प्रश्न १. पुढील विधानांवरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
(अ) मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.
उत्तर : परदेशी पर्यटन
(आ) गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.
उत्तर : परदेशी पर्यटन
(इ) नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.
उत्तर : वैद्यकीय पर्यटन
(ई) पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.
उत्तर : धार्मिक पर्यटन
(उ) पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.
उत्तर : कृषी पर्यटन
(ऊ) सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.
उत्तर : धार्मिक पर्यटन
प्रश्न २. 'अ' गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा.
उत्तरे :
| (१) ताडोबा | चंद्रपूर | वाघ |
| (२) पक्षी अभयारण् | नान्नज | माळढोक |
| (३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान | मुंबई | कान्हेरी लेणी |
| (४) ताजमहाल | आग्रा | जगप्रसिद्ध आश्चर्य |
| (५) रामोजी फिल्म सिटी | हैदराबाद | चित्रनगरी |
| (६) राधानगरी | कोल्हापूर | रानगवा |
| (७) भिमबेटका | मध्यप्रदेश | प्राचीन गुंफाचित्रे |
| (८) प्राचीन लेणी | वेरूळ | कैलास लेण |
| (९) ईगलनेस्ट वन्य जीव अभयारण् | अरुणाचल प्रदेश | फुलपाखर |
| (१०) लोकटक | मणिपूर | सरोवर |
प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा
उत्तर : धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक पुढीलप्रमाणे आहे : (१) देवदर्शन, यात्रा इत्यादी कारणांसाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे, 'धार्मिक पर्यटन' होय, याउलट संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे, 'सांस्कृतिक पर्यटन' होय. ( धार्मिक पर्यटनात देवदेवतांच्या मंदिरांना, साधुसंताच्या समाधीस्थानांना भेटी देणे, त्या स्थळी विविध धार्मिक विधि करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो, याउलट सांस्कृतिक पर्यटनात एखादया ठिकाणच्या चालीरीतींची, लोककलांची, रूढी परंपरांची माहिती मिळवणे व तेथील लोकजीवन प्रत्यक्ष अनुभवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो .
(आ) पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ?
उत्तर : पर्यटनाचे पुढील उद्देश असतात :
(१) आनंद मिळवणे (२) मनोरंजन करणे (३) व्यापार करणे (४) निवास करणे (५) वैद्यकीय सेवा प्राप्त करणे (६) ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे (७) धार्मिक कार्ये करणे इत्यादी.
(इ) पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा.
उत्तर : (१) पर्यटन करताना काही वेळा पर्यटकांकडून पर्यावरणास हानी पोहोचू शकते, पर्यावरणाचा -हास होऊ शकतो. काही प्रसंगी पर्यटकांनी पर्यटनस्थळी कचरा फेकला असता तेथे प्रदूषण होऊ शकते.
(२) परंतु पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अवलंब केला असता, पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही व पर्यावरणाचा -हास होणार नाही याची काळजी घेतली जाते व त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो.
(३) पर्यटन पर्यावरणस्नेही पर्यटन केले असता, ध्वनिप्रदूषण टाळले जाते, वृक्ष व वन्य पशुपक्षी यांची दक्षता घेतली जाते व पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ व आल्हाददायी राहते.
(४) पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो.
(५) निवासस्थाने, रिसॉर्टस, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांचीरचनादेखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते.
(६) या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते.
(७) पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते.
(ई) पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात ?
उत्तर : पर्यटन विकासातून पुढील संधी निर्माण होतात :
(१) उपाहारगृहे (२) दुकाने (३) वाहतूक सेवा (४) मनोरंजन (५) निवासस्थाने (६) वैदयकीय सेवा (७) व्यापार (८) बैंकिंग सेवा
इत्यादी.
(उ) पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.
उत्तर : (अ) पर्यटनाच्या ठिकाणी पुढील (क्षेत्रांत) समस्या उद्भवू शकतात :
(१) निवासस्थानांच्या अभावाची समस्या
(२) वाहतुकीच्या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याची समस्या
(३) पर्यावरणीय समस्या
(४) वैदयकीय सेवांचा अभाव असण्याची समस्या
(५) संपर्कसाधनांची उपलब्धता नसल्याची समस्या इत्यादी.
(ख) पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांवरील उपाययोजना : (१) शासनाने पर्यटनाच्या ठिकाणी वाजवी मोबदल्यात पुरेशाप्रमाणात निवासाच्या व्यवस्था उपलब्ध करून देणे.
(२) वाहतुकीच्या जलदसेवा खेडोपाड्यांपर्यंत पोहोचवणे.
(३) पर्यटन ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करणे व त्यांना पर्यटन स्थळे स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे अधिकार देणे.
(४) पर्यटन स्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपात उपलब्ध करून देणे.
(५) सुलभतेने संपर्क साधता यावा यासाठी पर्यटक संपर्क कक्ष निर्माण करणे इत्यादी.
(ऊ) आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा.
उत्तर :
(अ) आपल्या जिल्ह्यात पुढील पर्यटन स्थळे विकसित करता येतील : (१) नांदगाव (२) उन्हेरे (३) प्रतापगड (४) कर्जत (५) मुरुड (६) रेवदंडा इत्यादी.
(ब) आपल्या जिल्ह्यात वरील पर्यटन स्थळे विकसित करता येण्यामागची कारणे : (१) नांदगाव, रेवदंडा, मुरुड येथे नयनरम्यकिनारे आहेत.
(२) रेवदंडा येथील किनाऱ्याच्या आधारे भूरूपांची निर्मिती कशी होते याचा अभ्यास करणे शक्य आहे.
(३) उन्हेरे येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
(४) प्रतापगड या स्थळास ऐतिहासिक महत्त्व आहे.
(५) त्यामुळे रेवदंडा, उन्हेरे, प्रतापगड या ठिकाणी शैक्षणिकपर्यटनाची संकल्पना राबवणे शक्य आहे.
(६) कर्जत येथे कृषिपर्यटनाची संकल्पना राबवणे शक्य आहे. (नोंद विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्ही रायगड तालुक्यात राहत असल्याचे गृहीत धरले आहे. तुम्ही प्रत्यक्षात ज्या जिल्ह्यात राहता, त्यानुसार वरील प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.)
(ए) पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.
उत्तर : (१) पर्यटन विकासातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैदयकीय सेवा, व्यापार, बैंकिंग इत्यादी सेवांच्या गरजा निर्माण होतात.
(२) पर्यटकांना या विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारे, पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.
प्रश्न ५. पर्यटनासंबंधी 'अतिथी देवो भव' ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर : (१) पर्यटन विकासातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैदयकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
(२) पर्यटनामुळे पायाभूत सेवांचा विकास होतो.
(३) पर्यटनामुळे देशास परकीय चलन प्राप्त होते.
(४) पर्यटनामुळे देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पर्यटनासंबंधी 'अतिथी देवो भव' ही भूमिका अतिशय योग्य आहे.
प्रश्न ६. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.
उत्तर : (१) वज्रेश्वरी (२) उन्हवरे (३) उनपदेव (४) सव (५) कापेश्वर (६) उनकेश्वर इत्यादी. या ठिकाणी भूअंतरंगात तुलनेने अधिक उष्णता असल्यामुळे येथे गरम पाण्याचे झरे असण्याची शक्यता आहे.
(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो ?
उत्तर : वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळांचा विकास यांचा सहसंबंधपुढील ठिकाणी दिसून येतो :
(१) मुंबई (२) पुणे (३) नागपूर (४) नाशिक (५) कोल्हापूर (६) नांदेड (७) शेगाव (८) औरंगाबाद (९) रत्नागिरी (१०) सोलापूर.


