प्रश्न १ अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते.
(२) भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामिनाथन होते.
प्रश्न १ ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) इंदिरा गांधी - आणीबाणी
(२) राजीव गांधी विज्ञान - तंत्रज्ञान सुधारणा
(३) पी. व्ही. नरसिंहराव - आर्थिक सुधारणा
(४) चंद्रशेखर - मंडल आयोग
उत्तर :
चुकीची जोडी: चंद्रशेखर - मंडल आयोग
दुरुस्त केलेली योग्य जोडी : चंद्रशेखर -देशाची आर्थिक परिस्थिती बिकट.
प्रश्न २ अ. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा.
प्रश्न २ ब. टीपा लिहा.
(१) जागतिकीकरण : (१) 'जागतिकीकरण' म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. म्हणजेच ‘जागतिक अर्थव्यवस्था' निर्माण करणे होय.
(२) जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली, आर्थिक उदारीकरण घडून आले.
(३) उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.
(४) जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत बदल घडून आले.
(२) घवलक्रांती : (१) स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उदयोजक यांनी आपले योगदान दिले.
(२) डॉ. वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली.
(३) सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्धप्रकल्प विकसित केला गेला.
(४) डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या - देशांत भारताची गणना होऊ लागली. डॉ. कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही 'धवलक्रांती' घडवून आणली.
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले.
उत्तर : (१) आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली.
(२) या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून १९७७ साली सत्ता हस्तगत केली.
(३) मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले.
(४) परंतु, या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा दयावा लागला; त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम २८ महिनेच टिकले.
(२) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
उत्तर : (१) १९८० च्या दशकात पंजाबमध्ये 'खलिस्तान' आंदोलन सुरू झाले.
(२) भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र 'खलिस्तान' राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले.
(३) या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले.
(४) या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
(३) भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.
उत्तर : (१) ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा -हास झाला होता.
(२) दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती.
(३) भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. अनेक उद्योग उभारून, आधुनिकीकरण करून, भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते.
(४) नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती; म्हणून स्वातंत्र्यानंतर १९५० साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) जग आणि भारताच्या इतिहासात १९९९ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ?
उत्तर : १९९१ साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या- (१) सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला.
(२) पी. व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली.
(३) याच काळात रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन पुढील काळात त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले.
(२) भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर : भारताच्या अर्थव्यवस्थेची सुरुवातीपासूनच पुढील उद्दिष्टे राहिली आहेत
(१) अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण.
(२) आर्थिक स्वावलंबन.
(३) सामाजिक न्याय.
(४) समाजवादी रचना.
प्रश्न ५. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.
Bharat : 1960 nantarchya ghadamodi swadhyay iyatta navvi

