प्र.१ ) साखळी पूर्ण करा.
प्र.२ ) अचूक सहसंबंध ओळखा.
A : विधान, R : कारण
१ ) A : विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते.
R : एकमेकांविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलामुळे विभंग निर्माण होतो.
अ ) केवळ बरोबर आहे.
आ ) केवल R बरोबर आहे.
इ ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R से A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
२ ) A : भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या उर्जेचे मापन ही भूकंपाची तीव्रता असते.
R : भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मर्केली प्रमाण वापरतात.
अ ) केवळ बरोबर आहे.
आ ) केवळ R बरोबर आहे.
इ ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे चे अचूक स्पष्टीकरण नाही.
३ ) A : आग्नेय आशिया, जपान आणि पॅसिफिक महासागरातील बेटे ही भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकास सर्वाधिक संवेदनशील आहेत.
R : ते अग्निकंकण प्रदेशात स्थित आहेत.
अ ) केवळ A बरोबर आहे.
आ ) केवळ R बरोबर आहे.
इ ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
ई ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे घे अचूक स्पष्टीकरण नाही
प्र.३ ) अचूक गट ओळखा :
प्र.४ ) भौगोलिक कारणे लिहा :
१) मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते.
कारण : i) काही ज्वालामुखीय उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर फेकले जातात व त्याचवेळी खूप मोठ्या प्रमाणावर दाबमक्ती होते.
ii) स्फोटक उद्रेकामुळे ज्वालामुखीच्या मुखात खोलवर खळगे निर्माण होतात. त्या खळग्यांना ज्वालामुखीय काहील (कल्डेरा) असे म्हणतात. कालांतराने पाणी साचून तेथे सरोवरांची निर्मिती होते. या सरोवराला विवर सरोवर म्हणतात.
२ ) हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात.
कारण : i) पृथ्वी पृष्ठ हे अनेक भूपट्ट्यांनी बनलेले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया हा भूपट्टा ईशान्येकडे सरकत असून तो युरेशिया भूपट्ट्याखाली घुसतो आहे.
ii) हिमालय पर्वत हा युरेशिया व भारतीय पट्ट्या दरम्यान असल्याने हिमालयात वारंवार भूकंप होतात. म्हणून हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात. तसेच हिमालय पर्वतीय प्रदेश हा अति उच्च भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने येथे मोठे भूकंप होतात.
३ ) भूपृष्ठ लहरींना भूकंपाचा प्रदेश नसतो.
कारण : i) भूकंप केंद्रापासून उत्सर्जित होणाऱ्या भूकंप लहरी सर्वत्र पसरतात. यात (P) प्राथमिक व (S) दुय्यम लहरींचा समावेश होतो.
ii) (L) भूपृष्ठ लहरी या प्राथमिक व दुय्यम लहरी येऊन पोहोचल्यानंतर निर्माण होतात. भूपृष्ठ लहरी केवळ भूपृष्ठातून प्रवास करतात. त्या पृथ्वीच्या अंतरंगात प्रवेश करत नाहीत म्हणून भूपृष्ठ लहरींना भूकंप छायेचा प्रदेश नसतो.
४ ) मृदू खडकांना चळया पडतात, तर कठीण खडकात विभग होती.
कारण : i) भूकवचात क्षितिजसमांतर दिशेत भू-हालचाली कार्य करतात. बलाच्या दिशेनुसार या हालचालींमुळे खडक स्तरात दाब किंवा ताण निर्माण होतो. या हालचालींमुळे भूपृष्ठाला वळ्या किंवा भेगा पडतात.
ii) भूपृष्ठाला पडणाऱ्या वळ्यांचे स्वरूप हे भूकवचातील खडकस्तरांचे स्वरूप, 'बलांची तीव्रता आणि बलाचा कालावधी यांवर अवलंबून असते. ज्यावेळी खडकाच्या स्तरांमधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात त्यावेळी वळ्यांची निर्मिती होते.
iii) हिमालय, आल्प्स, रॉकी, अंडीज इत्यादी पर्वतांची निर्मिती वलीकरणाच्या प्रक्रियेतून झाली आहे. मृदू व लवचिक खडकांवर वलीकरणाचा प्रभाव जास्त पडतो. खडक स्तरावर पडलेल्या दाबाचे बल व त्याचा प्रवेग यांवर वलीकरण अवलंबून असते.
iv) भूकवचातील बल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. तेव्हा खडकांच्या थरामध्ये ताण निर्माण होतो. यामुळे भूपष्ठाला भेगा किंवा तडे पडतात.
v) बलाचा परिणाम झालेल्या खडकाचा प्रतिसाद हा तो खडक किती कठीण आहे तसेच बलाचा प्रवेग किती आहे यांवर विभंग अवलंबून असतो. मृदू व लवचिक खडक स्तर तुटत नाही पण कठीण खडक ताण प्रक्रियेमुळे तुटतात.
५ ) वाळ्या ह्या खडकाची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात.
कारण : भूकवचात असलेल्या खडक स्तरांवर दाब निर्माण करणाऱ्या बलांमुळे खडक एकमेकांकडे ढकलले जातात. तसेच तो भाग संकुचित व जाड होतो. बलाचा प्रवेग व खडक किती कठीण आहे यांवर वळ्यांची निर्मिती अवलंबून असते. जेव्हा खडक लवचिक असतो तेव्हा त्याला वळ्या पडतात. लवचिक खडक सहसा तुटत नाहीत. म्हणून दाब प्रक्रियेच्या बलाचा प्रवेग व खडकाची ताकद यावर वळ्यांची निर्मिती अवलंबून असते.
प्र.५ ) सविस्तर उत्तरे लिहा :
१ ) विभंगाचे विविध प्रकार स्पष्ट करा.
उत्तर : भूकवचातील अंतर्गत बलामुळे खडक स्तरांवर दाब व ताण निर्माण होतात. दाब प्रक्रियेमुळे मृदू व लवचिक खडक स्तरांना घड्या किंवा वळ्या पडतात, तर ताण प्रक्रियेमुळे खडक स्तरांना तडे जाऊन विभंग किंवा प्रस्तरभंग होतात. खडकाच्या तुटलेल्या भागांचे विस्थापन होते. है विस्थापन ऊर्ध्वगामी, अधोगामी व क्षितिजसमांतर दिशेत होते. खडकांच्या विस्थापनानुसार विभंगाचे विविध प्रकार पडतात.
(अ) सामान्य विभंग : विभंग रेषेजवळून एक भाग विभंग प्रतलाच्या खाली सरकतो. तर दुसरा भाग आकाशाभिमुख राहतो.
(ब) उत्क्रम विभंग (विरुद्ध) : या विभंग प्रकारात विभंग रेषेजवळील एक भाग खाली न खचता वर उचलला जातो. तर दुसरा भाग तेथेच राहतो. ही क्रिया सामान्य विभंगाच्या विरुद्ध घडते म्हणून त्याला उत्क्रम किंवा विरुद्ध विभंग असे म्हणतात. यात विभंग प्रतल भूमी अभिमुख असते.
(क) कातर विभंग : या विभंग क्रियेत विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरांमध्ये ऊर्ध्वगामी अथवा अधोगामी दिशेत हालचाल होत नाही. मात्र प्रचंड ताण क्रियेमुळे खडक स्तरांची हालचाल क्षितिजसमांतर होते.
(ड) प्रणोद विभंग : विभंग प्रतलाचा एका बाजूचा भाग तुटून पुढच्या बाजूवर येऊन पडतो तेव्हा हा विभंग निर्माण होतो. या विभंगातील विभंग प्रतलाचा कोन ४५° पेक्षा कमी असतो. अशा विभंगास प्रणोद विभंग असे म्हणतात. वरील इतर विभंगांच्या प्रतलाचा कोन ४५° पेक्षा जास्त असतो.
२ ) ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचे उदाहरणासह स्पष्टीकरण लिहा.
उत्तर : पृथ्वीच्या बाह्य प्रावरणात तयार झालेले द्रवरूप पदार्थ ज्वालामुखीच्या उद्रेकातून भूपृष्ठावर येतात या क्रियेला ज्वालामुखी असे म्हणतात. तप्त लाव्हारस ज्या ठिकाणातून बाहेर येतो त्याला 'ज्वालामुखीचे मुख' असे म्हणतात. ज्वालामुखीचा उद्रेक हा केंद्रीय व भेगीय स्वरूपात होतो. उद्रेकांच्या कालावधीनुसार जागृत, निद्रिस्त व मृत ज्वालामुखी असे त्यांचे वर्गीकरण केले जाते. ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हारस थंड होऊन घनरूप होतो. लाव्हारसाच्या संचयनातून विविध प्रकारची भूरूपे निर्माण होतात.
(अ) लाव्हा घुमट : ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हारस मुखाजवळ थंड होऊन घनरूप बनतो त्यावेळी घुमटाकार टेकडीची निर्मिती हाते. लाव्हारसाच्या पातळ व घट्टपणावर त्याचा प्रवाहीपणा ठरतो. आम्लधर्मीय लाव्हारसापासून घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते. तर' अल्कधर्मीय (Basic Lava ) लाव्हापासून विस्तृत तळ असलेले घुमट तयार होतात.
(ब) लाव्हा पठारे : भेगीय ज्वालामुखी उद्रेकातून अल्क धर्मीय लाव्हारस मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावर पसरतो. लाव्हारसाच्या संचयनातून लाव्हा पठारांची निर्मिती होते. उदा. दख्खनचे पठार (भारत), कोलंबिया पठार (दक्षिण अमेरिका) ही लाव्हा पठारे आहेत.
(क) ज्वालामुखीय काहील (कॅल्डेरा) : स्फोटक ज्वालामुखींच्या उद्रेकाने त्यांच्या मुखाजवळ असलेले पदार्थ स्फोटाने खुप उंच हवेत फेकले जातात. त्यामुळे मुखाजवळ रुंद व खोल खड्डा तयार होतो. त्या खड्डयांना काहील किंवा कॅल्डेरा असे म्हणतात. काही कहीलांची रुंदी १० किमी पेक्षा अधिक तर खोली कित्येक मीटरपर्यंत असते. लहान आकारांच्या काहीलींना विवर असे म्हणतात.
(ड) विवर सरोवर : ज्वालामुखी उद्रेकाने तयार झालेले विवर कालांतराने पावसाच्या पाण्याने भरून जाते व त्याचे रूपांतर सरोवरात होते. त्या सरोवराला विवर सरोवर असे म्हणतात. विशेषतः मृत ज्वालामुखीच्या विवरात अशा सरोवरांची निर्मिती होते. उदा. माऊंट मॅझमा सरोवर (संयुक्त संस्थाने) हे या प्रकारे तयार झालेले सरोवर आहे.
(ई) ज्वालामुखीय खंटा : ज्वालामुखींच्या मुखांतून बाहेर येणारा आम्लधर्मीय मॅग्मा मुखातच थंड होऊन घट्ट होतो. कालांतराने मुखाच्या बाजूचे पदार्थ नष्ट होतात व उंच कठिण खडकाचा खुंट्यासारखा स्तंभ शिल्लक राहतो त्याला ज्वालामुखीय खुंटा असे म्हणतात. मृत ज्वालामुखीच्या शंकू टेकड्यावर असा खुंटा पाहावयास मिळतो.
(उ) खंगारक शंकू : ज्वालामुखीच्या उद्रेकातून अनेक घनपदार्थ बाहेर येऊन मुखाभोवती साचतात. या पदार्थात राख अर्धवट जळालेले निखाऱ्यासारखे पदार्थ व सकोणाश्म (घनरूप टोकदार पदार्थ) यांचा समावेश असतो. या अर्धवट जळालेल्या निखाऱ्यांना खंगारक असे म्हणतात. खंगारक पदार्थांच्या संचयनातून शंकू तयार होतो म्हणून त्याला खंगारक शंकू असे म्हणतात.
(ऊ) संमिश्र शंकू : ज्वालामुखीच्या उद्रेकातून काही वेळा लाव्हारस तर काही वेळा राख, अर्धवट विरघळलेले खडकाचे तुकडे बाहेर येतात. वारंवार उद्रेक होऊन त्यांचे एकावर एक थर साचून तयार होणाऱ्या शंकूला संमिश्र शंकू असे म्हणतात. अशा रितीने ज्वालामुखीमुळे विविध भूरूपे निर्माण होतात.
३ ) भूकंपाचा प्रदेश ही संकल्पना स्पष्ट करा.
भूकंप, भूकंपनाभी, अपिकेंद्र म्हणजे काय ?
उत्तर : भूकंप : भूपृष्ठाचे थरथरणे म्हणजे भूकंप होय. भू हालचालींमुळे भूकवचातील खडकांच्या थरात ताण निर्माण होऊन तो भूकवचातील एखादया ठिकाणी मुक्त होतो तेथे प्रचंड उर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. त्यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजे भूकंप होय.
भूकंपनाभी किंवा भूकंप केंद्र : भूकवचात भूकंपाची निर्मिती होते. त्या ठिकाणाला भूकंपनाभी किंवा भूकंप केंद्र असे म्हणतात. भूकंपनाभीच्या सरळ वर भूपृष्ठावरील ठिकाणाला भूकंपाचे बाह्य केंद्र किंवा अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंप लहरींचे प्राथमिक लहरी (P), दुय्यम लहरी (S) व भूपृष्ठ लहरी (L) असे तीन प्रकार होतात.
भूकंप लहरींची वैशिष्ट्ये कोणती?
(अ) प्राथमिक लहरी (P) : (i) भूकंप केंद्रापासून या लहरी सरळ रेषेत सर्वांत प्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. साधारणपणे सेकंदाला ५ किमी या वेगाने प्रवास करतात.
(ii) जास्त घनतेच्या पदार्थांतून या लहरी सेकंदाला ८ ते १५ किमी वेगाने प्रवास करतात.
(iii) या लहरी घनरूप द्रवरूप व वायुरूप या तीनही माध्यमातून प्रवास करतात. (iv) या लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल पुढे मागे होते.
(v) जेव्हा या लहरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा त्याचे वक्रीभवन होते.
(ब) दुय्यम लहरी (S) : (i) प्राथमिक लहरींनंतर या लहरी भूपृष्ठाकडे पोहोचतात.
(ii) नाभीकेंद्रापासून या लहरी सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे प्रवास करतात.
(iii) या लहरीच्या मार्गातील कणांची हालचालही वर खाली होते.
(iv) या लहरी फक्त घन माध्यमातन प्रवास करतात या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात.
(क) भूपृष्ठ लहरी (L): (i) प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावरील अपिकेंद्रात येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते.
(ii) या लहरी पृथ्वीच्या परिघाला समांतर आडव्या दिशेत प्रवास करतात. म्हणजेच भूपृष्ठातून प्रवास करतात.
(iii) इतर लहरींपेक्षा या लहरी अतिशय विध्वंसक असतात.
(iv) या लहरी पृथ्वीच्या अंतरंगात प्रवेश करत नाहीत.
भूकंप छायेचा प्रदेश म्हणजे काय?
पृथ्वीवर ज्या प्रदेशात भूकंप लहरी पोहोचत नाहीत त्या प्रदेशाला भूकंपछायेचा प्रदेश असे म्हणतात. (P) प्राथमिक लहरी या घनरूप, द्रवरूप व वायुरूप या माध्यमातून प्रवास करतात. परंतु एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना त्यांचे वक्रीभवन होते. (S) दुय्यम लहरी फक्त घनरूप माध्यमातून प्रवास करतात. मात्र द्रवरूप माध्यमातून प्रवास करताना त्या शोषल्या जातात. म्हणजेच (P) प्राथमिक व (S) दुय्यम या लहरींच्या या वैशिष्ट्यामुळे भूकंप छायेचा प्रदेश निर्माण होतो. भूकंप केंद्रापासून उत्सर्जित झालेल्या भूकंप लहरी पृथ्वीवर १०५० पर्यंत सर्व ठिकाणी पोहोचतात. पण १०५ ते १४० या दरम्यानच्या पट्ट्यात प्राथमिक (P) आणि दुय्यम (S) लहरींची नोंद होत नाही. म्हणून या पट्ट्याला भूकंपछायेचा प्रदेश असे म्हणतात. तसेच १४० च्या पढ़े केवळ (P) प्राथमिक लहरी पोहोचतात पण (S) दुय्यम लहरी पोहोचत नाहीत, म्हणून १०५ च्या पुढील प्रदेश हा (S) दुय्यम लहरींचा भूकंप छाया प्रदेश होय. (P) प्राथमिक लहरींचा छाया प्रदेश २०५ ते २४०" च्या दरम्यान असन तो (S) देय्यम लहरींच्या भकंप छायेच्या प्रदेशापेक्षा कमी विस्तारचा आहे.
४ ) ज्वालामुखीय पदार्थांवर टीप लिहा.
उत्तर : (i) ज्वालामुखीचा उद्रेक होताना बाहेर पडणाऱ्या पदार्थांत मुख्यतः द्रवरूप, घनरूप व वायुरूप हे पदार्थ असतात.
(ii) द्रवरूप पदार्थात वितळलेल्या खडकांचा द्रव पदार्थ, द्रवरूप खनिजे, चिखल यांचा समावेश असतो. जेव्हा हा द्रवरूप पदार्थ भूपृष्ठाखाली असतो तेव्हा त्याला 'मॅग्मा' तर तो भूपृष्ठावर येतो तेव्हा त्याला 'लाव्हा' असे संबोधतात.
(iii) घट्ट लाव्हारसात सिलिकाचे प्रमाण अधिक असते. तेव्हा त्याचे संथ गतीने वहन होते. या उलट सिलिकाचे प्रमाण कमी असणारा लाव्हारस अधिक पातळ व प्रवाही असतो. म्हणून तो विस्तृत भागांवर पसरतो व लाव्हा पठाराची निर्मिती होते.
(iv) ज्वालामुखीच्या घनरूप पदार्थांत खडकांचे तुकडे, राख व धुलीकण इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. या सर्वांना 'ज्वालामुखीय धूळ' असे म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान हे पदार्थ हवेत फेकले जातात. तेव्हा त्यांना 'ज्वालामुखीय बॉम्ब' असे म्हणतात.
(v) ज्वालामुखींच्या उद्रेकावेळी त्यांच्या मुखातून विषारी वायू, ज्वालागृही वायू बाहेर पडतात. त्यामुळे मुखात ज्वाला निर्माण होतात. तसेच प्रचंड धूर बाहेर पडतो. त्या धुराच्या ढगांचा आकार 'फुलकोबी' सारखा दिसतो.
(vi) थोडक्यात ज्वालामुखी उद्रेका दरम्यान द्रवरूप, घनरूप व वायुरूप पदार्थ बाहेर पडतात.
प्र.६ ) फरक स्पष्ट करा.
१ ) वलीकरण आणि विभंग
| वलीकरण | विभंग |
|---|---|
| १) भूहालचालींमुळे खडकस्तरांवर ताण निर्माण कारी निर्माणकारी बल एकमेकांच्या दिशेने कार्य करते, बल कार्य करते. जेव्हा ताण निर्माण कारी बाल त्यावेळी बलाचे केंद्रीकरण होऊन खडक स्तरांना बाक येतो किंवा वळ्या पडतात. कधी कधी भेगाही पडतात. या प्रक्रियेला वलीकरण असे म्हणतात. | १) भूहालचालींमुळे खडकस्तरांवर ताण निर्माण कारी बल कार्य करते. जेव्हा ताण निर्माण कारी बाल खडक स्तरांवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करतात तेव्हा विशिष्ट मर्यादेनंतर खडकस्तरांना तडे जाऊन विभंग किंवा प्रस्तरभंग निर्माण होतात. |
| २) वलीकरण प्रक्रियेतून हिमालय, आल्प्स, रॉकीज, अँडीज हे पर्वत निर्माण झाले आहेत. | २) विभंग क्रियेतून भूपृष्ठाचा विस्तृत भाग उंचावतो किंवा खचतो. उंचावलेल्या भागांना गट पर्वत तर खचलेल्या भागांना खच दर्या असे म्हणतात. उदा. ब्लॅक फॉरेस्ट (गट पर्वत), आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली (खचदरी) | ३) वलीकरण प्रक्रिया भूपृष्ठाखालील क्षितिज समांतर हालचालीमुळे घडते. | ३) विभंग प्रक्रिया ही भूपृष्ठाखालील ऊर्ध्वगामी हालचालीमुळे घडते. |
२ ) सामान्य विभंग आणि उलटा विभंग
| सामान्य विभंग | उलटा (उत्क्रम) विभंग |
|---|---|
| १) भूकवचातील बल खडक स्तरांवर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा खडक स्तरीत ताण निर्माण होतो. यामुळे खडकांना भेगा पडून विभंग अथवा प्रस्तरभंग होतो. | १) भूकवचातील दाब निर्माणकारी बल समोरासमोर कार्य करते तेव्हा खडक स्तरांना कठीण खडक असल्याने वळ्या पडत नाहीत. तर त्यांना तडे जांऊन विभंग प्रतलातील एक भाग वर उचलला जातो. |
| २) विभंग प्रतलाजवळील एक भाग खाली सरकल्याने सामान्य विभंग निर्माण होतो. | २) विभंग प्रतला जवळील एक भाग वर उचलल्याने उलटा विभंग निर्माण होतो. |
| ३) यात विभंग प्रतल आकाशाभिमुख असते. | ३) यात विभंग प्रतल भूमी अभिमुख असते. |
३ ) अभिनती आणि अपनती
| अभिनती | अपनती |
|---|---|
| १) यात वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो. | १) यात वलीचा मध्यभाग अधिक उंचीवर असतो. |
| २) यात भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात. | २) यात भुजा विरुद्ध दिशेला उतरतात. |
४ ) सममित वली आणि असममित वली
| सममित वली | असममित वली |
|---|---|
| १)सममित वली म्हणजे वलीच्या दोन्ही बाजू समान उताराच्या असतात. | १) वलीच्या दोन्ही बाजूंपैकी एक बाजू मंद उताराची तर दुसरी तीव्र उताराची असते. वलीच्या भुजा असमान असतात. |
| २) सममित वळीचे प्रतल ऊर्ध्वगामी असते. | २) असममित वळीचे प्रतल अधोगामी असते. |
५ ) मर्केली प्रमाण आणि रिश्टर प्रमाण
| मर्केली प्रमाण | रिश्टर प्रमाण |
|---|---|
| १)मर्केली हे भूकंप मापनाचे प्रमाण असून ते भूकंपाची तीव्रता दर्शवते. | १) भूकवचात उभ्या दिशेत (ऊर्ध्वगामी) कार्य करणाऱ्या भूकंप व ज्वालामुखी या प्रमुख दोन शीघ्र हालचाली आहेत. |
| २) मर्केली हे रेषीय परिमाण आहे. | १) रिश्टर प्रमाण हे भूकंपाची महत्ता दर्शवते. |
| ३) । ते XII हे भूकंपाचे तीव्रता मोजण्याचे अंक असतात. | ३) रिश्टर प्रमाणात < २.० पासून १०.० + पर्यंत अंक असतात. |
| ४ ) मर्केली प्रमाणात । तीव्रतेचा अंक भूकंप जाणवत नाही, परंतु XII संपूर्ण नाश दर्शवितो. | ४) रिश्टर प्रमाणात २ पेक्षा कमी क्षमतेचे भूकंप नोंदले जात नाहीत. शिवाय ते जाणवतही नाहीत. ५ पेक्षा अधिक क्षमतेचे भूकंप विध्वंसक असतात.पृथ्वीवर भूकंप व ज्वालामुखीचे पट्टे एकत्र आढळतात. |
६ ) मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली
| मंद हालचाली | शीघ्र हालचाली |
|---|---|
| १) पृथ्वीच्या अंतर्गत बलांमुळे ज्या हालचाली घडून येतात त्या हालचालींना भूविवर्तनकी हालचाली असे म्हणतात. | १) भूकवचात उभ्या दिशेत (ऊर्ध्वगामी) कार्य करणाऱ्या भूकंप व ज्वालामुखी या प्रमुख दोन शीघ्र हालचाली आहेत. |
| २)या लचालींचे ऊर्ध्वगामी व क्षितिजसमांतर असे दोन गट केले जातात. | २) भूकवचातील खडक स्तरात प्रचंड ताण साचून ऊर्जा लहरींची निर्मिती होते. तेव्हा भूकंप ही शीघ्र हालचाल सुरू होते. |
| ३) ऊर्ध्वगामी हालचालींमुळे भूखंड तर क्षितिजसमांतर हालचालींमुळे पर्वत निर्माण होतात. | ३)बाह्य प्रावरणातील वायुरूप, द्रवरूप व घनरूप हे पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. त्या क्रियेला ज्वालामुखी असे म्हणतात. |
| ४) भूकवचातील ताण व दाब या बलांमुळे मंद हालचाली घडतात. | ४) पृथ्वीवर भूकंप व ज्वालामुखीचे पट्टे एकत्र आढळतात. |
प्र.७ ) आकृती काढा.
१ ) वळ्यांचे प्रकार
२ ) विभंगाचे प्रकल
३ ) भूकंपछाया प्रदेश
४ ) ज्वालामुखीय भूरुप


