१) नलिकायुक्त ग्रंथी (Exocrine glands) या ग्रंथींपासून निघणारा रस किंवा स्त्राव नलिकांवाटे विशिष्ट इंद्रियांकडे पोहोचवला जातो.
उदा. यकृत, लाळग्रंथी
२) नलिकाविरहित ग्रंथी (endorine glands) या ग्रंथींना स्त्राव वाहून नेण्यासाठी नलिका नसतात. या ग्रंथींच्या स्त्रावाला अंतःस्त्राव म्हणतात व त्यातील विशिष्ट रासायनिक संप्रेरकाला हॉर्मोन (hormone) म्हणतात. हे संप्रेरक ग्रंथीपासून रक्तावाटे निरनिराळ्या इंद्रियांकडे जातात व आपले कार्य करतात उदा. स्वादुपिंडातून स्त्रवणारा इन्सूलिन संप्रेरक
नलिकाविरहित ग्रंथीची कार्य
- वेगवेगळ्या अंतस्त्रावामुळे शरीराची वाढ व पोषण चांगले होते.
- स्नायू, रक्तवाहिन्या व इंद्रिये आपले कार्य चांगले करतात.
- पुरुषत्व व स्त्रीत्व व त्याला साजेसे गुण प्राप्त होतात.
- चयापचय क्रियेवर नियंत्रण राखले जाते.
नलिका विरहित ग्रंथींची नावे
- पियूषिका ग्रंथी (pituitary gland)
- अवटु ग्रंवी किंवा कंठस्थ ग्रंथी (Thyroid gland)
- उरोधिष्ठ ग्रंथी (thymus gland)
- पराअवटु ग्रंथी किंवा सहकंठस्थ ग्रंथी ((Parathyroid gland)
- अधिवृक्क ग्रंथी ( adrenal gland)
- स्वादुपिंड (pancreas)
- पाइनी पिंड (Pineal body)
- डिंब ग्रंथी (ovaries)
- वृषण (Testes)
पियूषिका ग्रंथी (Pituitary gland)
ही ग्रंथी डोक्याच्या कवटीच्या आत अश्वश्चेनकाच्या किंवा हायपोथॅलॅमसच्या (hypothalamus) खालच्या बाजूस असते. ही आकाराने वाटाण्यापेक्षा थोडी मोठी असते व लांबट असते.
या ग्रंथीचे दोन खंड (lobes) आहेत.
- अग्र पियूषिका ग्रंथी (Anterior pituitary gland)
- पश्च पियूषिका ग्रंथी (Posterior pituitary gland)
अग्र पियूषिका ग्रंथी अधश्चेतकाला अधश्चेतक - पियूषिका 'प्रतिहारी शीरेने ( Portalvein) जोडलेली असते.
पश्च पियूषिका ग्रंथी अधश्चेतकाशी अधश्चेतक पियूषिका मज्जातंतूंची (hypothalamo hypophyseal nervous tract) जोडलेली आहे.
अग्र पियूषिका ग्रंथी
ही ग्रंथी बहुतेक सर्व नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवते म्हणून तिला नलिकाविरहित ग्रंथींचा राजा (Master endocrine gland) म्हणतात. या ग्रंथींपासून खालील हॉर्मोन्स स्त्रवतात.
- ग्रोथ हॉर्मोन (growth hormone)
- थायरोट्रोफिक हॉर्मोन (Thyrotrophic hormone)
- ॲड्रिनोकॉर्टिकोट्रोफिक हॉर्मोन (Adrenocortico trophic hormone)
- गोनॅडोट्रोफिक हार्मोन्स (gondadotrophic hormone) ही तीन प्रकारची आहेत.
- फॉलिक्यूलर स्टिमयुलेरिंग हार्मोन (folliculor stimulatiory hormone - FSH)
- ल्युटिनायजिंग हार्मोन (leutinizing hormone - LH)
- लॅक्टोजेनिक हार्मोन (lactogenic hormone LTH
१) ग्रोथ हार्मोन (growth hormone) यामुळे शरिराची सर्व तऱ्हेची वाढ होते.
लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असला तर मूल उंच वाढते शरीर मोठे व बेडौल दिसते.
उंची ८ ते ९ फूट होते अशा मुलाला जाएंट (Glant) म्हणतात.
मोठ्या माणसांमध्ये हे हॉर्मोन जास्त प्रमाणात असल्यास हनुवटी लांब वाढते. चेहरा रुंद दिसतो यात हाताची, पायाची व बोटांची हाडे जाड होतात. व तोंड गोरिला माकडासारखे दिसते. याला ॲक्रोमेगॅली (acromegaly ) म्हणतात.
लहान मुलात हॉर्मोन कमी प्रमाणात असेल तर मुलाची शारिरिक वाढ नीट होत नाही. मूल बुटके रहाते परंतु शरिरातील वेगवेगळे अवयवांचे आकार प्रमाणात असतात. मुलाच्या मेंदूची वाढ बरोबर होते.
याला डवार्फिअम ( dwarfism) म्हणतात. व मुलाला डवार्फ (dwari) म्हणतात.
२) थायरोट्रोफिक हार्मोन (Thyrotrophic hormone) - यामुळे पियूषिका ग्रंथी कं - ग्रंथीच्या हार्मोनवर (थायरॉक्सिनवर) नियंत्रण ठेवते.
(३) ॲड्रिनोकॉर्टिको ट्रोफिक हार्मोन (ACTH) यामुळे पियूषिका ग्रंथी अधिवृक ग्रंथीच्या स्त्रावावर नियंत्रण ठेवते.
(४) गोनॅडोट्रोफिक हार्मोन्स - यांमुळे प्रजोत्पादक ग्रंथींची वाढ व पोषण होते. तसेच स्त्रीमध्ये स्तनात निर्माण होणाऱ्या दुधाच्या प्रमाणावर नियंत्रण रहाते.
पश्च पियूषिका ग्रंथी (Post pituitary gland) यामध्ये दोन प्रकारची हार्मोन्स साठवले जातात. ही हार्मोन्स खरे म्हणजे अधश्चेनकामध्ये (Hypothalamus) तयार होतात व पश्च पियूषिकेमध्ये साठवली जातात. व येथून ती जरुरीप्रमाणे रक्तात मिसळतात.
१) मूत्रलरोधी हॉर्मोन ( Antidiuretic hormone - ADH )
२) शीघ्रप्रसवी हॉर्मोन ( oxytocin )
मूत्रलरोधी हॉर्मोन (ADH) - हे शरिरातील पाण्याचे प्रमाण कायम राखते. लघवीवाटे किती पाणी शरिराबाहेर टाकायचे याचे हे हॉर्मोन नियंत्रण करते. जेव्हा शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा रक्तामधील या हार्मोनचे प्रमाण वाढते व त्यामुळे मूत्रपिंडातील मूत्रनलिकांतून जास्त प्रमाण शोषले जाऊन लघवी संहत (concentrated) होते. व शरिरातील पाण्याचे प्रमाण नेहमीइतके होते.
जर शरिरातील पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर हे हॉर्मोन कमी प्रमाणात स्त्रवते त्यामुळे याचे रक्तातील प्रमाण कमी होते मूत्रपिंडातील मूत्रनलिकांमधून पाणी कमी प्रमाणात शोषले जाते व लघवीवाटे पाणी जास्त प्रमाणात शरिराबाहेर जाऊ दिले जाते. व शरिरातील पाण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणेच होते.
अशा रीतिने हे हॉर्मोन शरिरातील पाण्याचे प्रमाण कायम राखते.
काही कारणाने हॉर्मोन शरिरात कमी असेल तर लघवी जास्त प्रमाणात व पातळ होते या रोगाला डायबिटिस इन्सिपिडस (diabates incipidus) म्हणतात.
शीघ्रप्रसवी हॉर्मोन (Oxytocin)
१) यामुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे प्रसूति लवकर होण्यास यांची मदत होते.
२) यामुळे रक्तवाहिन्यांचे स्नायू आकुंचन पावतात व रक्तदाब वाढतो.
३) स्तनातील स्नायू अभिस्तर (myoepinclial cells) पेशी आकुंचन पावतात व दूध बाहेर येण्यास मदत होते.
कंठस्थ (अवटु) ग्रंथी (Thyroid gland) ही ग्रंथी स्वरयंत्राला लागून गळ्यात पुढच्या बाजूला असते. हिचे दोन मुख्य उभट भाग (lobes) असतात. हे एका आडव्या भागाने म्हणजे इस्थमसने (isthmus) जोडलेले असतात. या ग्रंथीला रक्ताचा भरपूर पुरवठा असतो. या ग्रंथीमध्ये थायरॉक्सिन (thyroxine) हे हॉर्मोन तयार होते. या हार्मोनमध्ये ६५% आयोडिन असते. जेवणात थोड्या प्रमाणात आयोडिन असते तरीसुद्धा ते यासाठी पुरेसे होते. थायरॉक्सिनेचे नियंत्रण पियुषिका ग्रंथीच्या थायरोट्रोफिक हार्मोन मुळे होते.
थापराक्सिनचे कार्य - हे पेशींच्या चयापचय (metabolism) क्रियेवर नियंत्रण ठेवते म्हणून लहान मुलांमध्ये योग्य वाढीसाठी याची आवश्यकता असते. मुलाच्या शारिरिक व बौद्धिक दोन्हीच्या वाढी थायरॉक्सिनची आवश्यकता आहे.
लहानपणी हे हॉर्मोन कमी प्रमाणात असेल तर क्रेटिनिझम (cretinism नावाचा रोग होतो. यात मुलाची शारिरिक व बौद्धिक वाढ खुंटते.
मोठ्या माणसात थायरॉक्सिन कमी प्रमाणात असले तर मिक्सिडिमा (myxedema) होतो. यातचयापचय क्रिया मंदावते मनुष्य अगदी सावकाश हालचाली करतो. सावकाश बोलतो व माणसाला लठ्ठपणा येतो.
थायरोक्सिनचे प्रमाण वाढले तर चयापचयाची क्रिया वाढते, भूक वाढते, वजन कमी होते, थंड वातावरणात बरे वाटते, उन्हाळा सहन होत नाही. डोळे पुढे आल्यासारखे दिसतात. (exophtholmos) व वटारल्यासारखे दिसतात. झोप लागत नाही मनुष्य अस्थिर बनतो." सहकंठस्थ ग्रंथी (Parathyroid gland) या छोट्या छोट्या चार ग्रंथी कंठस्थ ग्रंथीच्या मागच्या बाजूला असतात. परंतू त्यांचे कार्य मात्र कंठस्थ ग्रंथींपेक्षा खूप वेगळे आहे व यातून परथॉमन (Parathormone) हे हार्मोन स्त्रवते यामुळे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कायम राखले जाते. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कायम राखणे हे फार महत्वाचे आहे. कारण हे प्रमाण कमी झाले तर टिटॅनी (tatany) नावाचा रोग होतो. यामध्ये स्नायू मधूनच आकुंचन पावतात, हातामध्ये विशिष्ट प्रकारचे स्नायू आकुंचित पावून हाताचा एक विशिष्ट आकार दिसतो याला कार्पो पेडल झ _ (carpo pedal spasm) म्हणतात. जर पॅरथॉर्मोनचे रक्तातील प्रमाण कमी असेल तर रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हा रोग होतो. हा रोग प्राणघातकही होऊ शकतो.
पथॉर्मोनचे प्रमाण रक्तात जास्त झाल्यास रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. यासाठी हाडे पोखरली जातात व त्यातील शक्ति कमी होऊन ती चटकन मोडतात. तसेच कॉल्शयमचे दगड (stones) मूत्रपिंडात तयार होतात.
अधिवृक्क ग्रंथी (Adrenal gland)
या ग्रंथी प्रत्येक मूत्रपिंडावर (Kidney) एक अशा असतात. या ग्रंथीचे दोन भाग असतात.
१) कॉर्टेक्स- ग्रंथीच्या बाहेरील भाग.
२) मेड्यूला - ग्रंथीच्या आतील भाग.
(१) कॉर्टेक्स - या भागापासून तीन प्रकारची हॉर्मोन्स स्त्रवतात.
- मिनरलोकॉर्टिकॉईड (Moneralocortocoid)
- ग्लूकोकॉर्टिकॉईड (gluco corticoid)
- लैगिक हार्मोन्स (sex hormones)
मिनरलोकॉटिकाईडस् - या गटातील सर्वात महत्वाचे हॉर्मोन म्हणजे अल्डोस्टेरॉन (aldosterone). यामुळे सोडियम व क्लोराईड यांचे (Na & cl) मूत्रपिंडातील मूत्रनलिकांमधून शरिरात शोषण होते व पोटॅशियम (K) शरिरातून उत्सर्जित होते. या हार्मोनमुळे शरिरातील सोडियम, क्लोराइड, पोटॅशियम वगैरे क्षारांचे प्रमाण कायम राखले जाते.
ग्लूकोकॉर्टिकॉईड - या गटातील कॉर्टिसॉल (Cortisol) हे महत्वाचे हॉर्मोन आहे यामुळे रक्तातील ग्लुकोजचे (glucose) प्रमाण वाढते. शरिरातील पेशी ग्लुकोजऐवजी उर्जेसाठी मेद आम्ले (fatty. acids) वापरतात त्यामुळे ग्लुकोजचा वापर कमी होतो व तिचे रक्तातील प्रमाण वाढते. हॉर्मोनमुळे अमिनो आम्लांचे रुपांतर ग्लुकोज साखरेत होते. त्यामुळेही रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते.
या हॉर्मोनमुळे प्रदाह (Inflamonatism) रोखला जातो व जखम लवकर बरी होत नाही.
लैंगिक हॉर्मोन्स - ही अगदी थोड्या प्रमाणात असतात, त्यामुळे शारिरीक व्यंगानुसार दुसऱ्या दर्जाच्या अवयवांची (secondary sex organs) वाढ होते.
(२) मेड्यूला ( medulla) यापासून ॲड्रनॅलिन (adrenalin) व नॉरॲड्रिनॅलिन (nor adrenaline) ही हार्मोन्स स्त्रवतात. अनुकंपी संस्था (sympathatic system) उद्दीपित (stimulate) केल्यामुळे जे परिणाम होतात तेच परिणाम या हॉर्मोन्समुळे होतात. शरिरावर जेव्हा प्रताण (stress) पडतो तेव्हा या हॉर्मोन्सचा उपयोग होतो. अशा वेळी या हॉर्मोन्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यकृतातील ग्लायकोजेनचे रुपांतर साखरेत होते. या साखरेचा शरिराला 'प्रताणामध्ये (stress) उपयोग होतो.
नॉरऍड्रिनॅलिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो.
स्वादुपिंड (Pancreas)
यामधील आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स (Islets of Langerhans) हा पेशींचा समूह नलिकाविरहित ग्रंथी म्हणून काम करतो. यात दोन प्रकारच्या पेशी असतात. अल्फा (alpha) व बीटा (Beta) अल्फा पेशींपासून ग्लूकॅगॉन (Glucagon) व बीटा पेशींपासून इन्सूलिन ही हॉर्मोन्स तयार होतात. यातील इन्सुलिन पेशींना मंद ज्वलनासाठी उर्जेसाठी ग्लुकोज साखरेचा वापर करण्यास उद्युक्त करते त्यामुळे रक्तातील साखरेचा वापर होऊन तिचे रक्तातील प्रमाण कमी होते. इन्सूलिनचे प्रमाण शरीरार कमी असले तर मधुमेह (Diabetes) नावाचा रोग होतो. पेशींकडून उर्जेसाठी साखर योग्यपणे वापरली जात नाही व रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी लघवीवाटे साखर उत्सर्जित केली जाते. लघवी जास्त वेळा होणे, खूप तहान व भूक लागणे, थकवा येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
ग्लुकगॉन या हॉर्मोनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते कारण यामुळे यकृतातील ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोज साखरेत होऊन ती रक्तात मिसळते.
उरोधिष्ठ ग्रंथी (Thymus gland)
ही ग्रंथी छातीच्या पोकळीत असते. जन्माच्यावेळी ती लहान असते. मूल जेव्हा वयात येते (puberty) तेव्हा या ग्रंथीचा आकार वाढतो. मग तो पुन्हा कमी होतो. या ग्रंथीचे कार्य नक्की काय आहे ते अजून माहिती नाही. पण बहुतेक शरीरातील प्रतीद्रव्ये (Antibodies) वाढण्यासाठी या ग्रंथीच्या हॉर्मोनचा उपयोग होतो.
पाइनी पिंड (Pineal body)
ही ग्रंथी मेंदूच्या कॉर्पस् कॅलोझम (corpus callosum ) या भागाजवळ असते हिचे कार्य अजून नीट माहिती नाही.
या हॉर्मोन्सपैकी पीयूषिका ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथीचा मेड्यूला भाग, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स यांची हॉर्मोन्स तोंडाने घेतल्यास त्यांचे पचन होऊन ती नष्ट होतात. म्हणून ही नेहमी स्नायूत इंजेक्शनच्या •मार्फत द्यावी लागतात.
कंठस्थ ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथीचा कॉर्टेक्स यांपासून तयार होणारी हॉर्मोन्स तोंडाने घेता येतात.
प्रश्न
१) नलिकाविरहित ग्रंथींची नावे लिहा.
(२) पियूषिका ग्रंथीतून निघणाऱ्या हॉर्मोन्सची नावे व कार्ये सांगा.
३) टीपा लिहा.
अ) क्रेटिनिझम
ब) टिटॅनी
क) मिनरलोकॉर्टीकॉईड
ड) मधुमेह

