ६) सुबक आकृत्या काढून नावे द्या :
१) गोठण वितळण विदारण
२) खंड विखंडन
३) जैविक विदारण
प्र. ७) सविस्तर उत्तरे लिहा :
१) कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर - १ ) महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगत सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यालगतचा भाग कोकण म्हणून ओळखला जातो यात ठाणे , मुंबई , सिंधुदुर्ग , रायगड , रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो . या प्रदेशात पावसाळ्यात प्रतिरोध प्रकारचा अतीपाऊस पडतो शिवाय समुद्रकिनारा असल्यामुळे या प्रदेशामध्ये वर्षभर उष्ण व दमट स्वरूपाचे हवामान आढळते . त्यामुळे या प्रदेशात रासायनिक विदारणाचा वेग जास्त असतो .
२ ) खडकातील खनिजांचा वातावरण किंवा पाण्यातील ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन ऑक्साईड्स निर्मिती म्हणजे ऑक्सिडीकरण किंवा भस्मिकरण . ऑक्साईड्समुळे भस्मिकरणानंतर खडकांचा कठीणपणा कमी होतो . आकारमान वाढते आणि त्यांचा रंग बदलतो . लोह व अल्युमिनीयम युक्त खडक अशाप्रकारेच विदारित होतात . लोहयुक्त खडकांचा रंग तांबडा होतो तर अल्युमिनियम युक्त खडक पिवळ्या रंगाचे होतात . त्यामुळेच कोकणात भस्मीकरणामुळे लाल रंगाची मृदा आढळते .
३ ) खडकातील कॅल्शियम , सोडियम , मॅग्नेशियम , पोटॅशियम इत्यादी सारखे क्षार उष्णतेमुळे प्रसरण पावतात परिणामी त्यांच्यातील क्षारांचे कण एकत्र येतात व त्यापासून त्यांचे स्फटिक तयार होतात स्फटिकीभवनाच्या या प्रक्रियेत तयार होणाऱ्या स्फटिकांचा आकार मुळ कणांपेक्षा मोठा असल्यामुळे हे कण खडकापासून वेगळे होतात व तो दुभांगतो .
४ ) कोकणात पावसाळ्यानंतर उन्हाळा ऋतु येतो . ओला आणि कोरडा कालावधी एकामागोमाग येतो . अशा प्रदेशात कायिक व रासायनिक विदारण प्रभावीपणे घडते यांच्या परिणामातून खडकांना मधमाशांच्या पोळ्या प्रमाणे आकार प्राप्त होतो . कोकणातीलं . हरेश्वर , रत्नागिरी येथे असे खडक आढळतात.
५ ) चुनखडकावरील कार्बनन प्रक्रियेदरम्यान द्रवीकरण प्रक्रियेतून कॅल्शियम वाहून जातो व त्यामुळे कॅल्शियम आणि कार्बोनेट वेगळे होतात व खडकाचे विदारण होते याचा अर्थ कार्बनन आणि द्रवीकरण एकाच वेळी घडून येते .
२) हिमालय आणि विस्तृत झीजेचा सहसंबंध स्पष्ट करा. (आवश्यक तेथे उदाहरणे द्या.)
उत्तर- १ ) भारताच्या उत्तर सीमेलगत विस्तृत हिमालय पर्वत रांग पसरली आहे . या पर्वत रांगेतील काही शिखरे 8000 मी पेक्षा जास्त उंचीची आहेत . परिणामी अशा तीव्र उताराच्या भागात उतारावरील खडकांचे विदारीत अवसाद , तीव्र उताराचे कडे बर्फ गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पायथ्याच्या दिशेने घसरतात व पर्वत रांगांच्या पायथ्याशी वर्षानुवर्षे जमा होत राहतात . या प्रक्रियेस विस्तृत झीज असे म्हणतात .
२ ) हिवाळ्यात हिमवृष्टी होते व प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो . हिमाचे थरावर थर साचून उतारावर बर्फाचा जड थर तयार होतो . त्यामुळे उतारावर प्रचंड भार वाढून त्यावर कार्य करणारे गुरुत्वाकर्षण बलही वाढते परिणामी उतारावर हिमाचे मोठमोठे कडे कोसळतात . त्यावेळी उतारावरील माती , खडक अथवा भुभागाचा मोठा भाग उतारावरून खाली कोसळतो अशा भूस्खलनाच्या प्रक्रिया येथे वारंवार घडतात .
३ ) हिवाळ्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यात जेंव्हा बर्फ वितळते त्यावेळी तयार झालेले पाणी खडकांच्या भेगांमधे मुरते . त्यातील कणांचा आकार वाढून वस्तुमानही खूप वाढते त्यांचे कण एकमेकांपासून सुटे होतात व खडक फुटून पायथ्याकडे घसरत जातात . यामध्ये बऱ्याच वेळा मानवी वसाहतींचे मोठे नुकसान होते शिवाय शेतीचेही फार मोठे नुकसान होते . तीव्र उताराच्या प्रदेशात कमी तापमानामुळे मृदेत आर्द्रता पुरेशी असते परिणामी अशा आर्द्र भागावरून विदारीत पदार्थ कमी घर्षणाशिवाय सहज खाली घसरतात .
४) हिमालयाच्या मध्यम उंचीवरील भागात अल्पाइन वनस्पती आढळतात याला उपहिमनदीय प्रदेश असे म्हणतात . या भागात बर्फा बरोबर सुधारित पदार्थ अतिशय सावकाशपणे उताराच्या दिशेने खाली घसरत असतात या प्रक्रियेचा वेग खूप कमी म्हणजे वर्षाला काही मिलीमीटर ते सेंटीमीटर इतकाच असतो . गोठलेल्या जमिनीत पाणी मुरत नाही त्यावर मातीच्या थरांचे संचयन होते आणि खूप कमी घर्षणामुळे ते खाली येतात याला मातलोट असे म्हणतात.
अशाप्रकारे हिमालयातील पर्जन्यवृष्टी हिमवृष्टी येथील विस्तृत झीजेला मदत करताना पहावयास मिळतात.





