स्नायूंचा अभ्यास म्हणजे मायॉलॉजी (Myology) होय. बहुधा स्नायू हाडाला किंवा कूर्चांना चिकटलेले असतात. काही स्नायू अस्थिरज्जूंच्या मार्फत त्वचेला जोडलेले असतात हे स्नायू विशेषतः गाई म्हशींमध्ये असतात. व यामुळे त्या आपली त्वचा हलवू शकतात.
धडाचे स्नायू रुंद व सपाट असतात तर हातापायाचे स्नायू लांब असतात. स्नायूंना वेगवेगळ्या प्रकारे नावे दिली जातात
उदा :
- त्यांच्या आकारावरून उदा. डेल्टाईड स्नायू (Deltoid muscle )
- त्यांच्या स्थानानुसार उदा. पेक्टोरॅलिस मेजर (Pectoralis Major)
- त्यांच्या कामावरुन उदा. आनमनी स्नायू (flexor muscles)
स्नायूंचे वर्गीकरण त्यांच्या तंतूवरुन (fiber) करतात.
१) युनिपिनेट (Unipinnate) - ज्यात स्नायूंत तंतूंची रचना एकाच दिशेने केलेली असते. बहुधा आनमनी (Flexor) स्नायू असे असतात.
२) बायपिनेट (Bipinnate) - या स्नायूत तंतूंची रचना दोन दिशेनी असते. उदा. पॉलिसिस लौंगस (Pollicis longus) स्नायू
३) मल्टीपिनेट (Multipinnate) - या स्नायूंमध्ये तंतूंची रचना अनेक दिशांना झालेली असते. उदा. डेल्टॉईड स्नायू (Deltoid muscle )
बहुधा स्नायू दोन ठिकाणी हाडाला जोडलेले असतात. त्यातील एक न हालणारे (fixed) असते व दुसरे हालू शकणारे असते. बहुधा जे न हालणारे ठिकाण असते त्याला स्नायूंचे ओरिजिन (Origin) म्हणतात व ज्या ठिकाणी स्नायू हलू शकतो त्याला स्नायूंचे इन्सर्शन (Insersion) म्हणतात. परंतू या संज्ञा हल्ली विशेष वापरत नाहीत. पण आपण फक्त स्नायूंची टाच (Muscle attachment) असे म्हणतो.
ऐैच्छिक स्नायू बहुधा एका वेळी एक स्नायू नाही तर अनेक स्नायू गटामध्ये आकुंचन पावल्यामुळे ठराविक हालचाल होते. काही स्नायूंच्या हालचाली स्नायूंच्या दुसऱ्या गटाच्या बरोबर विरुद्ध बाजूला असतात. अशा या विरुद्ध हालचाली करणाऱ्या स्नायूंच्या गटाला एकमेकांचे अँटॅगोनिस्ट (Antagonist) म्हणतात.
उदा. १) आमनमी व प्रसारण स्नायू (Flexor and extensor muscles)
२) अभिवर्तनी व अपवर्तनी स्नायू (Adductor & Abductor muscles)
फिक्सेटर स्नायू (Fixator muscles) हे स्नायू हाताच्या किंवा पायाच्या एक भागाच्या हालचाली सुरु असताना दुसऱ्या भागांना स्थिर (Stabilise) करतात.
सिनर्जिस्टिक स्नायू (Synergistic muscles) हे स्नायू एका सांध्याला स्थिर करतात व त्यामुळे दुसरे स्नायू दुसऱ्या सांध्यामध्ये हालचाली करु शकतात. उदा. जेव्हा प्रसारणी स्नायू (extensors) मनगटाचे प्रसारण (extension) करतात तेव्हा लांब आनमनी (long flexors) स्नायू बोटे जास्त चांगल्या प्रकारे दुमडू (flex) शकतात.
प्राइम मूव्हर्स (Prime movers) जे स्नायू कुठल्याही हालचालींची सुरवात करतात त्यांना प्राइम मूव्हर्स म्हणतात. उदा. कोपरात हात दुमडणारा ब्रेकिॲलिस (Brachialis) स्नायू.
बायसेप्स व ट्रायसेप्स स्नायू
अस्थिबंधन किंवा कंडरा (Tendon) याच्यामुळे स्नायू हाडाला जोडला जातो. हे पांढरे चकाकणारे फायब्रस, (fibrous ) बंधन (band) असतो.
ॲपोन्युरॉसिस (Aponeurosis) हे पांढरे चपटे रुंद असून तो इंद्रियांना आधार देते. उदा. रेक्टस (Rectus sheeth) शीथ उदरीय भित्तीला (Abdominal wall) आधार देते.
फेशिया (Facia) फेशियाचे पृष्ठीय (Superfitial) व गंभीर (deep) असे दोन प्रकार असतात. पृष्ठीय फेशिया त्वचेच्याजवळ असतो व गंभीर फेशिया आत असून काही आतील भागांना वेष्टतो व एकत्र करतो. याचे काम म्हणजे रक्षण करणे व हा स्नायूंच्या गटांनाही वेगवेगळे करतो.
उदा :
- प्लांटर फेशिया (Plantar facia )
- पामर फेशिया (Palmar facia)
हे दोनही फेशिया अनुक्रम पायाचे व हाताचे स्नायू बांधून ठेवतात.
रेटिनॅक्यूला (Retinacula) हा संयोगी पेशीजवळ असतो. हा स्नायूंच्या कंडारांना (Tendons) एकत्र बांधतो त्यामुळे ते छोट्या जागेत मावतात.
उदा :
- आनमनी रेटिनॅक्यूला (Flexor Retinacula)
- प्रसारण रेटिनॅक्यूला (extensor Retinacula)
डोक्याचे व चेहऱ्याचे काही स्नायू
उर्ध्वशाखेतील स्नायू यांचे वर्गीकरण खालील गटात होते :
- अंसमेखलेचे स्नायू
- बाहूचे किंवा दंडाचे स्नायू
- अग्रबाहूचे स्नायू यात आनमनी स्नायू, प्रसारण स्नायू, वगैरेंचा समावेश होतो.
- हाताचे स्नायू, तळहाताचे व पाठीमागच्या बाजूचे स्नायू
चेहऱ्याचे स्नायू - ह्या स्नायूंना फेशियल चेतनी तर्फे चेतना मिळते.
मानेचे स्नायू - १) स्टर्नेक्लिडोमॅस्टाईड स्नायू. (Sterno cledomastold muscle )
विरुद्ध दिशेला जोर दिला असता मान खाली वळवताना (Against resistance) हे दोन्ही बाजूचे स्नायू ठळकपणे दिसतात. हे वर टेम्पोरल हाडाच्या मॅस्टॉईड प्रोसेसला (Mastoid Process) जोडलेले असतात व खाली स्टर्नम (Sternum) या हाडाला जोडलेले असतात. या स्नायुमुळे मान अग्र त्रिकोण (Anterior triangle) व पश्च-त्रिकोण (posterior triangle) अशी विभागली जाते
मानेतील अग्र त्रिकोणात चपटे (Flat ) स्नायू असतात. व ते सुप्राहायॉईड (Suprahyoid) व इन्फ्राहायॅईड (Infrahyoid) अशा दोन गटात विभागले जातात.
छातीचे स्नायू
श्वासपटल ( Diaphragm ) - हा प्रश्वसनी स्नायू आहे. याच्या वर छाती व खाली उदर असते. याला मध्यभागी एक कंडरा (tendon) असतो. व याच्या भोवती स्नायूंचे तंतू असतात. हे तंतू कंडऱ्याला चिकटलेले असतात. याचा आकार घुमटासारखा असतो. उजवा व डावा असे दोन घुमटासारखे आकार असतात. डाव्या बाजूचा घुमट उजव्या बाजूकडच्या घुमटाच्या मानाने खाली असतो. कारण उजव्या बाजूला यकृत (Liver) असते.
खंद्याच्या पुढील भागाचे स्नायू
श्वासपाटलाचा खालचा भाग
पुढच्या बाजूला श्वासपटल स्टर्नम या हाडाच्या झिपीस्टर्नमला (Xiphisterm) चिकटलेला असतो. तसेच कडांना तो खालच्या फासळ्यांच्या आतील बाजूला चिकटलेला असतो. पाठीमागच्या बाजूला उजव्या बाजूला तिसऱ्या लंबर मणक्याला व डाव्या बाजूला दुसऱ्या लेबर मणक्याला जोडलेला असतो. व सगळे स्नायू तंतू सर्व बाजूंची मध्यावर असलेल्या कंडराकडे (tendon) जातात.
कार्य - १) श्वास आत घेतला असता श्वासपटल आकुंचनपावून तो घुमटाऐवजी सपाट होतो त्यामुळे छातीची उंची वाढते. व छातीच्या पोकळीचा आकार अशा रीतिने वाढतो. व त्यावेळी फुफ्फुसांचे प्रसरण (Expansion) होऊन हवा आत घेतली जाते.
उच्छवासाच्या वेळी श्वासपटलाचे प्रसरण होऊन पुन्हा घुमटाचा आकार येतो व त्यामुळे छातीच्या पोकळीची उंची कमी होते. फुफ्फुसाचे आकुंचन होऊन हवा बाहेर फेकली जाते.
अशा रीतिने श्वासपटलाच्या आकुंचन प्रसरणामुळे श्वास- उच्छ्वास या क्रिया घडतात.
२) श्वासपटलाच्या आकुंचनामुळे उदरातील आतील भागावर दाब पडून मूत्रण (Micturition) मलोत्सर्ग (defaecation) या क्रियांना मदत होते.
३) श्वासपटलाला काही भोके असतात. ती खालीलप्रमाणे-
- a) अवरोही महारोहिणी (Descending aorta) छातीच्या पोकळीतून उदर पोकळीत जाण्यासाठी
- b) निम्न महाशीर (Inferior Venacava) छातीच्या पोकळीत येण्यासाठी हे भोक उजव्या बाजूला थोरॅसिक आठच्या पातळीत असते.
- c) अन्नलिका उदरपोकळीत जाण्यासाठी. हे भोक थोरॅसिक दहाच्या पातळीत असते. व डाव्या बाजूला असे. यातून व्हेगस चेतनी (Vagus nerve) जाते.
श्वासपटलाला फ्रेनिक चेतनी (Phrenic nerve) तर्फे आज्ञा पोहोचवली जाते. श्वासपटलाच्या खाली उजव्या बाजूला यकृत असते व डाव्या बाजूला जठर (Stomach) व प्लीहा (Spleen) असते.
उदरीय स्नायू (Abdominal muscles) उदराच्या अग्र उदरीय भित्तीकेमध्ये (Anterior abdominal wall) सपाट (flat) स्नायू असतात. हे स्नायू आतील इंद्रियांचे रक्षण करतात. हे स्नायू आकुंचन पावल्याने उदरीय पोकळीत दाब निर्माण होऊन मूत्रण (Micturition) उलटी (Vomiting) मलोत्सर्ग (defaecation) या क्रियांना मदत होते.
अग्र उदरीय भित्तीकेमध्ये उदराच्या खालच्या दोन्ही बाजूला इंग्वायनल कॅनाल (Inguinal canal) तयार होतात.
इंग्वायनल कॅनाल - हा ४ सेमी लांब असतो. हा वेगवेगळ्या उदरीय भित्तीकेच्या स्नायूंमुळे बनलेला असतो. हा डीप इंग्वायनल रिंग (Deep inguinal ring) पासून सुपरफिशियल इंग्वायनल रिंग (Superfitial inguinal ring) पर्यंत असतो. हा जाताना वरुन खाली व उपमध्ध Downward & forward) बाजूकडे वळलेला असतो.
उदारीय स्नायूचा वरचा थर
उदारीय स्नायूचा मधला थर
उदारीय स्नायूचा आतील थर
डीप इंग्वायनल रिंग ही अनुप्रस्थ फेशियामध्ये असते यामध्ये पुरुषांमध्ये स्परमैटिक कॉर्ड (Spermatic cord) प्रवेश करते व सुपरफिशियल इंग्वायनल रिंगमधून बाहेर येते. ही सुपरफिशियल रिंग एक्स्टर्नल ऑब्लिक (External oblique) स्नायूमध्ये असते. बायकांमध्ये या कॅसलमधून राऊंड अस्थिरज्जू (Round ligament) जाते.
इंग्वायनल हर्निया (Inguinal hernia) काही वेळा आतडे (Intestine) या कॅनॉलमधून जाऊन पुरुषांमध्ये वृषणकोशात Scrotum) व बायकांमध्ये बृहत भगोष्ठ (labia majora) मध्ये जातात याला हर्निया म्हणतात.
जर आतडी डीप इंग्वायनल रिंगमधून सुपरफिशियल रिंगमधून बाहेर अली तर याला इन्डायरेक्ट हार्निया (Indirect hernia) म्हणतात. व जर कॅनाल मश्व भागातून जाऊन जर ती पश्च भित्तीकाही खाली ढकलली गेली तर त्याला डायरेक्ट हर्निया (Direct hernia) म्हणतात. तो अडकू शकतो. (Strangulated) अशा वेळी लगेच ऑपरेशन (Operation) करावे लागते.
अवशाखेतील स्नायू (Inferior extremity muscle) यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करतात.
(१) पश्च उदरीय भित्तीकेपासून ( Posterior abdominal wall) खाली येणारे स्नायू उदा. सोआस (Psoas) व इलियॅकस (Iliacus)
सोआस व इलिकस स्नायूंचे स्थान
२) मांडीचे स्नायू (Thigh muscles)
- आनमनी (Flexors)
- प्रसारणी (extensors)
- अभिवर्तनी (adductors)
३) पायाचे स्नायू (Leg muscles)
- आनमनी (Flexors)
- प्रसारणी (extensors)
पाठीचे स्नायू
४) पावलातील स्नायू (muscle of foot)
- a) तळपायांच्या बाजूचे (planter side)
- b) वरच्या बाजूचे (Dorsal side)
शरिररचनेतील जागा (Anatomical spaces)
काख (Axilla) ही जागा दंड व छाती यांमध्ये असते.
याच्या उपमध्य बाजूला वक्ष भित्तिका (Thoracic wall) व बाजूला ह्यूमेरस व पार्श्विक त्याला चिकटलेले स्नायू असतात.
डाव्या उर्ध्वशाखेतील पुढील बाजूचे स्नायू
उर्ध्वशाखेतील पाठीमागच्या बाजूचे स्नायू
मांडीच्या पुढील भागातील स्नायू
पायातील पुढच्या बाजूचे स्नायू
अधःशाखेच्या पाठीमागच्या बाजूचे स्नायू
काख