border="0"
data-original-height="720"
data-original-width="1280"
src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBmjd50HPLc28DFzzwRt6WlCiwFYEc2K-a_TgzGUvP3C7ti9h2VXigLkow2TuaeBA91sdPj9E-XTx3eCU0nvUU3AAGW8Cx-xmHkTodaYbgQUSJ7Y2JxEWWRfF9BmuuZZWSEASeEtzKuKi4-2J4HWHcly60wjua91_DRlL9IoGYRf9gZttn1fSaw_Z1z7U/s1600/%E0%A5%A8.%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8B%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20.png"
style="display:none"
/>
२. बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolato Marathi swadhyay 10th class |
bolato marathi
(१) आकृत्या पूर्ण करा.
(२) शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.
(३) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) मराठी भाषेची खास शैली - वाक्प्रचार
(आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा - नदीसारखी प्रवाही
(इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन - शब्दकोश
(४) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन - चैन
(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल - हस्त
(इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय - विनोद
(ई) संपत्ती, संपदा, कांता, दौलत - कांता
(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध - प्रज्ञा
>(५) खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून
प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
(अ) रस्ते - रस्ता
वाक्य : हा रस्ता खड्डे पडून खराब झाला आहे.
(आ) वेळा - वेळ
वाक्य : बस येण्याची वेळ झाली.
(इ) भिंती - भिंत
वाक्य : ही भिंत जुनी असूनही मजबूत आहे.
(ई) विहिरी - विहीर
वाक्य : ही विहीर खूप खोल आहे.
(उ) घड्याळे - घड्याळ
वाक्य : हे घड्याळ खूप महाग आहे.
(ऊ) माणसे - माणूस
वाक्य : माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो.
(६) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(अ) पसरवलेली खोटी बातमी - अफवा
(आ) ज्याला मरण नाही असा - अमर
(इ) समाजाची सेवा करणारा - समाजसेवक
(ई) संपादन करणारा - संपादक
(७) स्वमत.
(अ) ‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा
लिहा. >
उत्तर : (१) धातू , (२) हुशार, बुद्धिमान, समजूतदार , (३) मठ्ठ
‘तुम्ही शहाणे आहात,’ असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी ऐकणाऱ्याच्या
समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या
मुलांना हे उद्गार ऐकवते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच
खात्री असते. मात्र प्रत्येक वेळेला ‘तुम्ही शहाणे आहात,’ या वाक्याचा असा
सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड
असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी कधी तर काही माणसांना
खरोखरच साधी, सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना
ते समजतच नाही. मग त्यांना ‘तुम्ही शहाणे आहात,’ असे ऐकवावे लागते. येथे
‘शहाणे’ हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात ‘तुम्ही मूर्ख आहात,’
असेच म्हणत असतो.
>(आ) ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या
मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. >
उत्तर : ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’
लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. सध्या मराठी भाषेवर इंग्रजी
भाषेतील अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसत आहे. मराठी भाषेत अनेक
इंग्रजी शब्द सर्रास वापरल्या जात आहेत. ‘हे किती छान आहे’ असं
म्हणण्याऐवजी ‘हे किती सुपर आहे असं म्हणल्या जाते. कॅलेंडर या शब्दाचा
मराठी भाषेतील शब्द मुलांना लवकर सांगता येणार नाही. असे अनेक शब्द मुलं
इंग्रजी भाषेत सहज सांगतात पण त्यांना मराठी भाषेत काय म्हणतात हे माहीत
नसते.
(इ) लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. त्याही पुढे जाऊन लेखिका म्हणतात होय माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. वाक्प्रचार हे मराठी भाषेची खास शैली आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. जसे ‘खाणे हे एक साधे क्रियापद आहे. खाऊ खाणे, मार खाणे, शपथ खाणे, शेण खाणे, लाता खाणे अशा अनेक अर्थछटा या एका शब्दात लपलेल्या आहेत. मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे असे लेखिका म्हणतात.

