४. प्रदूषण

Ranjit Shinde
Pollution Meaning, Definition (प्रदूषण चा अर्थ व्याख्या )

प्रदूषण म्हणजे काय

प्रदूषण म्हणजे घातक दूपित किंवा तत्सम पदार्थाचा पर्यावरणात होणारा निचरा सामान्यतः प्रदूषण हा मानवी क्रिया- प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात.

प्रदूषणाचे स्त्रोत

गंभीर प्रदूषण स्त्रोतांमध्ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचन्याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्हीसी प्लास्टिक तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्‌या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे. प्रदूषणाचे काही स्त्रोत, उदा. आण्विक ऊर्जा संयंत्रे किंवा तेलाच्या टाक्या यांना अपघात घडल्यास फार गंभीर प्रदूषण निस:रित होऊ शकते. आणखी काही सर्वसामान्य प्रकारच्या प्रदूषण स्त्रोतांमध्ये क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स् (CFH), शिशासारखे अवजड धातू (उदा. लेड पेंट व आतापर्यतचे पेट्रोल). कॅडमियम ( रीचार्जेबल बॅटरीमधील), क्रोमियम, जस्त, आर्सेनिक आणि बेंझिन यांचा समावेश आहे. प्रदूषण हा बहुतेक नैसर्गिक आपत्तींचा एक गंभीर दुष्परिणाम देखील आहे. उदाहरणार्थ जोराचे चक्रीवादळ झाल्यास सांडपाण्याचे प्रदूषण आणि उलटलेल्या नौका, वाहने किंवा किनारपट्टीय तेल शुद्धीकरण प्रकल्पांपासून होणारे पेट्रोकेमिकल प्रदूषण होऊ शकते.

प्रदूषणाचे प्रकार

पारंपारिक प्रदूषणांच्या स्वरूपांमध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्सर्गी (रेडियोऍक्टिव्ह) दूषित पदार्थांचा समावेश आहे तर जहाजांपासून होणारे प्रदूषण, प्रकाशाचे तसेच ध्वनि प्रदूषण ही प्रदूषण ह्या शब्दाची विस्तृत व्याख्या आहे.

ध्वनि प्रदूष

कारखान्यांमध्ये चालणाऱ्या मोठ्या आवाजातील यंत्रसामग्री आणि इतर मोठा आवाज करणाऱ्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते. यासोबतच लाऊड स्पीकर, फटाके, रस्त्यावरील वाहतुकीचा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणात आणखी भर पडते. लोकांमध्ये मानसिक तणावाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे ध्वनी प्रदूषण, ज्याचे मेंदूवर अनेक नकारात्मक दुष्परिणाम होतात आणि ऐकण्याची तीक्ष्णता कमी होते.

ध्वनि प्रदूषण हा हवा प्रदूषणाचा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे आकलन आता जास्त चांगल्या प्रकारे झालेले आहे. ध्वनि हा हवेच्या माध्यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्यापक गुणवत्ता पातळीमध्ये केले जाते. ध्वनिचे मापन डेसिवलमध्ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्त जोराच्या आवाजामुळे बधिरत्व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शहरासाठी ध्वनि स्तराचे सुरक्षित मापन 45 डेसिबल असल्याचे निश्चित केलेले आहे. भारतातील महानगरी क्षेत्रांमध्ये बहुतेक 90 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनिपातळीची नोंद केली जात आहे, मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे ध्वनिप्रदूषित शहर आहे, आणि अशाच प्रकारचे ध्वनिप्रदूषण स्तर दिल्लीचे ही आहे.

आवाज किंवा ध्वनिमुळे फक्त चिडचिड किंवा रागच येत नाही तर यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात, आणि ऍन्ड्रेलिनचा प्रवाह वाढतो. यामुळे हृदयाच्या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्या आवाजामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते ज्यामुळे रक्तवाहिन्या कायमच्या संकुचित होऊन हृदयाघात आणि हार्ट स्ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्त ध्वनि किंवा आवाजामुळे न्यूरोसिस आणि नर्व्हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे.

जलप्रदूषण

काहीवेळा, घरे आणि व्यवसायातील कचरा नद्या आणि इतर पाण्यातील कचरा मिसळतो, ज्यामुळे ते प्रदूषित होते. आपल्या नद्या, ज्यांना पूर्वी शुद्ध आणि पवित्र म्हणून पूज्य मानले जात होते, आता त्यामध्ये आढळून आलेला प्लास्टिक कचरा, रासायनिक कचरा आणि इतर नॉन बायोडिग्रेडेबल डेब्रिजमुळे अनेक रोगांचे निवासस्थान बनले आहे. जेव्हां विषारी पदार्थ तलाव, ओढा, नद्या, समुद्र आणि इतर जलाशयांमध्ये प्रवेश करतात तेव्हां ते पाण्यामध्ये विरघळून जातात किंवा तळाशी जाऊन कुजतात किंवा पाण्यावरच अवक्षेपित होतात. परिणामी जलप्रदूषण होते ज्यामुळे पाण्याच्या गुणवतेचा ह्रास होऊन जलपर्यावरण प्रणालींवर दुष्परिणाम होतो. प्रदूषक पदार्थ जमिनीखाली देखील जाऊन बसू शकतात आणि यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषण हैं फक्त

मानवासाठीच नव्हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्यांसाठीही विनाशकारी आहे. प्रदूषित पाणी हे पिण्यासाठी, त्यात खेळण्यासाठी ऐसी आणि उद्योग हमासाठीदेखील अयोग्य आहे. याच्यामुळे सरोवरे आणि यांच्यासम गुणवत्तेचा नाश होतो.

वायू प्रदूषण

कारखाने आणि मोटारगाड्यांमधून निघणारा धूर हे वायू प्रदूषणाचे प्राथमिक कारण आहे, ज्याला प्रदूषणाचा सर्वात हानिकारक प्रकार मानला जातो. या स्त्रोतांमधून येणाऱ्या हानिकारक धुरामुळे लोकांच्या श्वास घेण्याची क्षमता आणखी बाधित होत आहे. वाढत्या उद्योगधंद्याने आणि मोटारगाड्यांमुळे वायू प्रदूषणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे असंख्य फुफ्फुस आणि ब्राँकायटिस-संबंधित आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत.

वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात तसेच यामुळे पर्यावरण व संपतीची हानी होऊ शकते. याच्यामुळे वातावरणातील (पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वातावरणात) संरक्षक ओझोन थर पातळ होऊ लागला आहे (त्या थराचे घनत्व कमी झाले आहे) परिणामी हवामानात बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत. वाळवंटातील धुळीची वादळे व जंगलातील आगीचा धूर तसेच गवतास लागणारी आग हे सर्व देखील वायू प्रदूषणाच्या रासायनिक व विशेष प्रदूषणात आपला वाटा उचलतात.

जमीन प्रदूषण

औद्योगिक आणि घरगुती कचरा जो पाण्यात टाकला जात नाही तो जमिनीवर टाकला जातो. त्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्याचे अनेक प्रयत्न झाले असले तरी त्यात फारशी प्रगती झालेली नाही. या प्रकारच्या जमिनीच्या प्रदूषणामुळे डास, माश्या आणि इतर कीटकांची वाढ होते, ज्यामुळे मानव आणि इतर सजीवांमध्ये रोग पसरतात.

प्रकाश प्रदूषण

प्रकाश प्रदूषण एखाद्या क्षेत्राच्या अत्यधिक आणि जास्त प्रकाश उत्पादनामुळे होते. महानगरांमध्ये प्रकाश स्रोतांच्या अतिवापरामुळे प्रकाश प्रदूषण होते. गरज नसताना जास्त प्रकाश निर्माण करणाऱ्या गोष्टींमुळे प्रकाश प्रदूषण वाढते.

किरणोत्सर्गी प्रदूषण

"रेडिओएक्टिव्ह प्रदूषण" हा शब्द वातावरणात अनिष्ट किरणोत्सर्गी पदार्थामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचे वर्णन करतो. स्फोट आणि शस्त्रांची चाचणी, तसेच खाणकाम, इतर गोष्टींबरोबरच, किरणोत्सर्गी प्रदूषण निर्माण करते. याव्यतिरिक्त, अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे उत्पादित होणारी टाकाऊ सामग्री देखील किरणोत्सर्गी प्रदूषणात वाढ करण्यास कारणीभूत ठरते.

धर्मल प्रदूषण

औष्णिक प्रदूषणामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे पाण्याचा शीतलक म्हणून असंख्य क्षेत्रामध्ये वापर जलीय जीवांना पाण्याचे तापमान बदलणे आणि परिणामी ऑक्सिजनची कमतरता यासारख्या समस्यांना तोड दयावे लागते.

दृश्य प्रदूषण

होर्डिंग, अँटेना, डस्टबिन, विजेचे खांब, टॉवर, तारा, मोटारगाड्या, बहुमजली इमारती आणि इतर मानवनिर्मित गोष्टीमुळे दृश्य प्रदूषण होऊ शकते.

Levels of nioise pollution (ध्वनी प्रदुषणाची पातळी )

आवाजाची तीव्रता डेसिवेल (डीवी) या एककात मोजली जाते. दूरध्वनीचा शोध लावणारे अमेरिकन वैज्ञानिक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या स्मरणार्थ ध्वनीच्या तीव्रता पातळीच्या एककाला वेल यांचे नाव दिले गेले आहे.. डेसिवल हे घातांकित एकक असून दर १० डीबी आवाजाची तीव्रता दसपटीने वाढते. उदा. २० डीबी आवाज १० डीबीच्या आवाजापेक्षा १० पट असतो तर ३० डीवीचा आवाज १० डीबी आवाजाच्या १०० पट असतो. साधारणतः ८० डीवीपर्यंतचा आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्‌या आवाजाचा त्रास होतो. विनाने व रॉकटे याचा आवाज १००-१८० डीवीएवढा तीव्र असतो. तसेच बांधकाम, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आवाजाची पातळी १२० डीबीपेक्षा जास्त असते. गडगडाटी वादळे, जोराचा वारा, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आवाजाची तीव्रता वाढते. मात्र या घटना क्वचितच घडतात. शहरी भागात अनेक मानवनिर्मित कृतीमुळे ध्वनी प्रदूषण होते. ज्या... घरातील दूरदर्शन संच, मिश्रक (मिक्सर), विविध प्रकारचे कारखाने, वाहने, बांधकाम इत्यादी.

ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो, ध्वतीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात. तसंच लक्ष विचलित होते, चिडचिड होते, कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो. आपल्याकडील बसचालकांना ते चालवीत असलेल्या आणि अन्य वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण अनेक वर्षे सहन करावे लागते. त्यामुळे अशा चालकाना बहिरेपणा आल्याची अनेक उदाहरणे आहेत. बाटलेल्या ध्वनीच्या

जीवतेमुळे अन्न मिळविण्याच्या पट्पतीत बदल झाल्यामुळे काही पाण्यांचा मृत्यू होऊ शकतो, प्रजननक्षमता व दिशा ओळखण्याच्या क्षमता याच्यात बदल झाल्यामुळे ते कायमचे बहिरे होतात.

ध्वनीची पातळी वाढत राहिल्यास त्या भागातील प्राणी अधिवासाची जागा बदलतात, असे आढळून आले आहे की, काही पक्षी दिवसाऐवजी रात्री गातात; कारण यावेळी परिसर शांत असतो आणि त्यांचा आवाज जोडीदारापर्यंत पोहोचू शकतो. वाढत्या नागरीकरणामुळे ध्वनी प्रदूषणातदेखील वाढ होत असते. रस्त्यावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल करून, जड वाहनावर मर्यादा घालून किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते. विमानांमुळे निर्माण होणारा ध्वनी सुधारित एंजिने बदलून तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो. तसेच दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून गाणी ऐकताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, गरज असेल तरच हॉर्नचा वापर करुन व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते.

hazards of noise pollution ( ध्वनी प्रदूषणाचे धोके)

ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. कारखान्यांत मोठ्‌या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो, म्हणजेच ध्वनिप्रदूषणामुळे हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. सणासुदीमध्ये स्पीकरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. विमानतळाजवळ असलेल्या घरांच्या भिंतींना विमानाच्या आवाजाने तडे पडतात. ध्वनिप्रदूषणाचा जनावरांवरसुद्धा हानिकारक प्रभाव पडतो. सैन्याच्या पाणबुडीत वापरल्या जाणाऱ्या सोनार (sonar) या ध्वनिलहरींमुळे व्हेल ह्या प्रजातीच्या काही जातींचे मासे मृत्युमुखी पडतात. आवाज व ध्वनिच्या तीव्रतेचे आरोग्य समस्यांमध्ये रोजच वाढतंय. एका आरोग्य सर्वे नुसार अधिक ध्वनिच्या ठिकाणी काम करणारी माणसे चिडचिड असतात. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब सुद्धा वाढतो. डोकेदुखी वाढते. बहिरेपणा येऊन कानाचे आजार देखील होतात. प्रमाणापेश्या जास्त ध्वनिमुळे “निरोसिस 'होतो. आज मुंबई है जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनले आहे.

Measures and Control of noise pollution (ध्वनी प्रदूषण वरील उपाय व नियंत्रण )

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय
  1. ध्वनी प्रदूषण बंद करा.
  2. आपल्या टीव्ही संगीत प्रणाली इ.चा आवाज कमी ठेवा.
  3. गरज नसताना गाडीचा होने वाजवू नका.
  4. लाउडस्पिकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करा.
  5. लग्न समारंभामध्ये बैंड, फटाक्यांचा वापर टाळा.
  6. ध्वनी प्रदूषण संबंधित सर्व कायद्यांची माहिती करून घ्या.
  7. अनावश्यक वाहनांचे हॉर्न वाजवणे थांबवणे.
  8. दवाखाना शाळा महाविद्यालय येथे कमीत कमी वाहनांचा हॉर्न वाजवणे. 
  9. रुग्णवाहिका अग्निशामक दलाच्या गाड्या यांच्या सायरनचा आवाज थोडा कमी करणे.
  10. उत्सव सण साजरा करताना कमीत कमी आवाजात वाद्य वाजतील याची काळजी घेणे.
  11. फटाक्यांचा वापर शक्यतो टाळणे किंवा कमीत कमी करणे.
  12. लहान मुले व वृद्ध व्यक्ती असतील तर टेलिव्हिजन संच रेडिओ यांचा आवाज कमीत कमी ठेवणे.
  13. सामुदायिक ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळणे.

Air Pollution (वायू प्रदूषण)

हवा हा पृथ्वीवरील जीवनाचा एक आवश्यक घटक आहे. सजीव प्राणी आणि प्राणी यापासून प्राणवायू प्राप्त करतात, जो जीवनाचा स्त्रोत आहे आणि वनस्पतींना यापासून कार्बन-डाय-ऑक्साइड मिळतो, ज्यामुळे त्यांचे पोषण होते. वातावरण एक घोंगडी म्हणून काम करते, तापमान खूप गरम किंवा खूप थंड होण्यापासून ठेवते. वातावरण अतिनील किरणांपासून मानवांचे रक्षण करते आणि उल्कापिंडांना जाळून नष्ट करते. खरं तर वातावरणात असलेल्या वायूंतर चाय प्रभावामुळे (नैसर्गिक किंवा मानवी) वायू प्रदूषण होते. आपल्या ग्रहाचे वातावरण ऑक्सिजनसह अनेक वायूंनी बनलेले आहे, जे मानव आणि इतर जिवंत प्रजार्तीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. हे वातावरणातील CO2 च्या एकूण प्रमाणाच्या २४% इतके आहे. तथापि, जसजसे पृथ्वी बदलते, उपलब्ध ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि अनेक प्रकारचे घातक वायू त्यात विरघळतात. स्वच्छ हवेतील रसायने, कण, धूळ, विषारी वायू, सेंद्रिय पदार्थ, कार्बन डायऑक्साइड आणि इतर प्रदूषकांमुळे वायू प्रदूषण होते..

(Indoor pollution) घरातील वायू प्रदूषण म्हणजे काय ?

तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा फक्त घरी असाल. आम्ही आमचा 90% पेक्षा जास्त वेळ घरात घालवतो. आणि आम्ही अनेकदा घराबाहेरील वायू प्रदूषणावर लक्ष केंद्रित करत असताना आम्ही घरामध्ये श्वास घेत असलेल्या हवेच्या गुणवत्तेचा क्वचितच विचार करतो. घरातील वायू प्रदूषण म्हणजे धूळ, घाण आणि इतर प्रदूषकांमुळे इमारतीमधील हवेच्या गुणवत्तेचे प्रदूषण हे कण पदार्थ आणि वायूंमध्ये मोडलेले आहे. पार्टिकल मॅटर (PM) मध्ये हवेतील काजळी आणि धूळ असते. वायूंमध्ये कार्बन मोनो ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड ही काही उदाहरणे आहेत.

(Outdoor pollution) घराबाहेरील वायू प्रदूषण म्हणजे काय ?

दुसरीकडे बाहेरील वायू प्रदूषण म्हणजे इमारतीच्या बाहेरील हवेचे प्रदूषण हे प्रामुख्याने सल्फर डायऑक्साइड ओझोन कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोकार्बन वायूंमध्ये विभागलेले आहे. बाहेरील वायू प्रदूषण प्रामुख्याने क्षेत्रावर अवलंबून कारखाने, जोदारन इंधन कार आणि बरंच काही यासारख्या विविध स्त्रोतांमधून उत्सर्जनाचा परिणाम आहे.

घरातील विरुद्ध बाहेरील वायू प्रदूषणाचे स्रोत विविध रूपे घेऊ शकतात. काही स्त्रोत नैसर्गिकरित्या उद्भवतात, तर काही मानवनिर्मित असतात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रत्येक स्त्रोताची एकाग्रता शहर आणि हवामानानुसार बदलते. उष्ण हवामान, उदाहरणार्थ, या वायू प्रदूषकांचा प्रसार विवडू शकतो. असे असले तरी खाली घरातील विरुध बाहेरील वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्त्रोतांचे विघटन केले आहे..

घरातील दायू प्रदूषणाचे स्रोत

  • मूस आणि बुरशी 
  • तंबाखूचा धूर
  • घरगुती उत्पादने - विषारी वायू
  • पाळीव प्राण्यांचा कोंडा
  • बाहेरील वायू प्रदूषणाचे स्त्रोत
  • जीवाश्म इंधन
  • लॅड फिल्स
  • कारखाने
  • खाणकाम
  • वाहने
  • शेती
Light Pollution (प्रकाश प्रदुषण)

सुमारे 100 वर्षापूर्वी. रात्रीच्या वेळी, आकाशगंगेच्या नेत्रदीपक ताऱ्यांचा अनुभव घेता येत होता. पण आता जगभरात बहुतेक ठिकाणी हे शक्य नाही. रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा वाढता आणि व्यापक वापर केवळ विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनच विकृत करत नाही, तर त्याचा आपल्या पर्यावरणावर, सुरक्षिततेवर, ऊर्जा वापरावर आणि आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. प्रकाश प्रदूषण एक पर्यावरणीय समस्या आहे. आपल्यापैकी बहुतेकांना हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण माहित आहे. परंतु प्रकाशामुळे देखील प्रदूषण होऊ शकते. कृत्रि प्रकाशाच्या अयोग्य किंवा जास्त वापरामुळे मानव वन्यजीव आणि आपल्या हवामानावर गंभीर पर्यावरणीय परिणाम होऊ शकतो.

प्रकाश प्रदूषण हा औद्योगिक सभ्यतेचा दुष्परिणाम आहे. प्रकाश प्रदूषण म्हणजे रात्रीच्या वेळी वातावरणात मानववंशीय कृत्रिम प्रकाशाची निर्मिती होय, हे जास्त प्रमाणात चुकीच्या पद्धतीने विकसित करणे. यामध्ये जाहिराती, कारखाने, व्यावसायिक मालमत्ता, पथदिवे, कार्यक्रम अंतर्गत आणि बाह्य दोन्ही घटकांचा समावेश आहे. या सर्व कामाची गरज पाहता विजेचा वापर अपेक्षेपेक्षा जास्त झाला आहे. रात्री वापरली जाणारी बरीच बाह्य प्रकाशयोजना अकार्यक्षम, अती तेजस्वी, खराब लक्ष्यित अयोग्यरित्या संरक्षित आणि बर्याच बाबतीत पूर्णपणे अनावश्यक असते.

प्रकाश प्रदूषणाचे परिणाम

पृथ्वीवरील जीवनासाठी सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाश आणि अंधाराचा एक स्तर उपस्थित असतो, जो अब्जावधी वर्षापासून अस्तित्वात आहे. परंतु मानवनिर्मित कृत्रिम दिवे रात्रीच्या वेळी आपल्या शहरांना उजळ करतात, नैसर्गिक दिवस-रात्रीच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणतात आणि आपल्या पर्यावरणाचा नाजूक संतुलन बदलतात. प्रकाश प्रदूषण विशेषतः पर्यावरणीय प्रणालीमध्ये व्यत्यय आणण्याचे कार्य करते, जे वन्यजीवांसाठी गंभीर धोका आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरशास्त्रावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्याचे परिणाम वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरविज्ञानावर नकारात्मक परिणाम होतात. प्राण्यांच्या स्थलांतरित पद्धतींमध्ये गोंधळ, प्राण्यांच्या स्पर्धात्मक परस्परसंवादातील बदल, शिकार संबंधांमधील बदल आणि शारीरिक गैरसोय यांचा समावेश होतो. पृथ्वी स्कायग्लोचा बळी आहे. स्कायग्लो हा रात्रीच्या आकाशाचा पसरलेला प्रकाश आहे. जो प्रकाश चंद्र आणि तारे प्रकाश स्रोतांशिवाय तयार होतो तो प्रकाश प्रदूषणाचा हा एक सामान्यपणे पाहिला जाणारा पैलू आहे.

मानवी आरोग्यावर काय परिणाम

आरोग्याच्या प्रतिकूल परिणामांच्या संदर्भात अनेक प्रजाती, विशेषतः मानव, नैसर्गिक शरीर चक्रांवर अवलंबून आहे. कृत्रिम प्रकाशाच्या प्रसाराचा अर्थ असा आहे की आपल्यापैकी बहुतेकांना यापुढे खरोखर गडद रात्रीचा अनुभव येत नाही आणि त्याचा मानवी शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. जर मनुष्य झोपेत असताना प्रकाशाच्या संपर्कात आला तर मेलाटोनिनचे उत्पादन दडपले जाऊ शकते. यामुळे झोपेचे विकार आणि इतर आरोग्य समस्या जसे की डोकेदुखी, थकवा, वैद्यकीयदृष्ट्‌या परिभाषित तणाव, झोपेची कमतरता आणि वाढलेली चिंता ज्यामुळे लठ्ठपणासारखे आजार होऊ शकतात. काही लक्षणांमध्ये मधुमेह आणि कर्करोग यांचा समावेश होतो, ज्यामुळे धोका वाढू शकतो.