४ . हवामान प्रदेश

Ranjit Shinde




४. हवामान प्रदेश | इयत्ता ९ वी भूगोल | प्रश्न.1 ते प्रश्न.६ | Geography | 4. Havaman Pradesh Swadhyay



















प्र. १) खलील तक्त्यात हवामान प्रदेशांची नावे त्याच्यावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांच्या व वैशिष्टांच्या आधारे लिहा.


 

हवामान प्रदेश 

अक्षवृत्तीय स्थान

वारे 

समुद्रसानिध्य

खंडीय स्थान 

उंची  

(१) विषुववृत्तीय वर्षावने प्रदेश

१०⁰ उ.  ते १०⁰ द. अक्षवृत्ते

व्यापरी वारे 

अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी


विषुववृत्तीय क्षेत्रात सर्वत्र

समुद्रसपाटीपासून उंचापर्यंत सर्वत्रच

(२) मोसमी हवामान प्रदेश

५०⁰  ते ३०⁰ अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात

मोसमी वारे 

अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी महासागर, अरबी,  बंगालचा उपसागर

मध्य अमेरिका, पूर्व आफ्रिका,

आग्नेय आशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया

-

(३) उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश (सॅव्हाना)

१०⁰ ते २०⁰ अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात

पूर्वीय वारे 

अत्यल्प, प्रामुख्याने अंतर्भागात


द. अमेरिका, मध्य आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया

-

(४) उष्ण कटिबंधीय ओसाड प्रदेश

२०⁰ ते ३०⁰ अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात

अधोगामी वारे 

अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी महासागर

खंडांच्या पश्चिम भागात


-

(५) भूमध्य सागरीय हवामान प्रदेश

३०⁰ ते ४०⁰ अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धांत

पाश्चिमी वारे 

भूमध्य समुद्र, पॅसिफिक, हिंदी, अटलांटिक महासागर

खंडांच्या पश्चिमेस



-













प्र.२ ) योग्य पर्याय निवडा.


(१) मोसमी हवामान प्रदेश



उत्तर : (इ) (१) उन्हाळ्यातील तापमान सुमारे ३५⁰ से.

(२) १००० मिमी वार्षिक पर्जन्य

(३) भारतीय द्वीपकल्पाचा खंडांतर्गत भाग

(४) उंच व जाड गवत


(२) उच्च दैनिक तापमान कक्षा असणारा हवामान प्रदेश :


उत्तर : (इ) उष्ण कटिबंधीय ओसाड प्रदेश





(३) उत्तर अमेरिकेतील न्यूफाउंडलँड ते अलास्का या भागात लाकूडतोड कटाईचा व्यवसाय भरभराटीस आला आहे, कारण


उत्तरे : (आ) तैगा हवामान प्रदेश



(४) मोसमी हवामान प्रदेशांच्या आलेखांत पर्जन्यमानाचे महिने वेगवेगळे आहेत याचे मुख्य कारण


उत्तरे : (ई) सूर्याचे भासमान भ्रमण







प्र. ३) भौगोलिक कारणे लिहा :

१) मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो.


कारण : (१) मोसमी हवामानात ऋतूंची स्पष्ट विभागणी दिसते. हे हवामान मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने निर्माण झालेले आहे. जमीन आणि पाणी यांच्या तापण्याच्या आणि थंड होण्याच्या फरकामुळे उन्हाळ्यात जमिनीवर कमी दाबाचा तर सागरावर जास्त दाबाचा पट्टा तयार होतो.

(२) या निर्मितीवर आंतरउष्ण कटिबंधीय अभिसरण क्षेत्राच्या हालचालींचा प्रभाव असतो,

(३) उन्हाळ्यात मोसमी हवामान प्रदेशात उष्ण व आद्र नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतात व भूभागावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो व पावसात ऋतू निर्माण होतो. परंतु हा कालावधी कमी असतो.

(४) सूर्याच्या दक्षिणायनामुळे जमिनीवर जास्त दाब तर समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होऊन वाऱ्याची दिशा ईशान्य नैऋत्य होते व दीर्घ काळ कोरडा ऋतू अनुभवयास मिळतो. म्हणून मोसमी हवामानामध्ये विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो.







२) दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही.



कारण: (१) तैगा हवामान प्रदेश उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात म्हणजे ५५° ते ६५° अक्षवृत्ताच्या दरम्यान आढळते. 'अमेरिका व युरोप खंडाचा भाग येतो.

(२) परंतु दक्षिण गोलार्धात या पट्ट्यात भूभाग नसल्याने दक्षिण या अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये उत्तर गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही.







३) वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.



कारण : (१) वाळवंटी प्रदेश किंवा उच्च कटिबंधीय ओसाड प्रदेश हे उच्च दाबाशी संलग्न आहेत.

(२) त्यामुळे तेथील हवा ही कोरडी असते. तसेच हे प्रदेश महाद्वीपांच्या आंतरखंडीय भागात आढळतात.

(३) त्यामुळे दिवसा तापमान खूप जास्त असते तर रात्री तापमान खूपच कमी असते, त्यामळे वाळवंटी प्रदेशातील तापमान कक्षा खूपच जास्त असते.





४) विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू आढळत नाही.



कारण : (१) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ०⁰ ते १००⁰ अक्षांशापर्यंत विषुववृत्तीय वर्षावने आढळतात. या प्रदेशात भूभागाचे प्रमाण कमी आणि जलभागाचे प्रमाण जास्त आहे.

(२) तसेच वर्षभर तापमान जास्त असल्याने हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण खूपच जास्त असते. वर्षातील बाराही महिने येथे पाऊस पडतो. त्यामुळे उन्हाळा-हिवाळा- पावसाळा असे ऋतू या प्रदेशात आढळत नाहीत.

(३) तापमान कक्षा खूपच कमी असते. वर्षभर हवामानामध्ये फारसा फरक नसल्याने विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू आढळत नाहीत.









५) सॅव्हाना हवामान प्रदेश नेहमी दुष्काळग्रस्त असतो.


कारण: (१) सॅव्हाना हवामान प्रदेश १०° ते २० उत्तर दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. या प्रदेशात वर्षभर तापमान जास्त असते तर हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अतिशय कमी असते.

(२) हा प्रदेश जास्त दाबाच्या प्रदेशात असल्याने येथून दुसरीकडे वारे वाहतात. त्यामुळे पर्जन्याची शक्यता कमी असते.


(३) अधोगामी वान्यांमुळे येथे वर्षभर पर्जन्य छायेची स्थिती राहते म्हणून सॅव्हाना प्रदेश नेहमी दुष्काळग्रस्त असतो.











६) मसुरी व डेहराडून हे एकाच अक्षांशावर असून देखील तेथील हवामानात भिन्नता आहे.





कारण : (१) मसुरी व डेहराडून ही दोन्ही ठिकाणे उत्तराखंडमध्ये एकाच अक्षवृत्तात आहे. दोन्ही ठिकाणे खंडान्तर्गत असून ठिकाणांच्या उंचीमध्ये फरक आहे.

(२) हिमालयाच्या पायथ्याला दरी मध्ये डेहराडून चे स्थान आहे तर मसुरी उंचावर हिमालयरांगामध्ये आहे.तेथे अतिशय थंड हवामान आहे. येथे वाहणारे वारे जोरदार असतात.

(३) मसुरीला थंड हवेच्या ठिकाणांची राणी असे म्हणतात आणि म्हणून या दोन्ही ठिकाणांच्या हवामानात भिन्नता आहे.






प्र. ४) फरक स्पष्ट करा :



१) वर्षावने आणि सॅव्हाना हवामान प्रदेश








































वर्षावने हवामान प्रदेश
टुंड्रा हवामान प्रदेश
(१) विषुववृत्तीय वर्षावने दोन्ही गोलार्धात विषुववृत्तापासून ५⁰ ते १०⁰ अक्षवृत्तापर्यंत आहेत.
(१) संव्हाना हवामान प्रदेशाचा विस्तार दोन्ही गावात ते २०° अक्षवृत्तादरम्यान आहे.
(२) उष्ण व दमट हवामान तसेच वार्षिक पर्जन्याचे प्रमाण २५०० ते ३००० मिमी इतके आहे.
(२) सॅव्हाना हवामान प्रदेशात २५० ते १००० मिमी इतके पर्जन्याचे प्रमाण आहे. हा प्रदेश दुष्काळसदृश्य आहे.
(३) वर्षावनांमध्ये अत्यंत घनदाट वनस्पती असून उंच त्रिस्तरीय कठीण लाकडाचे वृक्ष आहेत. एबनी, महोगनी, रबर यांसारखे वृक्ष.
(३) सॅव्हाना प्रदेशात उंच व जाड गवताचे प्रमाण जास्त आहे. तसेच शेंड्याकडे विस्तारित असणाऱ्या झाडांची संख्या जास्त आहे.
(४) विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, झाडांवर उड्या मारणारे प्राणी, माकड, सिंहासारखे तोंड असणारा तामरीन इत्यादी) विविध प्रकारचे पक्षी (लांडोर उंचावरून उडणारा).
(४) महाकाय शाकाहारी व त्यांच्यावर जगणारे मांसभक्षक प्राणी जास्त प्रमाणात.
(५) शिकार व स्थलांतरित शेती हा प्रमुख व्यवसाय (आदिवासी जमातींचे वास्तव्य).
(५) गुरेचराई व पशुपालन हा प्रमुख व्यवसाय तसेच पर्यटनाचा व्यवसाय विकसित झाला आहे.








२) तैगा आणि टुंड्रा हवामान प्रदेश
















































तैगा हवामान प्रदेशटुंड्रा हवामान प्रदेश
(१) तैगा प्रदेशाचा विस्तार उच्च व मध्य अक्षवृत्ताच्या ५५° ते ६५° च्या दरम्यान आहे.(१) टुंड्रा प्रदेशाचा विस्तार ६५⁰ ते ९०⁰ अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे.
(२) उन्हाळ्यात तापमान सुमारे १५⁰ ते २००⁰ से पर्यंत असते, हिवाळ्यात ते ०⁰ से पेक्षा खाली जाते.(२) उन्हाळ्यात तापमान सुमारे १०° से. पर्यंत असते तर हिवाळ्यात २०⁰ ते ३०⁰ से. पर्यंत असते.
(३) तैगा प्रदेश खंडातर्गत भागात आहेत. (३) टुंड्रा प्रदेशाचा समुद्र सान्निध्य लाभलेले आहे.
(४) या प्रदेशात केसाळ प्राणी आढळतात.(४) सीत, वॉलरस या प्रकारचे मासे तसेच ध्रुवीय अस्वल हे प्राणी महत्त्वाचे आहेत.
(५) या प्रदेशात सूचीपर्णी वृक्ष आढळतात.(५ )उन्हाळ्यात विविध प्रकारची फुलझाडे वाढतात.
(६) शिकार व लाकूडतोड हा या प्रदेशातील प्रमुख व्यवसाय आहे.(६ )मासेमारी हा येथील प्रमुख व्यवसाय आहे.






३) मोसमी आणि भूमध्यसागरीय हवामान प्रदेश















































मोसमी हवामान प्रदेश
भूमध्यसागरीय हवामान प्रदेश
(१) साधारणपणे विषुववृत्त ते उत्तरेला कर्कवृत्त तसेच दक्षिणेला मकरवृत्ताच्या आसपासचा प्रदेश यात येतो.
(१) साधारणपणे ३०⁰ ते ४०° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हा प्रदेश आहे.
(२) उन्हाळ्यात तापमान सुमारे २७° ते ३२⁰ से. व हिवाळ्यातील तापमान सुमारे १५° ते २४° से. पर्यंत असते.
(२) उन्हाळ्यातील तापमान २१° ते २७° से. पर्यंत असते. तसेच हिवाळ्यातील तापमान १०⁰ ते १४⁰ पर्यंत असते.
(३) पर्जन्य या प्रदेशात सरासरी पर्जन्य २५० मिमी ते २५०० मिमी पर्यंत असते.
(३) या प्रदेशात सरासरी पर्जन्य ५०० मिमी ते १००० मिमी पर्यंत असते.
(४) ऋतू विभागणी मान्सून प्रदेशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अशी स्पष्ट ऋतू आहेत. पाऊस वर्षभर पडत असतो. ऋतूंची विभागणी होते.
(४) उन्हाळा व हिवाळा हे प्रमुख ऋतू आहेत. पाऊस वर्षभर पडत असतो.
(५) सदाहरित, पानझडी व पर्जन्यछायेच्या प्रदेशात झुडपी व काटेरी वने आढळतात.
(५) उच्च अक्षवृत्तावर सूचीपर्णी वने तसेच झुडपी वने आढळतात.
(६) शेती व पशुपालन हा प्रमुख व्यवसाय या प्रदेशात आहे. (६) विविध प्रकारची फुले व फळे यांचे उत्पादन तसेच पर्यटन व्यवसाय विकसित.









प्र. ५) सविस्तर उत्तरे लिहा


१) एखाद्या ठिकाणच्या हवामानावर अक्षवृत्ताच्या स्थानाचा काय परिणाम होतो ते सोदाहरण स्पष्ट करा.




उत्तर : (१) अक्षवृत्त हा सर्वात जास्त हवामानावर परिणाम करणारा घटक आहे. कमी अंशीय अक्षवृत्तावर तापमान जास्त असते. उंच अंशीय अक्षवृत्तावर तापमान कमी असते.

(२) ०° ते २३ १/२° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यानचा पट्टा हा उष्ण कटिबंधीय पट्टा म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात सूर्यकिरणे लंबरूप पडतात. विषुववृत्तीय प्रदेशात आर्द्रता अधिक असल्याचे दिसून येते व येथे वर्षभर पाऊस पडतो. कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या भागात ज्या प्रदेशांना समुद्र सान्निध्य लाभलेले आहे अशा प्रदेशात उष्ण व दमट हवामान असते. खंडातर्गत प्रदेशात उष्ण व कोरड्या स्वरूपाचे हवामान असते याचा अर्थ सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्यामुळे हा कटिबंध उष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो.

(३) २३ १/२° उत्तर ते ६६ १/२° उत्तर व २३ १/२° दक्षिण ते ६६ १/२° दक्षिण या दरम्यानच्या पट्ट्यात सूर्यकिरणे तिरपी पडतात. (साधारणपणे ३०° उत्तर व दक्षिणच्या पलिकडे) त्यामुळे या प्रदेशाला समशीतोष्ण हवामान प्रदेश असे म्हणतात. या प्रदेशात तापमान कमी असल्याचे दिसून येते.

(४) ६६ १/२° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या पुढे तापमान खूपच कमी होत जाते. सूर्यकिरणे खूपच तिरपी पडतात. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही खूप कमी असतो. सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन या काळात ९० उत्तर व ९०° दक्षिण येथे दिवसाचा कालावधी व रात्रीचा कालावधी यात फार मोठा फरक असल्याचे दिसू

(५) अक्षांशानुसार विचार केल्यास ते २३ १/२° उत्तर व दक्षिण भागात अनुक्रमे विषुववृत्तीय प्रदेश, मोसमी हवामान प्रदेश, उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश (सॅव्हाना) तसेच कमी अधिक प्रमाणांत उष्ण कटिबंधीय ओसाड प्रदेश किंवा शुष्क हवामान प्रदेश आढळतात. या हवामान प्रदेशाला निम्न अक्षवृत्तीय हवामान प्रदेश म्हणतात.

(६) ६६ १/२° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यानचा भाग समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो.भूमध्यसागरीय चीनी प्रकार किंवा आर्द्र उपोष्ण कटिबंधीय हवामान प्रदेश, समद्री पश्चिम युरोपियन प्रकारचे हवामान या भागात दिसून येते. या प्रदेशाला मध्य अक्षवृत्तीय प्रदेश असे म्हणतात.

(७) या प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात त्यामुळे हवामान आल्हाददायक असते. या भागात पर्यटन व्यवसाय सर्वात जास्त विकसित झालेला आहे. साधारणपणे ६६ १/२° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या पुढे तापमान कमी होत जाते. त्यामुळे हवामानातदेखील बदल होतो. यात तैगा किंवा उप आर्क्टिक हवामान प्रदेश टुंड्रा हवामान प्रदेश, बर्फाच्छादित प्रदेश व पर्वतीय प्रदेशांचा समावेश होतो. या भागात वर्षातील जास्तीत जास्त काळ (उच्च अक्षवृत्तीय प्रदेश वगळता) तापमान गोठण बिंदूच्या खाली असते.

(८) उन्हाळ्यात दिवसाचा कालावधी जास्त असूनसुद्धा हवामान थंडच असते, तैगा प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय विकसित झालेला आहे. टुंड्रा हवामान प्रदेशात शिकार व मासेमारी व्यवसाय केले जातात.

(९) अंटाक्टिकासारख्या भागात शास्त्रीय शोध मोहिमा राबवल्या जातात. निम्म्र अक्षवृत्तीय पर्वतीय प्रदेशात अती उंचीवर हिमवृष्टी होते. तर धृवीय भागात समुद्रसपाटीलगत हिमवृष्टी होताना दिसते.

(१०) याचा अर्थ अक्षवृत्ताच्या स्थानाचा हवामानावर परिणाम होतो.








२) एखादया ठिकाणच्या हवामानावर वाऱ्याचा काय परिणाम होतो.






उत्तर : (१) 'वातावरणामध्ये तापमानातील बदलांमुळे वायुभारामध्ये बदल निर्माण होऊन वारे निर्माण होतात. वायुभारात कमी भाराकड जास्त भाराकडून क्षितीज समांतर हालचाल सुरू होते. त्या हालचालीचा वेग वाढतो. वातावरणाची गतीमान स्थिती म्हणजेच वारा होय.'


(२) वायुभार उतार, कोरो ऑलिस शक्ती, घर्षण, केंद्रोत्सारी शक्ती हे घटक वान्याची दिशा आणि वेग / गती यांवर नियंत्रण ठेवतात.


(३) ग्रहीय वारे, नियतकालिक वारे, अनियतकालिक किंवा अनियमित वारे व स्थानिक वारे असे वाऱ्यांचे प्रकार आहेत.

(४) ग्रहीय वारे हे व्यापारी वारे, प्रती व्यापारी वारे, ध्रुवीय वारे किंवा पूर्वीय वारे या स्वरूपात वाहतात. पृथ्वीच्या विषुववृत्तीय भागात कमी भार निर्माण झालेला असतो. त्यावेळी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात २५° ते ३५° अक्षवृत्ताच्या दरम्यान अधिक वायुभाराचा पट्टा निर्माण झालेला असतो. याच व्यापारी वान्यांच्या प्रदेशात मान्सून वाऱ्यांची निर्मिती होते व ते वारे बाष्पयुक्त असतात. याचाच अर्थ सागर व भूमी यांचे तापणे आणि थंड होणे या भिन्न गुणधर्मामुळे मान्सून वाऱ्यांची निर्मिती होते.


(५) पश्चिमी व्यापारी वारे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात प्रतिव्यापारी वारे ३५° ते ४०° तसेच ६० ते ६५° या अक्षवृत्तादरम्यान वाहतात. प्रती व्यापारी वारे उबदार प्रदेशाकडून शीत प्रदेशाकडे वाहतात. सागरावरून भूपृष्ठावर जाताना भूपृष्ठाच्या पश्चिम भागात हे वारे वर्षभर पाऊस देतात याचा अर्थ हे वारे उबदार असल्याने ३५° ते ४०° उत्तर व दक्षिण गोलार्धात तसेच ६० ते ६५° उत्तर व दक्षिण भागात हवामान उबदार ठेवतात.

(६) ७०° ते ८०" अक्षवृत्ताच्या दरम्यान धृवीय वारे वाहतात. धृवीय वारे अत्यंत थंड असून त्यांचा वेग सुद्धा जास्त असतो. हे वारे टुंड्रा प्रदेशातून वाहत असल्यामुळे ते कोरडे आणि अतिशय थंड असतात. उत्तर धृवीय पेक्षा दक ध्रुवीय वारे नियमित असतात.

(७) याचा अर्थ वारे त्यांच्या उत्पत्ती क्षेत्रातील तापमान वैशिष्ट्यांचे वहन करतात. त्यामुळे उष्ण प्रदेशातील वारे तापमान वाढवतात तर थंड प्रदेशाकडून येणारे वारे शीत लहरी निर्माण करतात. हिवाळ्यात हिमालयाकडून येणारे थंड व बोचरे वारे दख्खन पठारावरील वातावरणाचे तापमान कमी करतात.

(८) भारतात जून महिन्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा आगमनाबरोबर तापमानात झपाट्याने घट होते. कारण हे वारे बाष्पयुक्त असल्याने त्यांच्यापासून पर्जन्यवृष्टी होते. त्याचप्रमाणे खारे वारे व मतलई वारे यांचा सुद्धा प्रभाव हवामानावर पडत असतो.

(९) खारे वारे दिवसभराच्या कालावधीत वाहतात तर मतलई वारे रात्रीच्या वेळेस जमीनीवरून समुद्राकडे वाहतात.

(१०) एकूणच वान्यांचा फार मोठा प्रभाव हवामानावर पडत असल्याचे दिसून येते.


















३) चिलीपेक्षा रशिया हा देश क्षेत्रफळाने मोठा असूनही तेथे हवामानातील विविधता पहावयास मिळत नाही.






उत्तर : (अ) अक्षांश : (१) विषुववृत्तावर सूर्य डोक्यावर असताना लंबरूप किरणांमुळे उष्णतामान तापमान जास्त असते. याचा अर्थ सर्वसाधारणपणे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या द्रम्यान हवा उष्ण असते.

(२) जसजसे उच्च अक्षांश म्हणजे उत्तरेस किंवा दक्षिणेस धृवीय भागाकडे जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.

(ब) समुद्रसपाटीपासून उंची : (१) समुद्रसपाटीवर जे तापमान किंवा हवामान असते तेच तापमान किंवा हवामान उंच प्रदेशात आढळत नाही.

(२) समुद्रसपाटीपासून जसजसे उंचीवर जावे तसतसे तापमानात घट होत जाते. याचा अर्थ

समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचाही हवामानावर परिणाम होत असतो.

(क) समुद्र सान्निध्य अंतर : (१ ) भौगोलिक परिस्थितीनुसार भूपृष्ठ आणि जलपृष्ठभाग एकाचवेळी आणि एकसारखा तापत नाही. त्यांचे तापलेले पृष्ठभाग रात्रीच्या वेळी सुद्धा सारख्या वेळेस व प्रमाणात थंड होत नाहीत.

(२) हवामानशास्त्रानुसार जमीन लवकर तापते व लवकर थंड होते. त्या तुलनेत पाणी उशीरा तापते व उशिरा थंड होते. परिणामतः किनारी भागात कमी दाबाचे पट्टे तयार होतात तसेच किनारी भागातील हवा सम प्रकारची असते.

(३) पालट भूखंडावरील हवामान विषम असते. समुद्रापासून जसजसे दूर जावे तसतसा हवामानात फरक पडत जातो.

(ड) सागरी प्रवाह : (१) समुद्री भागात व महासागरात सागरी प्रवाह निर्माण होतात. ते सागरी प्रवाह थंड प्रवाह व उष्ण प्रवाह अशा दोन प्रकारचे असतात.

(२) उष्ण आणि थंड प्रवाहांचा परिणाम संबंधित प्रदेशावर होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लॅब्रोडरचा थंड प्रवाह होय. लॅब्रोडरच्या थंड प्रवाहामुळे न्यूफाउंडलंडचा किनारा हिवाळ्यात गोठतो.

(३) तसेच ज्या ठिकाणी उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात. त्या ठिकाणी धुक्याची निर्मिती होते. याचा अर्थ सागरी प्रवाह प्रदेशाच्या हवामानावर परिणाम करतात.

(इ) वारे : (१) वाहत्या वाऱ्यांचा परिणाम हवामानावर होत असतो. निरनिराळ्या वान्यामुळेच हवामान प्रभावीत होत असते. थंड वारे व उष्ण वारे असे वाऱ्यांचे प्रकार आहेत.

(२) थंड प्रदेशातून येणारे वारे थंड असून त्यामुळे हवामानातील तापमानात घट होते तर उष्ण प्रदेशातून येणारे वारे उष्ण असल्यामुळे तापमानात वाढ होते.

(३) सामान्यपणे सागर किंवा महासाग्रावरून येणाऱ्या वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या वान्यांपासून पाऊस पडतो. त्याचप्रमाणे भूप्रदेशावरून वाहणारे वारे उष्ण व कोरडे असतात.

(४) हिवाळ्यात हिमालयापासून येणारे थंड व बोचरे वारे दख्खन पठारावरील वातावरणाचे तापमान कमी करतात. याचा अर्थ वाऱ्यांचा प्रभाव हवामानावर होतो.

(५) याशिवाय 'जमिनीचा उतार, वनस्पती, आकाशीय स्थिती, पर्जन्य या घटकांचा सुद्धा भूप्रदेशातील हवामानावर परिणाम होत असतो.














४) प्रदेशाच्या हवामानावर परिणाम करणारे घटक सोदाहरण स्पष्ट करा.











उत्तर : (१) चिली हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे. या देशाचा दक्षिणोत्तर विस्तार जास्त आहे. या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार १७°३०° दक्षिण ते ५६⁰ दक्षिण या दरम्यान आहे.

(२) या देशात अटाकामासारखे उष्ण व कोरडे वाळवंट आहे हे वाळवंट खंडाच्या पश्चिम दिशेला आहे आणि केन कॉर्न या ठिकाणी हिवाळ्यात २° से पर्यंत तापमान खाली गेलेले असते.

(३) या देशाला पॅसिफिक महासागराचे सान्निध्य लाभलेले आहे. हा देश पूर्व-पश्चिम विस्ताराचा विचार केला असता खूप चिंचोळा आहे. हवामानाच्या बाबतीत अक्षवृत्तीय स्थान महत्त्वाचे आहे. कारण सूर्याचे भासमान भ्रमण उत्तरेकडे तसेच दक्षिणेकडे असते याचा कालावधी ६ महिन्यांचा असतो. चिली या देशात उत्तरेकडे वाळवंट, मध्य भाग भूमध्यसागरीय प्रकारचा अँडीज पर्वत रांग, अति उंचीवर हिमवृष्टी, दक्षिणेकडे आर्द्रतायुक्त हवामान आहे. याचा अर्थ चिली या देशात हवामानाच्या बाबतीत विविधता आहे.

(४) रशिया या देशाचा विचार केला असता विस्ताराच्या बाबतीत हा देश जगात सर्वात मोठा आहे. पण या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार चिली या देशापेक्षा कमी आहे. साधारणपणे ६१° उत्तरेपासून साधारणपणे ८०⁰ उत्तर पर्यंत आहे. याचा अर्थ रशिया हा देश क्षेत्रफळाने मोठा असूनही या देशात हवामानात विविधता आढळून येत नाही. कारण अक्षवृत्तीय विस्तार अतिशय कमी आहे.

(५) रशिया हा देश समशितोष्ण कटिबंधात येतो. साधारणपणे चिलीचा अक्षवृत्तीय विस्तार ५६ दक्षिण या ठिकाणी संपतो. रशियाचा अक्षवृत्तीय विस्तार साधारणपणे ६१⁰ पासून सुरू होतो. साधारणपणे एकाच अक्षवृत्तावर उत्तरेकडे व दक्षिणेकडे तापमान सारखेच असल्याचे विविध हवामान प्रदेशाचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते. रशिया देशाचे हवामान समशीतोष्ण प्रकारात मोडते तसेच जस जसे उत्तर अक्षवृत्ताकडे जावे तसतसे तापमान कमी होत जाते. सैबेरियासारखा अतिथंड भाग रशियात आहे. टुंड्रा व तैगा प्रकारचे हवामान उत्तरेला रशियात आढळते.

(६) एकूणच अक्षवृत्तीय विस्तार खंडाचा पश्चिम भाग, अँडीज पर्वत रांगा, पॅसिफिक महासागराचे सान्निध्य या कारणांमुळे चिली या देशात हवामानात विविधता रशिया या देशापेक्षा जास्त आहे.









प्र. ६ ) जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील हवामान प्रदेश दाखवा :





image not fond