३.अपक्षरणाची कारके

Ranjit Shinde




३.अपक्षरणाची कारके संपूर्ण स्वाध्याय |इयत्ता ११ वी भूगोल | प्रश्न.1 ते प्रश्न.७ | 3. Bhu Halchali Swadhyay | Geography



















प्र.१) सारणी पूर्ण करा .





































कारके खननकार्य भूरुपे संचयनकार्य भूरुपे
नदी घळई , v आकाराची दरी , धावत्या , धबधबा , रांजण खळगे , नागमोडी वळणे . पांखाकृती मैदान , नालाकृती सरोवर , पूरतट , पूर मैदान , त्रिभुज प्रदेश .
हिमनदी हिमगव्हर , गिरीशृंग , मेषशिल , शुककूट , u आकाराची दरी , लोंबती दरी . हिमोढ (पार्श्व, मध्य, भूहीमोढ, अंत्य हिमोढ) हिमोढगिरी, हिमकटक, आगंतुक खडक.
वारा वातघृष्ट खडक, भूछत्र खडक, यारदाग, हमादा. वालुकागिरी, (बारखाण अनुलंब टेकड्या किंवा सैफ टेकड्या) लोएस मैदान.
सागरी लाटा सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ, तरंगघर्षित मंच, भूशिर. पुळण, वाळूचा दांडा, कायल (खाजण)
भूजल विलयन विवर, गुहा. अधोमुखी लवणस्तंभ, ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, सलग लवणस्तंभ








प्र.२) विधानांमधील सहसंबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा.


(१) खडकातील भेगांमध्ये पाणी किंवा हिम गेल्याने ते कमकुवत होतात यावरून तळाकडील खडक ओढला जातो.



(अ) उखड (ब) अपघर्षण (क) सन्निघर्षण (ड) वहन






(२) काही वेळेस नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपक्षरण करते. नदीला सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा झाल्यास ही क्रिया घडते.



(अ) अधोगामी अपक्ष (ब) अभिशीर्ष अपक्षरण (क) बाजूचे अपक्षरण (ड) अनुलंब अपक्षरण






(३) कठीण खडकाखालील मुद्द्र खडकांची झीज होऊन एक भूरूप निर्माण होते. या भूरूपातूनच पुढे सागरी कमान तयार होते.



(अ) सागरी गुहा (ब) सागरी स्तंभ (क) सागरी कडा (ड) तरंगघर्षित मंच






(४) वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे हे भूरूप तयार होते. वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील उतार मंद असतो. त्यावेळी हा भूआकार तयार हाता.



(अ) लोएस मैदान (ब) बारखाण (क) सैफ टेकड्या (ड) वालुकागिरी






(५) नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल ही अपक्षरण कारके आहेत. यांच्या कार्यांचा हा योग्य क्रम भूरूपांच्या निर्मितीस कारणीभूत असतो.



(अ) उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे, विलग करणे


(ब) उचलणे, विलग करणे, संचयन करणे, विदारण


(क) संचयन करणे, वाहून नेणे, उचलणे, उत्परिवहन


(ड) विलग करणे, उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे










प्र.३) भौगोलिक कारणे लिहा.


(१) भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नदयांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत, परंतु पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती झआली आहे.


कारण : त्रिभुज प्रदेश केवळ पुढील परिस्थितीत तयार होतो.

(१) जेथे अवसादांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो व

(२) मुखाजवळील समुद्र फार खोल नाही.

(i) ही परिस्थिती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या गंगा गोदावरी, कृष्णा व ब्रम्हपुत्रा या नदयांच्या मुखाजवळच्या प्रदेशात असल्याने तेथे त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झाली आहे.

(ii) परंतु भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील नदयांच्या मुखाजवळ खाड्यांची निर्मिती झाली आहे. कारण तेथील नद्यांच्या पात्राची लांबी कमी त्यामुळे प्रवाहातील अवसादांचे प्रमाण कमी, तीव्र उताराचा प्रदेश असल्याने वेगवान नदी प्रवाह भरतीच्या वेळी सागराचे पाणी नदीपात्रात आतपर्यंत शिरते, ओहोटीच्या वेळी नदी पात्रात शिरलेले पाणी नदीने वाहून आणलेला अवसाद सागरात वाहून नेते, शिवाय नदी मुखाजवळील सागर जास्त खोल इत्यादी कारणांनी त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले नाही, परंतु खाड्यांची निर्मिती झालेली आहे.




(२) कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयनाचा थेट संबंध असतो.


कारण : (i) कारकांच्या प्रवाहाबरोबर वाहून आणलेल्या अवसादांना पुढे वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते, ती गुरुत्वबलामुळे प्राप्त होते. परंतु कारकांच्या प्रवाहमार्गात अडथळा आल्यास त्याचा वेग कमी होऊन अवसाद वाहून नेण्याची क्षमता कमी होऊन संचयन क्रिया सुरू होते.

(ii) म्हणजेच कारकांच्या प्रवाहांचा प्रवेग आणि संचयनाचा थेट संबंध आहे. उदा. नदी प्रवाह तीव्र उताराच्या पर्वतीय प्रदेशातून वेगाने वाहतो. अधिक वेगामुळे त्याची वहनक्षमताही अधिक असते. परंतु नदी प्रवाहाचा मैदानी प्रदेशात प्रवेश झाल्यावर तेथील मंद उतारामुळे प्रवाहाचा वेगही कमी होतो तसेच त्याची अवसाद वाहून नेण्याची क्षमताही कमी होते.

(iii) परिणामी संचयनाला सुरुवात होते. पंखाकृती मैदाने, त्रिभुज प्रदेश या भूरूपांची निर्मिती होते. अशीच स्थिती वारा, सागरी लाटा या कारकांच्या बाबतीत घडते.

(iv) म्हणून कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयनाचा थेट संबंध आहे.




(३) सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रआंतीशिवाय चालते.


कारण : (i) इतर सर्व कारकांच्या मानाने सागरी लाटांच्या कार्यामध्ये सातत्य असते. त्यामुळे या कारकाचा परिणाम अल्पकाळातच दिसन येतो.

(ii) काही भागात अपक्षरण, तर त्या नजीकच्या भागात निक्षेपण सातत्याने घडत असते.

(iii) पुळण, वाळूचे दांडे यांसारख्या संचयनातून तयार झालेल्या भूरूपांचेदेखील अपक्षरण घडत असते. त्याचबरोबर द्रावण या रासायनिक प्रक्रियेद्वारे किनारी भागात अपक्षरण, क्षार विदारण हे सतत सुरू असते.

(iv) म्हणून सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते .




(४) हिमालयामध्ये अनेक गिरीशंग, मेषशिला, हिमगव्हर, लोंबत्या दया आढळतात.


कारण : (i) हिमालय पर्वत हा अधिक उंच असल्याने त्याची उंच पर्वतीय शिखरे हिमरेषेच्या वर आहेत. या उंच भागात हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. या हिमवृष्टीमुळे अनेक हिमनदयांची निर्मिती झाली आहे.

(ii) हिमनदया इतर कारकांप्रमाणे अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात. 'हिमनदीच्या कार्यामुळे अनेक भूरूपे निर्माण होतात. हिमनदीच्या तळाकडील अपघर्षण द्वारे मेषशिला, हिमगव्हर तयार होतात.

(iii) पर्वत शिखराच्या दोन्ही बाजूवरील हिमगव्हर मागे-मागे सरकतात, त्यामुळे हिमगव्हर नष्ट होते व वैशिष्ट्यपूर्ण भूरूप तयार होते. त्याचा आकार शिंगासारखा असतो म्हणून त्याला गिरीश्रृंग असे म्हणतात.

(iv) U आकाराची दरी व लोंबत्या दन्या हिमनदीच्या अपघर्षणाद्वारे निर्माण होतात. हिमनदीला नदीप्रमाणे उपहिमनदया येऊन मिळतात. त्या आकाराने मुख्य हिमनदीपेक्षा लहान असतात.

(v) बर्फ वितळल्यानंतर त्या उपहिमनदयातून पाण्याचे छोटे प्रवाह वाहतात. मुख्य हिमनदीतून पाहिले असता त्या नदयांच्या दया लोंबल्याप्रमाणे दिसतात. म्हणून त्यांना लोबत्या दया म्हणतात.

(vi) हिमालयाचा विस्तार व उंची अधिक असल्याने हिमन्दयांचे कार्य मोठ्या प्रमाणात होते.

म्हणून हिमालयामध्ये अनेक गिरीश्रृंग, मेषशिला, हिमगव्हर व लोंबत्या दऱ्या आढळतात.




(५) कास्स्ट भूरूपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात.


कारण : (1) ज्या खडकांना भेगा व जोड़ आहेत अशा खडकांत मुरलेले पाणी भूपृष्ठात अधिक प्रमाणातकेंद्रित होते. ज्या प्रदेशात जिप्सम व चुनखडक यांसारखे पाण्यात विरघळणारे खडक असतात, ते खडकआम्ल जलात लवकर विरघळतात.

(ii) सतत होणाऱ्या द्रावण क्रियेमुळे भूपृष्ठाला वर्तळाकार खळगे निर्माण होतात. त्या खळग्यांना 'विलयन विवरे' असे म्हणतात. विलयन विवरातून पाणी सतत मुरत राहते, काही वेळा ते अच्छिद्र व एकसंधखडकामुळे अडते व साचून राहते.

(iii) कॅल्शिअम कार्बोनेटसारखी खनिजे अशा पाण्यात विरघळतात. कालांतराने या प्रक्रियेमुळे तेथे गुहा तयार होते.
गुहेच्या छतातून झिरपणारे पाणी कॅल्शिअम कार्बोनेटचे संचयन करते. त्या पाण्याचे गुहेच्या छतावर अवक्षेपण होते व कॅल्शिअम कार्बोनेट छतावर साचतो. असे संचयन गुहेच्या तळाच्या दिशेने वाढत जाते.

(iv) कॅल्शिअम कार्बोनिटचे संपक्त झालेले पाणी गहेच्या तळावर ठिबकते. तेथेही संचयन सुरू होऊन स्तंभतयार होतात. छताकडून तळाकडे वाढणाऱ्या स्तंभांना 'अधोगामी लवणस्तंभ' तर तळाकडून छताच्या दिशेकडे वाढणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वगामी लवण स्तंभ असे म्हणतात.

(v) अधोगामी व ऊर्ध्वगामी स्तंभ एकमेकांत मिळतात. त्यातून सलग लवण स्तंभाची निर्मिती होते..

(vi) क्रोएशियाच्या डाल्मिशियन किनाऱ्यालगतच्या प्रदेशात विस्तीर्ण कास्ट पठारे पहावयास मिळतात. परंतु ती सर्व जमिनीखालील खडकात तयार होतात. ती भूपृष्ठावरून दिसत नाहीत, ती पहाण्यासाठी गुहेत जावे लागते. म्हणून ती भूरूपे भूपृष्ठाखाली लपल्यासाररखी दिसतात.





(६) हिमरेषा ही अपक्षरण कारकाच्या स्वरूपात हिमनदीच्या कार्याची मर्यादा ठरवते.



कारण : (i) ज्या ठराविक मर्यादिपलीकडे उन्हाळ्यात बर्फ वितळून जात नाही, सदैव हिमक्षेत्र असते अशा मर्यादिस हिमरेषा असे म्हणतात.

(ii) साधारणपणे पृथ्वीवर दोन्ही धुवीय प्रदेश व त्यांच्या आसपासचे प्रदेश नेहमी हिमाच्छादित असतात. उच्च अक्षवृत्तांच्या प्रदेशात हिमरेषा कमी उंचीवर तर उंच पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर असते. या मर्यादित प्रदेशात हिमनदीचे कार्य चालते.

(iii) हिमनदी हिमरेषेजवळ आल्यावर तिच्या प्रवाहातील बर्फ तापमानात वाढ झाल्याने वितळून जाते, त्या ठिकाणी हिमनदीचे कार्य संपुष्टात येते.

(iv) म्हणून हिमरेषा ही अपक्षरण कारकांच्या स्वरूपात हिमनदीच्या कार्याची मर्यादा ठरवते.







प्र.४) टिपा लिहा.


१) पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य व मानवी क्रिया :

(i) पर्वतीय प्रदेशातून नदी वाहताना अपक्षरणाचे कार्य करते पर्वतीय प्रदेशाच्या तीव्र उतारामुळे नदी प्रवाहाला जास्त वेग असतो. त्यामुळे अधोगामी अपक्षरण मोठ्या प्रमाणात होऊन नदीप्रवाहाबरोबर मृदा, खडकाचे तुकडे, रेती असे भरड पदार्थ वाहून येतात.

(ii) प्रभावी अपक्षरणामुळे घळई V (व्ही) आकाराची दरी, धावत्या धबधबा यांसारखी भूरूपे तयार होतात.

(ii) पर्वतीय प्रदेश हे दुर्गम व मानवी विकासासाठी प्रतिकूल असतात. कारण तीव्र भू-उतार, घनदाट वने, शेती अयोग्य जमीन, पाणी पुरवठ्याचा अभाव, वाहतूक दळणवळण सुविधांचा अभाव, या प्रतिकूल घटकांमुळे तेथे शेती, उदयोगधंदे व नागरीकरणाच्या विकासावर मर्यादा पडतात.

(iv) भारतातील हिमालयीन नदयांच्या उगमाच्या क्षेत्रात अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे विकसित झाली आहेत. त्याठिकाणी धार्मिक कार्ये व पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे.





२) सन्निघर्षण :

(i) नदी, सागरी लाटा, वारा आणि भूजल व हिमनदी या कारकांमुळे विदारण झालेल्या खडकांना विलग करणे, उचलणे, हलवणे, वाहून नेणे, संचयन करणे या प्रक्रिया घडतात. त्यामुळे अपक्षरणाची आणि संचयनाची भूरूपे तयार होतात.

(ii) काही प्रक्रिया सर्व कारकामध्ये समान असतात परंतु सन्निघर्षण ही प्रक्रिया केवळ नदी, वारा व सागरी लाटा या कारकांकडून घडते.

(iii) सन्निघर्षण ही प्रक्रिया कारकांच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या पदार्थांशी संबंधित घडते. कारकांबरोबर दगड-गोटे, खडकांचे तुकडे, मोठे खडकांचे खंड वाहत येतात. ते प्रवाहाच्या प्रवेगामुळे एकमेकांवर आदळतात, आपटतात. त्यामुळे त्यांचे आणखी लहान-लहान तुकडे होतात.


(iv) ही प्रक्रिया पुन्हा-पुन्हा घडते. परिणामी अवसादातील पदार्थांना गोलाकार प्राप्त होतो.

(v) या प्रक्रियेला सन्निघर्षण प्रक्रिया असे म्हणतात. थोडक्यात सन्निघर्षण प्रक्रियेत प्रवाहाबरोबर वाहून आलेले खडकांचेतुकडे एकमेकांवर आपटून स्वतः ही झिजतात, फुटतात व प्रवाहातील खडकांची झीज करतात, त्यामुळे सूक्ष्म गाळाचा भार तयार होतो.




३) वान्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती

नदी, हिमनदी, सागरी लाटा या कारकांपेक्षा वारा या कारकाचे प्रभाव क्षेत्र शुष्क व वाळवंटी प्रदेशापुरते मर्यादित आहे कमी पर्जन्यमान व उष्ण कोरडे हवामान यांमुळे अपक्षरणाचे व संचयनाचे कार्य मोठ्या प्रमाणात चालत. 'वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती पुढीलप्रमाणे :

(अ) शुष्कता

(i) शुष्क व वाळवंटी प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी असते. तेथे उष्ण व कोरडेहवामान आढळते. कोरड्या हवेमुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे.

(ii) रात्री कडाक्याची थंडी व दिवसा प्रचंड उष्णता यामुळे वाळवंटातील खडकांचे कायिक विदारण अधिक होते.

(ii) विदारणातून खडकांचा भुगा व वाळूची निर्मिती होते. खडकांचे सुटे झालेले कण वाऱ्याबरोबर वाहून जातात.




(ब) वनस्पतींचे विरळ आच्छादन किंवा वृक्षांचा अभाव

(i) पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे व बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने शुष्क प्रदेशाची निर्मिती झाली आहे. येथे वनस्पतींचा अभाव आहे.

(ii) खुरटे गवत व काही प्रमाणात निवडुंगासारख्या वनस्पती अभावानेच आढळतात.

(iii) येथे वनाच्छादन नसल्यामुळे वायाच्या मार्गात अडथळे निर्माण होत नाहीत; त्यामुळे वान्याचे अपक्षरण व संचयन कार्य चालते.




(क) पृष्ठभागावर शुष्क व सुट्या पदार्थांची उपलब्धता


(i) पर्जन्याचे प्रमाण कमी व बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याने कायिक विदारणास चालना मिळते.

(ii) खडकांचे कायिक विदारण होऊन खडकांचे तुकडे, सुटे झालेले मातीचे व वाळूचे शुष्क कण मोठ्याप्रमाणात असतात.

(iii) हे शुष्क व सुटे झालेले कण वाऱ्याबरोबर वाहून जातात.






(ड) वायाचा वेग अधिक असावा

(i) कायिक विदारण प्रक्रियेतून निर्माण झालेले शुष्क मातीचे कण, रेती,वाळू इत्यादी अवसाद वाहून नेण्यासाठी वेगवान वाऱ्याची आवश्यकता असते.

(ii) वाळंवटी प्रदेशात वनस्पतींचा अभाव असल्याने वाऱ्याचा वेगवान प्रवाह निर्माण होतो. या वेगवानप्रवाहाबरोबर शुष्क व सुटे पदार्थ वाहून जातात.

(iii) वाऱ्याच्या अपक्षरण कार्यातून अपवाहीत खळगे, वातघुष्ट भूछत्र खडक, यारदांग यासारख्या भूरूपांची निर्मिती होते. तर संचयन कार्यातून वाळूच्या टेकड्या, उर्मिचिन्हे, लोएस मैदान अशा भूरूपांची निर्मिती होते.



प्र.५) फरक स्पष्ट करा :


१) सन्निघर्षण आणि अपघर्षण




















सन्निघर्षण अपघर्षण
i) प्रवाहादरम्यान खडक आणि खडकांचे तुकडे एकमेकांवर आपटतात व ते तुटून त्यांचे लहान-लहान तुकडे तयार होतात, तसेच खडकांना गोलाकार प्राप्त होतो. या प्रक्रियेला सन्निघर्षण असे म्हणतात.. i) कारकांबरोबर वाहून आलेल्या अवसादामुळे भूपृष्ठाची झीज होते. त्या प्रक्रियेला अपघर्षण असे म्हणतात.
ii) वारा, नदी व सागरी लाटा या कारकांद्वारे वाहून आणलेल्या पदार्थाशी संबंधित ही प्रक्रिया असते. ii) नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांमुळे अपघर्षण क्रिया घडते, या कारकांद्वारे वाहत आलेल्या पदार्थाचा प्रभाव भूपृष्ठावर होतो.










२) यु-आकाराची आणि व्ही-आकाराची दरी






















यु-आकाराची दरी व्ही-आकाराची दरी
(i) हिमनदी ही घनस्वरूपात वाहते. त्यामुळे दरीच्या दोन्ही काठांचे व तळांचे अपक्षरण होते, परिणामी दरीचे काठ व तळ रुंद होतो. दरीला इंग्रजी वर्णमालेतील U अक्षरा सारखा आकार प्राप्त होतो. म्हणून या दरीता U (यू) आकाराची दरी असे म्हणतात i) नदीता अनेक लहान उप प्रवाह येऊन मिळाल्यानंतर नदीतील अवसादाचे प्रमाण वाढल्याने तळावरील अपक्षरण कमी होऊन दोन्ही काठांचे अपक्षण होऊन नदी पात्राला. इंग्रजी वर्णमालेतील V (व्ही) अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. म्हणून त्या दरीला V आकाराची दरी असे म्हणतात
(ii) U (यू) आकाराची दरी हिमनदी तील घनरूप बर्फाच्या घर्षण कार्यामुळे तयार होते. ii) नदीतील पाणी व वाहून आलेल्या अवसादाच्या. घर्षण कार्यामुळे V (व्ही) आकाराची दरी तयार होते.










३) उर्ध्वमुखी आणि अधोमुखी स्तंभ

















उर्ध्वमुखी स्तंभ अधोमुखी स्तंभ
i)गुहेत भूजलातून कॅल्शिअम कार्बोनेटचे संचयन होते. कॅल्शियम कार्बोनेट मुळे संपृक्त झालेले जल झिरपताना गुहेच्या तळावर पडते. त्या पाण्याचे अवक्षेपण होते व लवणस्तंभ तयार होतात. हे स्तंभ जमिनीकडून छताकडे वाढत जातात, त्या स्तंभांना ऊर्ध्वगामी लवणस्तंभ असे म्हणतात i) गुहेत भूजलाच्या रूपात झिरपणारे पाणी कॅल्शिअम कार्बोनेटचे संचयन करते. झिरपलेल्या पाण्याचे गुहांच्या छतावर अवक्षेपण होते व कॅल्शियम कार्बोनेट छतावर साचतो. असे संचयन स्तंभाच्या रूपात छताकडून तळाच्या दिशेत वाढतात. म्हणून त्यांना अधोगामी लवणस्तंभ असे म्हणतात









४) उपनदया आणि वितरिका





















उपनदया वितरिका
i) नदीच्या उगमानंतर पुढे मुख्य नदीला वेगवेगळ्या दिशांनी लहान प्रवाह येऊन मिळतात. त्या प्रवाहांना त्या नदीच्या उपनद्या असे म्हणतात. उदा. कृष्णा नदीच्या उपनदया कोयना, वारणा, पंचगंगा इत्यादी उपनदया मुख्य नदीला पाणी पुरवठा करतात. i) नदी सागराला मिळते त्या ठिकाणाला नदीचे मुख असे म्हणतात. नदीच्या मुखाकडील प्रदेशाचा उतार अतिशय मंद असल्याने पात्रातील पाणी संथ गतीने वाहते. पाण्याची गती कमी झाल्याने तिची वहन क्षमता कमी होते व नदीपात्रातच गाळाचे संचयन होऊन प्रवाहास अडथळा होतो. त्या अडथळ्याच्या दोन्ही बाजूने नदी प्रवाह वाहतो. म्हणजेच प्रवाहाचे दोन फाटे होतात. अशा प्रकारे नदी अनेक फाट्यांनी सागराला मिळते. त्या प्रवाह फाट्यांनाच वितरिका असे म्हणतात. वितरिकांच्या दरम्यान त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. उदा. गंगा, गोदावरी व कृष्णा या नदयांच्या मुखाकडे अनेक वितरिका निर्माण झाल्या आहेत.















प्र.६) सविस्तर उत्तरे लिहा.


१) अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारकांमधून निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा.

'अपघर्षण क्रियेमुळे वारा / हिमनदी / सागरी लाटा या कारकांकडून निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा.'


उत्तर : कारकांबरोबर वाहत असलेल्या अवसादांच्या कणांमुळे घर्षण घडते व भूपृष्ठभाग गुळगुळीत होतो. या क्रियेला अपघर्षण असे म्हणतात. वारा, हिमनदी व सागरी लाटा या कारकांमार्फत अपघर्षण प्रक्रिया घडते. वेगवेगळ्या कारकांच्या अपघर्षण क्रियेने निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे :

(अ) वारा: शुष्क प्रदेशात सातत्याने जोरदार वारे वाहत असतात. वेगवान वाऱ्याची हालचाल आपल्याबरोबर धुळीचे कण, रेती, वाळूचे कण उचलते व प्रवाहाबरोबर त्यांचे वहन करते. वारा सतत वाहत असल्याने भूपृष्ठावर आघात होऊन अपघर्षण क्रिया घडते. अपघर्षण क्रियेमुळे वातघृष्ट खडक, भूछत्र खडक व पारदांग ही भूरूपे तयार होतात .

(i) वातघष्ट खडक भूपृष्ठावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते. अत्यंत अवजड व मोठ्या खडकांवर वातसंमुख दिशेने वान्याबरोबर वाहत आलेल्या वाळू, रेती व धुळीकणांचा सतत मारा होऊन्, घर्षण क्रियेतून खडक गुळगुळीत होतात. जणू काही एखादया कारागीराने कापून छाटून आणि घासून ठेवला आहे असा खडक दिसतो. त्याला 'वातघृष्ट खडक' असे म्हणतात. हंगामानुसार वान्याच्या दिशेत बदल होतो. त्या खडकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या बाजूने अपघर्षण होऊन खडक तिन्ही बाजूने गुळगुळीत होतो. त्याला 'त्रिपृष्ठशिलाखंड'असे म्हणतात. सहारा वाळवंटात असे वातघृष्ट खडक आढळतात.



(ii) भूछत्र खडक वायाच्या अपघर्षण कार्यामुळे भूछत्र खडकाची निर्मिती होते. वारा व त्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आणलेले धुलीकण, बाळूचे घात करतात. हा आघात खडकाच्या माथ्याकडील भागापेक्षा पायथ्याकडे जास्त होतो. त्यातही जमिनीपासून मध्यम उंचीवर वाऱ्याबरोबर वाहून येणारे कण बारीक असले तरी वाऱ्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने खडकाच्या मधल्या भागाचे पायथ्याकडील भागापेक्षा तुलनेने जास्त अपघर्षण होते. यामुळे या खडकाचा आकार भूछत्रासारखा दिसतो म्हणून त्याला "भूछत्र खडक' असे म्हणतात. कालांतराने मधल्या भागाची जास्त झीज होऊन हे खड़क कोलमडून पडतात.

(iii) याग वाळवंटी प्रदेशात मृद व कठीण खडकांचे स्तर जेथे एकमेकांना समांतर असतात तेथे वान्याबरोबर वाहन आलेले लहान-मोठे वाळचे कण, खडकांचे तुकडे यासारखे कठीण पदार्थ त्या खडकांवर घर्षण करतात. त्या खडकांपैकी मृदू खडकांची झीज जलद गतीने होते व दोन कठीण खडकांच्या दरम्यान पन्हाळीसारखा लांबट व खोलगट भाग तयार होतो त्या भूरूपाला 'यारदांग' असे म्हणतात.




(ब) हिमनदी : उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व उंच पर्वतीय उतारावर हिमनदींचे कार्य चालते. बर्फाच्या ओझ्यामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागतात, अशा हिम किंवा बर्फाच्या प्रवाहाला हिमनदी असे म्हणतात. हिमनदीदेखील इतर कारकांप्रमाणे अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करते तिच्या अपघर्षण कार्यामुळे हिमगव्हर, गिरीभृंग, मेषशिला, U आकाराची दरी, लोंबत्या दऱ्या इत्यादी भूरूपे तयार होतात.




(i) हिमगव्हर / सर्क : हिमक्षेत्रातील पर्वत उतारावरून हिमनदी वाहत असतांना तिच्या अपक्षरण कार्यामुळे पर्वत उतारावर अर्धवतुळाकार खड्ड्यांची निर्मिती होते. याचा आकार आराम खुर्चीसारखा असतो. हिमगव्हर किंवा सर्क निर्माण होण्यासाठी पर्वत उतारावर रुंद दरी पुरेशी हिमवृष्टी आणि तेथील खडक एकाच प्रकारचा असल्यास हिमगव्हर किंवा सर्क निर्मिती सुलभ होते.

(ii) मेषशिला : हिमनदीच्या मार्गात लहान-लहान टेकड्या किंवा खडकांचे उंचवटे यासारखे अडथळे आल्यास हिमनदी आपल्या प्रवाहाची वाहण्याची दिशा न बदलता त्या अडथळ्यांवरून वाहण्याचा प्रयत्न करते. ते अडथळा ओलांडून पुढे जाते. नदी त्या अडथळ्यांच्या ज्या बाजने चढते, त्या बाजूकडे अपघर्षण क्रियेमुळे टेकडीचा किंवा खडकाचा भाग गुळगुळीत होतो तर विरुद्ध उताराची बाजू खडबडीत होते. अशा प्रकारे तयार झालेल्या टेकड्या किंवा खडक दुरून पाहिल्यास एखादया बसलेल्या मेंढ्यासारख्या आकाराच्या दिसतात म्हणून त्याला 'मेषशिला' असे म्हणतात. आल्प्स पर्वत व फिनलंडच्या पर्वतीय प्रदेशात मेषशिला हे भूरूप पहावयास मिळते.

(iii) गिरिशृंग व शुककूट उंच पर्वतीय शिखरांच्या वेगवेगळ्या बाजूंना हिममव्हर किंवा सर्कची निर्मिती होते. हिमाच्या अपघर्षणामुळे या सर्व हिमगव्हरांचा विस्तार वाढतो. दोन हिमगव्हरांच्या दरम्यान शिल्लक रहाणारा अरुंद भाग भिंतीसारखा असतो त्याला 'शुककूट असे म्हणतात. शेवटी सर्व हिमगव्हरांच्या कडा परस्परांना मिळतात व पर्वताच्या शिखराच्या भागाला शिंगाप्रमाणे उंच व अणकुचीदार आकार दिसू लागतो त्याला 'गिरीशंग असे म्हणतात. आल्प्स पर्वतातील मॅटरहॉर्न हे गिरिशंगाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.



iv) U (यू) आकाराची दरी : नदीप्रमाणे हिमनदी स्वतः दरीची निर्मिती करीत नाही. हिमक्षेत्रातून हिमनद्या वाहत असतांना पर्वत उतारावरील पूर्वीच्या दन्यामधून वाहतात. आपल्या प्रभावी अपक्षरणाने मूळ दरीच्या आकारात परिवर्तन घडवून आणतात. हिमनदी दरीमधून वाहू लागल्यावर दरीच्या पार्श्व व तळभागाची अपक्षरण करते त्यामुळे पूर्वीचे अरुंद दरी पात्र रुंद व खोल बनते. दरीला U (यू) आकार प्राप्त होतो. कारण हिमनदी एकाच वेळी अधोगामी व पार्श्वगामी अपक्षरण करते. या दऱ्या खोल व रुंद असून त्यांचा तळभाग रुंद व सपाट असतो, तर कडा भिंतीप्रमाणे तीव्र उताराच्या असतात.

(v) लोंबत्या दऱ्या : मुख्य हिमनदीला येऊन मिळणाऱ्या उपहिमन्दया सुरुवातीला एकाच पातळीवर मिळत असतात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बर्फ पुरवठ्यामुळे मुख्य नदीचे कार्य उपहिमनदयांपेक्षा अधिक प्रभावी असते. मुख्य हिमनदीच्या दरीत अधोगामी अपक्षरण जास्त होत असल्याने तिचे पात्र उपहिमनद्यांच्या पात्रांच्या मानाने फार खोल असते. ज्याठिकाणी उपहिमनदया मुख्य हिमनदीला येऊन मिळतात ते भाग मुख्य हिमनदीच्या तळभागापासून जास्त उंचीवर असतात, त्यामुळे मुख्य नदीवर उपहिमनदयांच्या दऱ्या लोंबतात असे दिसते. त्यांना लोंबत्या दऱ्या असे म्हणतात.


(क) सागरी लाटा : नदीप्रमाणे सागरी लाटाही अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती- ओहोटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. सागरी लाटांचे कार्य निरंतर चालते. द्रावण व रासायनिक प्रक्रियेद्वारे किनारी भागात अपक्षरण होते. लाटा किनाऱ्यावर येऊन फटल्यावर पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड-गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे अपघर्षण क्रिया होऊन मोठ्या प्रमाणात झीज होते. म्हणून अपघर्षण ही प्रक्रिया सागरी लाटांच्या कार्यातील सर्वांत परिणाम करणारी प्रक्रिया आहे. सागरी लाटांबरोबर वाहून येणाऱ्या गाळाचे प्रमाण अधिक असल्यास अपघर्षण प्रक्रिया वेगाने होऊन किनाऱ्यावर अनेक भूरूपे तयार होतात. उदा. सागरी कडा, सागरी गुहा, कमान, स्तंभ व तरंगघर्षित मंच यांसारखी भूरूपे तयार होतात.

(i) सागरी कडा : सागरी किनाऱ्याचा भाग एकाच प्रकारच्या खडकाने बनलेला असेल तर त्यावर लाटांचा मारा एकसारखा होऊन उभ्या भिंतीसारखा भाग तयार होतो. त्याला सागरी कडा असे म्हणतात.

(ii) सागरी गुहा : सागरी किनान्याला कठीण खडक स्तराखाली मृदू खडक अशी रचना असेल तर लाटांच्या आघाताने प्रथम मृदू खडक झिजतात व पोकळी निर्माण होते. तिला सागरी गुहा असे म्हणतात. भरतीच्या वेळी लाटांचे पाणी गुहेत शिरते तेव्हा गुहेतील हवेवर दाब वाढल्याने ती कोंडली जाते व बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी गुहेच्या छतावरील खडकांतील भेगा-फटी रुंदावतात, शेवटी गुहेच्या छताला आरपार छिद्र पडते. लाटेमुळे कोंडणारी हवा बाहेर पडतांना शीळ घातल्यासारखा आवाज येतो. त्याला नैसर्गिक चिमणी असे म्हणतात.

(iii) सागरी कमान : सागरी किनाऱ्यावरील भूशिरावर दोन्ही बाजूंनी सागरी लाटांचा मारा होऊन दोन्ही बाजूला दोन गुहा तयार होतात. कालांतराने त्यांचा विस्तार होऊन त्या परस्परांशी आतून जोडल्या जातात व त्यांचा कमानीसारखा आकार दिसतो, म्हणून त्यांना नैसर्गिक कमान' किंवा 'सागरी कमान' असे म्हणतात. कालांतराने या कमानी नष्ट होतात.

(iv) सागरी स्तंभ : सागरी कमान लाटाच्या अपक्षरणाने नष्ट झाल्यावर जे उंच भाग शिल्लक राहतात. ते सागरात उंच स्तंभासारखे दिसतात त्यांना सागरी स्तंभ असे म्हणतात. त्या स्तंभावर सागरी लाटांचा सतत मारा होऊन त्यांची उंची कमी होते.

(v) तरंगघर्षित चबुतरा / मंच : सागरी लाटांच्या अपक्षरणामुळे सागरी किनान्यावर सागरी कडा तयार होते. त्या सागरी कड्यावर सागरी लाटांचा सतत आघात होऊन सागरी गुहा तयार होते. गुहा अपक्षरणामुळे अधिक रुंद व लांब होत जाऊन गुहेच्या छताचा भाग आधाराशिवाय लोंबकळत राहतो व गरुत्वबलाने खाली कोसळतो व किनारा मागे सरकतो. सागरी कड्याच्या पायथ्याजवळ सागराकडे उतार असलेला नैसर्गिक मंच तयार होतो. त्यालाच 'तरंगघर्षित सागरी मंच' किंवा 'चबूतरा' असेही म्हणतात.








२) गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयोगी ठरले आहे स्पष्ट करा.


उत्तर : (i) गंगा नदी हिमालय पर्वताच्या पायथ्याजवळ पूर्व-पश्चिम दिशेत गाळाचे संचयन करून सुपीक व विस्तीर्ण मैदानी प्रदेशाची निर्मिती केली आहे. एवढंच नव्हे तर मुखाच्या प्रदेशात जगातील एका विस्तीर्ण त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली आहे.

(ii) दर पुराच्यावेळी नवीन गाळाचे संचयन होऊन मृदेची सुपीकता व उत्पादकता वाढत रहाते, म्हणून या मैदानी प्रदेशात शेती व्यवसायाचा विकास झाला आहे. तसेच अन्न धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

(ii) सपाट मैदानी प्रदेशामुळे वाहतूक दळणवळण सुविधांत वाढ होऊन उद्योगधंदयांचा विकास झाला आहे. रोजगार निर्मिती, अन्नधान्याची सहज उपलब्धता, बारमाही पाणी पुरवठा यामुळे गंगेच्या मैदानी प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले आहे.

(iv) गंगेच्या तीरांवर ऋषिकेश, हरिद्वार, प्रयाग यांसारखी पवित्र तीर्थक्षेत्रेही विकसित झाली आहेत; यामुळे पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे.

(v) म्हणून गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयोगी ठरले आहे.








३) पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील चित्रात कोणकोणती कारके दिसत आहेत? या कारकांनी तयार केलेली भूरूपे कोणती? त्यातील एका भूरूपाच्या निर्मितीची प्रक्रिया लिहा.




उत्तर : पाठ्यपुस्तकाच्या आवरणातील (मुखपृष्ठ) चित्रात पुढील कारके दिसत आहेत सागरी लाटा, नदी, हिमनदी इत्यादी. पुस्तकाच्या आवरणावरील चित्रातील कारखाने पुढील भूरूपे तयार केली आहेत.

(अ) सागरी लाटा : पुळण्

(ब) नदी : नागमोडी वळणे, पूर तट पूर मैदान, नालाकृती सरोवर इत्यादी...

(क) हिमनदी : U (यू) आकाराच्या दऱ्या हिमोढ इत्यादी भूरूपे तयार केली आहेत. नदीच्या एका

भूरूपांच्या निर्मितीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :

'नालाकृती सरोवर : नदीच्या पुराच्यावेळी नदीत पाण्याचे प्रमाण अतिशय वाढते. अतिरिक्त पाणी नदीपात्रात न राहिल्याने ते नदीच्या पात्राबाहेर पडून परिसरात पसरते. पुराच्या पाण्याचा गतिमान प्रवाह नदीच्या नागमोडी वळणातून न वाहता तो सरळ मार्गने वाहतो. पूर्वीचे नदीपात्राचे वळण मुख्य पात्रापासून अलिप्त होते. पूर ओसरल्यानंतर त्या पात्रापासून वेगेळ्या झालेल्या वळणात पाणी साचून सरोवर बनते, त्या सोवराचा आकार घोड्याच्या नालाप्रमाणे असतो म्हणून त्याला नालाकृती सरोवर असे म्हणतात. गंगेच्या खोऱ्यात अशी सरोवरे पहावयास मिळतात.

















प्र. ७) आकृत्या काढून नावे दया :



१) अपवहन





Study Storm






२) तरंगघर्षित मंच





Study Storm






३) भूछत्र खडक





Study Storm