६. महासागर साधनसंपत्ती

Ranjit Shinde




६. महासागर साधनसंपत्ती स्वाध्याय | Mahasagar Sadhansampatti swadhyay 11th























प्र. १) साखळी पूर्ण करा :





























समुद्रबुड जमीन जास्त खोलीचा भाग मॉगेनीज खडे
सागरी सूक्ष्मजीव सागरी मैदान देवमासा
सागरी गर्ता मासेमारी सुंदा
विस्तृत सपाट क्षेत्र प्लवंक डॉगरबॉक



उत्तर :























समुद्रबुड जमीन मासेमारी डॉगरबॉक
सागरी सूक्ष्मजीव प्लवंक देवमासा
सागरी गर्ता जास्त खोलीचा भाग सुंदा
विस्तृत सपाट क्षेत्र सागरी मैदान मॉगेनीज खडे










प्र.२) अचूक सहसंबंध ओळखा :

A : विधान, R : कारण

१) A : भूखंडमंच मानवासाठी महत्‍त्‍वपूर्ण आहेत.

R : येथे विस्‍तृत मासेमारी क्षेत्र आढळते.

अ) केवळ A बरोबर आहे.

आ) केवळ R बरोबर आहे.

इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.

ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.


उत्तर : इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.



२) A : खंडान्त उतारावर संचयन प्रक्रिया अधिक होते.

R : या भागाचा उतार तीव्र असतो.

अ) केवळ A बरोबर आहे.

आ) केवळ R बरोबर आहे.

इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.

ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर : आ) केवळ R बरोबर आहे.



३) A : सागरी बेटे ही खरे तर समुद्रबुड पर्वताची शिखरे असतात.

R : काही समुद्रबुड पर्वतांची शिखरे समुद्रपातळीच्या वर येतात.


अ) केवळ A बरोबर आहे.

आ) केवळ R बरोबर आहे.

इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.

ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.

उत्तर : इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.



४) A : सागरी मैदान हा सागराचा सर्वांत खोल भाग असतो.

R : ही सागरतळाशी असतात.

अ) केवळ A बरोबर आहे.

आ) केवळ R बरोबर आहे.

इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहे आणि R हे A चे अचूक स्‍पष्‍टीकरण आहे.

ई) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.





उत्तर : आ) केवळ R बरोबर आहे.



प्र. ३) भौगोलिक कारणे लिहा :

१) भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो.

उत्तर : १) किना-यालगत असलेला व जलमग्न भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय.

२) हा भाग जलमग्न, रुंद, उथळ, मंद उताराचा असतो. भूखंड मंचाची सरासरी खोली १८० ते २०० मी. इतकी असते.

३) भूखंड मंचाचा भाग उथळ असल्याने सूर्यकिरणे समुद्राच्या तळापर्यंत जातात. त्यामुळे तेथे प्लवंक नावाची वनस्पती उगवते.

४) प्लवंक नावाची वनस्पती माशांचे आवडते खादय असते,तेथे माशांची खूप मोठ्या प्रमाणावर पैदास होते. त्यामुळ जगातील सर्व प्रमुख मासेमारीची क्षेत्रे भूखंडमंचावर आढळतात.

इत्यादी सर्व कारणामुळे भूखंडमंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो.








२) सागरी गर्ताबद्‌दलचे आपले ज्ञान मर्यादीत आहे.

उत्तर : १) सागरातील सर्वांत खोल भूभागास सागरी गर्ता असे म्हणतात.

२) सागरी गर्ताची खोली सुमारे ८ हजार मीटर पेक्षा जास्त खोलीचे असतात.

३) इतक्या खोलीवर सूर्यप्रकाश अजिबात पोहचत नाही. तसेच पाण्याचा दाबही प्रचंड प्रमाणात असतो.

४) गर्ता या कमी रुंदीच्या व दूरवर पसरलेल्या असतात. जास्त खोलीपर्यंत मानव सहज पोहचू शकत नाही.

सागरीची जास्त खोली, पाण्याचा दाब व उजेडाचा अभाव यांमुळे सागरी तांबद्दलचे आपले ज्ञान मर्यादित आहे.




३) महासागर हे खनिजांचे आगार असतात.

उत्तर : १) महासागरात द्राव्य व विद्राव्य अवस्थेत अब्जावधी टन खनिजे आहेत. सागरात सर्व प्रकारची खनिजे आहेत.

२) सागरी क्षेत्रात विपुल जैविक साधनसंपत्ती आहे.या विपुल खनिजसंपत्ती पैकी फक्त काही टक्केच खनिजसंपत्तीचे उत्खनन झालेले आहे.

३) सागरातील खनिजसंपत्तीचा खूप कमी उपयोग आतापर्यंत मानवाने केला आहे. जर आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले तर उपलब्ध खनिजसंपत्तीचा वापर मानवाला करता येईल व मानवाचा विकास होण्यास मदत होईल. म्हणजेच महासागर हे खनिजांचे आगार आहेत.





४) महासागराखाली सुद्धा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत.

उत्तर : १) विसाव्या शतकात मानवाला सागराच्या भूआकारांचा शोध व संशोधन करण्यात यश मिळाले.

२) भूपृष्ठाप्रमाणे सागरामध्ये सुद्धा अनेक भूरूपे आढळून येतात.

३) मागील हजारो वर्षांत महत्वाचे सागरी शोधमोहिमांद्वारे मानवाने सागरी क्षेत्राचा अभ्यास केला.

४) त्यानंतर सागरी खोलीचा अभ्यास, सागरी क्षेत्राचे नकाशे तयार केले गेले. अनेक धाडसी खलाशांनी वैश्विक परिक्रमाही केल्या आहे.

५) त्यातून अनेक खंडे, बेट, देश यांचा शोध लागला. जसे, भूपृष्ठांवर पर्वतशिखरे असतात, तशीच पर्वतशिखरे पाण्याखाली असतात, त्यापैकी जी पर्वतशिखरे जलपृष्ठावर येतात, त्यांना सागरी बेटे म्हणतात.

६) भूपृष्ठावर खोल दरी असते, त्याप्रमाणे महासागरात सागरी गर्ता असते. थोडक्यात, महासागराखाली अनेक भूरूपे असून त्यांना जलमग्न भूरूपे असेही म्हणतात.










प्र. ४) टीपा लिहा :

१) विशेष आर्थिक विभाग

उत्तर : पृथ्वीवर भूखंडाचे विभाजन करून आपण भौगोलिक सीमा प्रस्थापित केल्या आहेत. महासागराच्या बाबतीत तसे शक्य नाही. फक्त सपाट व विस्तृते हेच त्याचे वैशिष्टय. त्यामुळे महासागराचे विभाज करणे अशक्य असते त्यामुळे महासागरावर सर्वांची मालक असते व त्यामुळे त्यांची मालकी ठरविणे अशक्य असते. त्यामुळे सर्व देशांनी मिळून 'सागरी कायदा' म्हणून एक औपचारिक करार केला आहे.

असे असले तरी, ज्या देशांना सागरी सीमाक्षेत्र आहे, त्या देशांसाठी त्यांच्या सागरी किना-यापासून १२ नाविक मैलापर्यातचा प्रदेश हे त्या देशाचे प्रादेशिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय तो देश आपल्या किना-यापासून २०० नावीक मैलापर्यंत प्रदेश विशेष आर्थिक क्षेत्र (Exclusive Economic Zone) म्हणून वापरतो. विशेष आर्थिक क्षेत्रातील खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादि इंधने, निकेल, लोह, मॅगनीज इत्यदि खनिजे उत्खनन करण्याचा अधिकार विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये संबंधित देशांना असतो.

एकूणच ज्या देशांना सागरी किनारा लाभलेला आहे ते देश विशेष आर्थिक क्षेत्राचा फायदा घेऊनस्वत:ची प्रगती करताना दिसत आहेत. उदा. भारत.





२) सागरी पर्यटन

उत्तर :महासागराचे मानवास दैनंदिन जीवन जगत असताना खूप मोठया प्रमाणात फायदे होतात. त्यामधील एक महत्वाचा फायदा म्हणजे सागरी पर्यटन होय.

महासागरामुळे नवनवीन पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. त्याचबरोबर पर्यटनाच्याही नवनवीन संकल्पनांचा पुरस्कार होत आहे.
महासागर पर्यटनात नौका विहार, पाणबुड्या (स्कूबा डायव्हिंग) मासेमारी, पुळण पर्यटन इ. घटकांचा विचार केला जातो. सागरी पर्यटन हा पर्यटनाचा एक नवीन प्रकार उदयास आला आहे.

उदा→ यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राती कोकण किनारपट्टीवर सागरी पर्यटन चालते. तसचे गोवा किनारा, चैन्नई किनारी प्रदेश या ठिकाणी मोठया प्रमाणात सागरी पर्यटन विकसीत होत आहे.




३) सागरातील खनिजांची विपुलता

उत्तर :भूपृष्ठाच्या तुलनेत महासागराचे क्षेत्रही विस्तृत आहे. आतापर्यंत मानवाने प्रामुख्याने भूपृष्ठावर आढळणा-या खनिजांचाच वापर केला असून सागरातील खनिज संपत्तीचा वापर फारच अल्प प्रमाणात केला आहे. सागरतळावर, विशेषत: भूखंडमंचावर व सागरी मैदानावर अब्जावधी टनांचे खनिजांचे भांडार उपलब्ध आहे.

महासागराच्या तळाशी लोह, निकेल, मॅगनीज, यूरेनिअम, मीठ, इत्यादि खनिजे उपलब्ध आहेत. त्याशिवाय खनिज तेल, नैसर्गिक वायू ही इंधनेही मोठया प्रमाणावर आहेत. काही ठराविक ठिकाणी चुनखडक, जिप्सम, प्रवाळही उपलब्ध आहेत. हिंदी महासागराम मोठया प्रमाणात मॅगनीजचे साठे आहेत.

भविष्यामध्ये लोकसंख्या वाढल्यास त्यांच्या गरजा महासागरातील खनिजांमधून भागवली जावू शकते.





४) खंडान्त उतार आणि संचयन


उत्तर :समुद्रबुड जमिनीच्या समुद्राकडील तुलनात्मकदृष्ट्या तीव्र उताराला 'खंडान्त उतार असे म्हणतात.

महासागर तळरचेनेचा क्रमवार मांडणीचा विचार केल्यास किना-याला लागून सर्वप्रथम भूखंडमंच असतो व त्यांनंतर खंडान्त उतार हे जलमग्न भूरूप आढळते. थोडक्यात, खंडान्त उतार हा तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने या भागावर गाळाचे संचयन मर्यादित होते. कारणे किनाऱ्यापासून तो दूर असल्याने नद्यांनी वाहून आणलेला गाळ तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे खंडान्त उतारावर गाळाचे प्रमाण कमी आढळते. एकंदरीतच खंडान्त उताराच्या तीव्र उताराच्या भूरूपामुळे संचयन खूपच कमी असते.

त्याशिवाय खंडात उतार ही भूखंडाची सीमारेषा मानली जाते. खंडान्त उताराचा कोनही तीव्र असल्याने वाहून आलेला गाळ खंडान्त उतारापर्यंत पोहोचलाच तरी तो खंडान्त उताराच्या तीव्र उतारामुळे संचयित होत नाही.










प्र. ५) पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा :


१) महासागरातील प्रदूषण मानवासाठीच घातक ठरणार आहे चर्चा करा.

उत्तर : (१) मानवाने आतापर्यंत स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर सर्वच क्षेत्रात प्रगती केलेली दिसून येते. मानवाने भूभागावरील तसेच सागरातील खनिजसंपत्तीचा वापर स्वतःसाठी केलेला आहे.

(२) मानवाने स्वत:ची प्रगती करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले. काही चुका अजाणतेपणी झाल्या. पण काही चुकांकडे मात्र मानवाने जाणुनबुजून दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम मानवाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत.

(३) सागरातील पाण्याच्या प्रदूषणाची पातळी मानवी चुकांमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. नद्या जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा त्यांच्याबरोबर बरेच त्याज्य पदार्थ असतात. त्यामध्ये घरातील सार्वजनिक ठिकाणांवरील उदयोग व्यवसायांतील कचरा, सांडपाणी, जडधातू, प्राण्यांची तसेच माणसांची मृत शरीरे. शेतीतील त्याज्य घटक - कीटकनाशके, घातक रसायने, प्लॅस्टिक इ. घटकांचा समावेश होतो.

(४) सागरातील पाण्याच्या प्रदूषणाची पातळी मानवी चुकांमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. नद्या जेव्हा ठिकाणांवरील उदयोग व्यवसायांतील कचरा, सांडपाणी, जडधातू, प्राण्यांची तसेच माणसांची मृत शरीरे. शेतीतील त्याज्य घटक - कीटकनाशके, घातक रसायने, प्लॅस्टिक इ. घटकांचा समावेश होतो.

(५) तेलवाहू जहाजातून होणारी तेलाची गळती , किनारी भागातील तेलाचे खाणकाम, किरणोत्सारी पदार्थांसारख्या घनकचऱ्याची विल्हेवाट, अणुचाचण्या यांमुळे सागराचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. या व इतर कारणांमुळे सागरातील प्रदूषण वाढत आहे.

(६) मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गातील सर्वच घटकांचा पुरेपुर वापर करून घेतला. महासागरही यातून सुटले नाहीत. पण हे करत असताना पर्यावरणाचे संतुलन बिघडत गेले. सागरात जाणाऱ्या अनावश्यक त्याज्य पदार्थांमुळे सागरी जीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कारण सागरी जीवांपासून मानवाला प्रचंड प्रमाणात फायदा होत आहे. सागरातील मासे अन्न म्हणून आहारात उपयोगी आहेत. तसेच सौंदर्य प्रसाधने, तेल, खते इत्यादी उदयोगांत मासे हा घटक सर्वांत महत्त्वाचा आहे.

(७) कारखान्यातील दूषित पाणी, विविध प्रकारची रसायने, प्लेस्टिक प्रचंड प्रमाणात सागरात मिसळते. याचा परिणाम भविष्यकाळात किनारपट्टीवरील लोकांना भोगावा लागणार आहे. पर्यटकांकडूनसुद्धा कळत नकळतपणे अनेक प्रकारच्या चुका होतात याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम सागरातील पाण्यावर होतो. पाण्याचे प्रदूषण वाढते. या प्रदूषणामुळे अनेक सागरी जीवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. बऱ्याचशा किनारपट्ट्यांवर सध्याच्या काळात मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.

याचाच अर्थ मानवाने केलेल्या चुकांमुळेच निर्माण होणारे प्रदूषण काही काळानंतर मानवासाठीच घातक ठरणार आहे.












२) भूपृष्ठावरील भूरूपे आणि सागरतळरचनेत साम्य आढळते चर्चा करा.

उत्तर : (१) भूपृष्ठावरील भूरूपे आणि सागरतळरचना यात बन्याच मोठ्या प्रमाणात साम्य आढळते.
भूपृष्ठावर ज्याप्रमाणे पर्वत, पठारे, मैदाने आढळतात. तशाच प्रकारचे भाग सागरतळरचनेत आढळतात. १९ व्या शतकाच्या पूर्वी सागरतळरचनेचा शास्त्रशुद्ध अभ्यास होत नव्हता. परंतु १९ व्या शतकानंतर महासागर तळ रचनेचा शास्त्रशुद्ध अभ्यास होऊ लागला. सन १९२० पासून प्रतिध्वनी आरेखक यंत्राचा वापर नियमितपणे होऊ लागला. त्या आधारे नकाशाकारांनी विविध सागर तळाचे नकाशे बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा होत गेला.

(२) भूभागावर ज्याप्रमाणे पर्वतांची रांग आढळते. (हिमालय, रॉकी, आल्प्स, अँडीज) त्याचप्रमाणे सागरतळ रचनेतसुद्धा पर्वत रांगांची संख्या अधिक आहे. जलमग्न मध्यवर्ती पर्वत श्रेणी अनेक शिखरे साग पातळीवर डोकावतात. त्यामुळे बेटांची मालिका तयार होते. यात खंडीय बेट, ज्वालामुखीय बेट, प्रवाळ बेट हे प्रमुख बेटांचे प्रकार आहेत.

(३) सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यफूलाच्या निर्मितीवेळी पृथ्वी एक तप्त वायुरूप गोळा होता. उष्णता विसर्जनामुळे पृथ्वी वायुरूपातून द्रवरूपात आली. तापमान जसजसे कमी होऊ लागले तसतशी ती घनरूपात येऊ लागली. थंड होण्याची क्रिया पृष्ठभागावर वेगाने तर अंतर्भागात हळूहळू झाली असावी. त्यामुळे धनकवचाची निर्मिती झाली असावी. पृथ्वी थंड होताना उष्णतेबरोबर वेगवेगळे वायू बाहेर पडले असावेत. ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संयोग होऊन सांद्रीभवनामुळे पाण्यात रूपांतर झाले व ते पाणी खोल खळग्यात साचले. त्यातून जलावरण निर्माण झाले.

(४) ज्याप्रमाणे भूभागावर सपाट माथा असणारे भाग आहेत तसेच सागरतळावरसुद्धा असे भाग आहेत,
त्यांना सागरी पठार असे म्हणतात. उदा. हिंदी महासागरातील छागोस पठार. अशीच पठारांची मालिका इतर महासागरांमध्येसुद्धा असल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही उंचवट्यांचे प्रदेश आहेत. तसेच उंचवटे महासागरांमध्ये आहेत. सागरी उंचवटे हजारो वर्षांच्या संथ प्रक्रियेतून निर्माण झाले आहेत. हे उंचवटे विशिष्ट प्रकारच्या सजीवांचे अधिवास आहेत. हिमालय पर्वतातील माऊंट एवरेस्ट शिखर हे ८८४८ मी उंचीचे जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्याचप्रकारे पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता सुमारे ११ कि.मी. खोल आहे. तीव्र पर्वताचे उतार भूखंडावर आहेत तसेच उतार सागरातही आहेत. भूखंडावरील मैदानांप्रमाणेच सागरी मैदानेसुद्धा आहेत. याचाच अर्थ भूभागावरील भूरूपांसारखीच सागरतळ रचना आहे.











प्र. ६) खालील घटक जगाच्या नकाशावर सूचीसहित दाखवा

१) छागोस रांगा

२) मरियाना गर्ता

३) डॉगर बँक

४) मुंबई हाय

५) सुंदा गर्ता

६) ग्रँड बँक