७. आंतरराष्ट्रीय वाररेषा

Ranjit Shinde





७. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय | इयत्ता ९ वी भूगोल | antarrashtriya var resha swadhyay

















प्रश्न १. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धांतील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा.




image not fond







प्रश्न .२. खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा.

(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखादया व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल ?

(१) पूर्वेकडून पश्चिमेकडे.

(२) पश्चिमेकडून पूर्वेकडे.

(३) दक्षिणेकडून उत्तरेकडे.

(४) उत्तरेकडून दक्षिणेकडे.

उत्तर : पश्चिमेकडून पूर्वेकडे.





(आ) जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील

(१) बुधवार सकाळचे सहा.

(२) बुधवार रात्रीचे नऊ.

(३) गुरुवार दुपारचे दोन.

(४) गुरुवार संध्याकाळचे सहा.

उत्तर : बुधवार रात्रीचे नऊ.




(इ) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो ?


(१) 0⁰

(२) 90⁰ पूर्व

(३) ९० ⁰ पश्चिम

(४) 180 ⁰

उत्तर : 180 ⁰






(ई) पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ?

(१) पूर्व

(२) पश्चिम

(३) उत्तर

(४) दक्षिण

उत्तर : पश्चिम





(उ) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते ?

(१) जी. पी. एस. प्रणाली.

(२) संरक्षण खाते.

(३) वाहतुकीचे वेळापत्रक.

(४) गोलार्ध ठरवण्यासाठी.

उत्तर : वाहतुकीचे वेळापत्रक.







प्रश्न ३. भौगोलिक कारणे लिहा.

(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.

उत्तर : आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून, जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूर दूरच्या देशांतही होत आहे. त्यामुळे या सर्वांत उत्तम समन्वय ठेवण्यासाठी, तारीख व वार यांत प्रवासामुळे होणारा बदलातील गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे.






(आ) पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

उत्तर : भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली,
तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता. हे टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या व १८०° रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो व संपतो. थोडक्यात, पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.




प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत ?

उत्तर : आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते. या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. १८०° रेखावृत्ताची रेषा काही देशांत जमिनीवरूनही जाते. त्यामुळे हीच रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली तर एकाच देशात / प्रदेशात/भूभागात दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ झाला असता.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती रेषा पूर्णतः समुद्रावरून जावी ही प्रमुख बाब विचारात घेतली गेली आहे? त्याचप्रमाणे, एकाच देशाचा बेटांचा समूह हासुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एकाच बाजूस असावा ही बाबही विचारात घेतली गेली आहे.त्यामुळेच १८०° रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना ती रेषा काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे.






(आ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल ?

उत्तर : पूर्वेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली, तर आहे त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख ग्राह्य धरू. , तर पश्चिमेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली आहे त्या वार व तारखेच्या पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू.







(इ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?

उत्तर : आंतरराष्ट्रीय वाररेषा ही १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ 2 असती, तर ती काही भागात जमिनीवरूनही गेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागात रेषेच्या दोन भागात म्हणजे रेषेच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे वा पश्चिमेकडे वळवण्यात आली त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ रेषा नाही.




(ई) आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही ?

उत्तर : आंतरराष्ट्रीय वाररेषा भूभागावरून गेली असती, तर या भूभागातील रेषेच्या पश्चिमेकडे एक वार व तारीख, तर पूर्वेकडे त्याच्या मागची तारीख व वार अशी परिस्थिती उद्भवली असती शिवाय ही रेषा काल्पनिक रेषा असल्याने भूभागावर ती नक्की केव्हा ओलांडली व तेथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हेही समजणे फार कठीण गेले असते.
हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावरून न नेता ती पूर्णपणे समुद्रावरून गेली आहे.




(उ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते ?

उत्तर : काही ठरावीक ठिकाणांचा अपवाद वगळता १८०° रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागरपृष्ठावरून जाते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषासुद्धा सागरावरून आखण्यासाठी १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली गेली.





प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

(अ ) मुंबई - लंडन - न्यूयॉर्क- लॉस एंजिलिस- टोकियो.

(आ ) दिल्ली - कोलकाता- सिंगापूर- मेलबर्न.

( इ ) कोलकाता- हाँगकाँग - टोकियो-सॅनफ्रेंन्सिस्को.

( ई ) चेन्नई - सिंगापूर - टोकियो- सिडनी - सांतियागो.

( उ ) दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क.



image not fond

































मार्ग आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल का ?
(अ ) मुंबई - लंडन - न्यूयॉर्क- लॉस एंजिलिस- टोकियो. होय
(आ ) दिल्ली - कोलकाता- सिंगापूर- मेलबर्न. नाही
( इ ) कोलकाता- हाँगकाँग - टोकियो-सॅनफ्रेंन्सिस्को. होय
( ई ) चेन्नई - सिंगापूर - टोकियो- सिडनी - सांतियागो. होय
( उ ) दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क. नाही