८. अर्थशास्त्राशी परिचय

Ranjit Shinde



८. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय | इयत्ता ९ वी भूगोल, | arthashastra chi parichay swadhyay



















प्रश्न १. वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा.



image not fond




उत्तर : वर्तुळातील प्रश्नचिन्हांची उत्तरे पुढील तक्त्यात दिली आहेत.
























(१) भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था
(२) जर्मनी, जपान, अमेरिका चीन, रशिया भारत, स्वीडन व युनायटेड किंग्डम
(३) व्यवस्थापन खासगी व्यक्तीकडे व्यवस्थापन सरकारकडे व्यवस्थापन खासगी व्यक्ती व सरकारकडे
(४) कमाल नफा मिळवणे. समाजकल्याण ( हित ) साधने नफा व समाजकारण यांचा समन्वय









प्रश्न २. स्पष्टीकरण लिहा.

(अ) अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.

उत्तर : (१) उत्पन्न खर्चाचा व ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंबप्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, कारण कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात.

(२) उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात.

(३) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते.. याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यांतून येते. त्यास 'आर्थिक व्यवस्थापन' असे म्हणतात.





(आ) भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.


उत्तर : (१) भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व आहे.

(२) भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उदयोजक व सरकार यांच्यात विभागलेली असते.

(३) खासगी क्षेत्रातील उदयोजक नफाप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते.

(४) अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतात आढळून येतात. म्हणून असे म्हटले जाते की, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.





(इ) अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.

उत्तर : (१) भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. (२) (अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांची मालकी काही देशात खासगी व्यक्तींकडे, तर काही देशात सरकारकडे असते.) तसेच काही देशांत खासगी व सरकारी मालकी एकत्रपणे आढळून येतात.

(३) (काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा असतो, तरी सामाजिक कल्याण साधणे हा काही अर्थव्यवस्थांचा मुख्य असतो) तसेच काही अर्थव्यवस्थांमध्ये नफाप्राप्ती व सामाजिक कल्याण यांचे सहअस्तित्व असते.

(४) अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे वर्गीकरण करण्यात येते.

या अर्थाने जगातील देशांचे, अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार, तीन प्रकार पडतात.





प्रश्न ३. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते ?

उत्तर : व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते.





(आ) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे?

उत्तर : अर्थशास्त्र (Economics) ही संज्ञा OIKONOMIA (ओईकोनोमिया) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.




(इ) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते ?

उत्तर : भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते.




(ई) जागतिकीकरण म्हणजे काय ?

उत्तर : देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे 'जागतिकीकरण' होय.