प्र.१ ) साखळी पूर्ण करा .
उत्तर :
| | | |
|---|---|---|
| १) बर्फाचे वितळणे | समुद्रपातळीत वाढ | पूर |
| २) सौरतापाचे परिणाम | अवकाळी पाऊस | आवर्ताच्या संख्येत वाढ |
| ३) हरितगृह वायू | मिथेन | शेती |
| ४) जागतिक हवामान बदल | पृथ्वीवरील सरासरी तापमान | पृथ्वीवरील जीवसृष्टी |
प्र.२) चुकीचा घटक ओळखा :
उत्तर :
१) जागतिक तापमान वाढीची कारणे-
अ) हरितगृह वायूंचे उत्सर्जन
आ) निर्वनीकरण
इ) सूर्याचे भासमान भ्रमण
ई) औद्योगिकरण
प्र.३) भौगोलिक कारणे लिहा
१) हवामान बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे.
कारण : पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. ही वाढ तशीच पुढेही असणार आहे. पृथ्वीच्या तापमानात झालेल्या वाढीमुळे बाष्पाच्या प्रमाणात वाढ आहे. वाढत्या बाष्पाबरोबर हवेची तापमान ग्रहण करण्याची क्षमताही वाढते. ही वाढ चिंताजनक असून हा बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे.
२) भविष्यात मालदीव बेट नकाशातून नाहीसे होण्याची शक्यता आहे.
कारण : पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळत असून हिमनद्या आक्रसत आहेत. बर्फ वितळून त्याचे पाणी समुद्रात वाढत आहे सागराची सरासरी पातळी वाढत असून लक्षद्वीप, मालदीव, मुंबई, केरळ किनारपट्टी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे हा परिणाम तापमान वाढीचाच आहे.
३) हिमरेषा आक्रसत आहे.
कारण : पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या तापमान वाढीमुळे बर्फाच्छादित प्रदेश वितळत आहेत. त्याचे पाणी नदयानाल्यातून समुद्रामध्ये जात आहे. हिमनद्या आक्रसत आहेत. तसेच हिमरेषाही आक्रसत आहेत. हा सर्व परिणाम हवामानात झालेला बदल हा आहे.
४) अवर्षण आणि पुरांच्या वारंवारितेत वाढ होत आहे.
कारण : हवामान बदलामुळे मोसमी वाऱ्यांच्या आगमनात बदल, ऋतूमध्ये होणारा बदल, वृक्षांच्या बहरण्याच्या काळात बदल, पूर तसेच दुष्काळाच्या वारंवारितेतही बदल होत आहेत. हे केवळ भारतीय प्रदेशातच नसून जागतिक स्तरावर झालेले बदल हे हवामान बदलामुळेच होत आहेत. उदा. अतिवृष्टीमुळे आलेले पूर - मुंबई (२००५) केदारनाथ (२०१३), चेन्नई शहर (२०१५) हे बदल हवामान बदलाचे निर्देशक आहेत.
प्र.४ ) टीपा लिहा :
१) प्रवाळभित्तीचे विरंजन : (१) प्रवाळ हे समुद्रात राहणारे सजीव आहेत. प्रवाळ हे चुनखडीचे कवच तयार करतात व त्यात राहतात. ज्यावेळी हे सजीव मरण पावतात त्यावेळी त्यांनी बनविलेल्या चुनखडीच्या कवचाचा आधार घेऊन इतर सजीव वाढतात. प्रवाळांच्या वाढीसाठी तापमान, अक्षवृत्तीय विस्तार, सागराची खोली हे घटक महत्त्वाचे आहेत.
(२) अनुतट प्रवाळ भित्ती, रोधक प्रवाळ भित्ती, कंकणद्वीप प्रवाळ भित्ती असे प्रवाळ भित्तीचे प्रकार आहेत.
(३) या प्रकारांमुळे समुद्रात मंच तयार होतो, खाजण तयार होते, प्रवाळबेटे तयार होतात. या सर्वांचा उपयोग पर्यटन, संरक्षण, विमानतळे याकरिता होतो.
(४) परंतु जेव्हा तापमानात बदल होतो तेव्हा प्रवाळ आपल्या पेशीत राहणाऱ्या शेवाळांना बाहेर काढतात. या शेवाळांमुळेच प्रवाळांना रंग प्राप्त होतो. सागरी तापमानात जर १९ ते २° से. ची वाढ दीर्घकाळ राहिली तर विरंजनाची प्रक्रिया घडते. ज्यामुळे प्रवाळ रंगहीन होतात. जर ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहिल्यास प्रवाळ मृत पावतात. प्रवाळांमध्ये होणाऱ्या या विरंजन प्रक्रियेमुळे प्रवाळ मोठ्या प्रमाणात मृत पावत आहेत. जगातील १५ पेक्षा जास्त प्रवाळकट्टे नष्ट झाले आहेत.
२) आकस्मीक पूर : (१) नदीच्या धारणक्षमतेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर जर पाणी पाणलोट क्षेत्रातून नदीमध्ये आले तर पुराची स्थिती निर्माण होते. पावसाच्या नैसर्गिक पाण्याशिवाय समुद्राचे पाणी नदी पात्रात आतवर खोलपर्यंत शिरते त्यामुळे सुद्धा पुराची स्थिती निर्माण होते.
(२) अतिपर्जन्यवृष्टी होऊन डोंगर भागातील पाणी नदीपात्रात वाहू लागते. हिमाच्छादित प्रदेशात जास्त उष्णतेमुळे बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नदीला पूर येतात.
(३) मुंबईत २६ जुलै २००५ साली झालेला महाप्रलय, केदारनाथ येथे २०१३ साली आलेला महाप्रलय तसेच ऑगस्ट २०१९ साली सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात आलेले पुराचे पाणी ओसरण्यास पाच दिवस लागले.
(४) वाढत्या तापमानामुळे आवतांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे अचानक येणाऱ्या पुरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. व्हेनिस शहरासारख्या किनारी भागांना सुद्धा पुरांच्या समस्येला तोंड दयावे लागत आहे.
३) पुराहवामानशास्त्र अभ्यासण्याची साधने : पृथ्वीच्या प्राचीन हवामानाचा अभ्यास म्हणजेच पूरा हवामानशास्त्र होय. हवामानाचे मापन करण्यासाठी केवळ मागील १४० वर्षांपासूनच उपकरणाचा वापर शास्त्रज्ञ करत आहेत. यापूर्वी ते वृक्ष खोडांवरील वर्तुळे, बर्फाच्छादित प्रदेशातील गाभ्यातील नमुने, प्रवाळ कट्टे आणि सागरी निक्षेप यांचा अभ्यासात सामावेश करत असत.
४) हरितगृह वायू : (१) हरितगृहामुळे साठवून ठेवलेली उष्णता ही वातावरण उबदार राहण्यासाठी उपयुक्त ठरते. थंड हवेच्या प्रदेशात काचेच्या घरांचा वापर वनस्पती वाढवण्यासाठी केला जातो अशा गृहांना हरितगृहे म्हणतात.
(२) वातावरणातील काही वायू ज्यांना हरितगृह वायू म्हटले जाते जसे कार्बन डाय ऑक्साइड, मिथेन, नायट्रेट ऑक्साइड अशाच प्रकारे वातावरणात हरितगृहाच्या काचेचे कार्य करीत असतात.
(३) कार्बन डाय ऑक्साइड हा वायू श्वासावाटे बाहेर टाकला जातो तसेच तो ज्वलनामुळे निर्माण होतो. या वायूचे प्रमाण प्रामुख्याने औदयोगिक क्रांतीनंतरच्या काळात वाढलेले आढळते.
(४) मिथेन हा आणखी एक वायू हरितगृह परिणामास कारणीभूत आहे. मिथेन वायू शेतात व गुरांच्या शेणापासून निर्मित होत असतो. कोळशाच्या खाणी व नैसर्गिक वायू प्रज्वलनामुळेही निर्माण होत असतो. हा वायू दरवर्षी १ टक्क्यांनी वाढत आहे व गेल्या २०० वर्षात १००० पटीने वाढल्याचा अंदाज आहे. नायट्रेट ऑक्साइड हा हरितगृह परिणामात योगदान करणारा तिसरा वायू आहे. हा वायू जीवाश्म इंधनाचे ज्वलन, जैविक कचऱ्याचे ज्वलन व रासायनिक खतांच्या वापरामुळे होतो. याशिवाय दूरदर्शन संचाच्या वापरामुळे, वातानुकूलन यंत्राच्या वापरामुळे, संगीत ऐकताना वाहनांच्या वापरामुळे, कपडे धुण्याच्या यंत्राचा वापर केल्याने हरितगृह वायू निर्माण होतो.
प्र. ५) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) जागतिक हवामानबदल हा नेहमी मानवनिर्मित होता असे नाही. स्पष्ट करा.
उत्तर : जागतिक हवामान बदल हा केवळ मानवनिर्मित असतोच असे नाही. काही नैसर्गिक कारणेही असतात.
(१) सूर्यापासून मिळणारी ऊर्जा समान नसते. कधी कधी सौरऊर्जा कमी प्रमाणात मिळते व हवामान बदल जाणवतो.
(२) अपसूर्य-उपसूर्य स्थिती : मिलन्कोव्हीच सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतराचा परिणाम तापमानावर होतो.
(३) ज्वालामुखी उद्रेक : जेव्हा हे उद्रेक होतात तेव्हा कार्बन डाय ऑक्साईडचे धुळीचे आवरण पृथ्वीभोवती तयार होते. त्या काळात सौरऊर्जा पृथ्वीवर कमी प्रमाणात मिळते.
(४) पृथ्वीही सौरमालेतील एक ग्रह आहे. सूर्याचे आकारमान वाढेल तसतसे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर वाढत जाते. त्यामुळे तापमानात बदल होतो. वरील कारणांशिवाय मानवी कारणे- जैविक इंधन वापर, निर्वनीकरण, उदयोगधंदे यामुळेही हवामानात बदल होतो.
(२) आपल्या शहरातील किंवा गावातील हवामान बदल रोखण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?
उत्तर : हवामानात बदल होत आहे ते शहरातील असो किंवा गावातील असो हा बदल रोखण्यासाठी
(१) जैविक इंधनाचा वापर आणि हवामान बदल याचा संबंध आहे हे संशोधनावरून माहीत झाले आहे.
(२) संयुक्त राष्ट्र परिषदेने रिओ दी जनेरिओ येथे परिषद घेतली.
(३) क्योटो प्रोटोकॉल परिषदेत हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचे मान्य करण्यात आले.
(४) ओझोनच्या संरक्षणासाठी मॉन्ट्रेअल करार १९८७ मध्ये करण्यात आला.
(५) पॅरिस करारानुसार हरितगृह वायूची उत्सर्जन पातळी शुन्यावर राखावी लागणार आहे.
५. जागतिक हवामान बदल
या ठिकाणी आज आपण १. जागतिक हवामान बदल या धड्यावरील स्वाध्याय वरील प्रश्नांची उत्तरे सोडवलेली आहेत या उत्तरांमध्ये काही चूक व टायपिंग मिस्टेक असल्यास कमेंट करून नक्की सांगा. जेणेकरून ती चूक सुधारली जाईल.


