प्रश्न १. फरक स्पष्ट करा.
(अ) लोहमार्ग व रस्तेमार्ग.
| लोहमार्ग | रस्तेमार्ग |
|---|---|
| १. लोहमार्ग हा रस्तेमार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतूक मार्ग आहे. | १. रस्तेमार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेत कमी जलद वाहतूक मार्ग आहे. |
| २. लोहमार्गाचे जाळे हे रस्तेमार्गाच्या जाळ्याच्या तुलनेत कमी दाट आहे. | २. रस्तेमार्गांचे जाळे लोहमार्गांच्या जाळ्याच्या तुलनेत अधिक दाट आहे. |
| ३. लोहमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही. | ३. रस्तेमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. |
| ४. लोहमार्ग वरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही. | ४. रस्तेमार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते. |
(आ) वाहतूक व संदेशवहन.
| वाहतूक | संदेशवहन |
|---|---|
| १. वस्तूंची देवाणघेवाण व प्रवाशांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे-जाणे ज्या सेवेने शक्य होते, ती सेवा, म्हणजे 'वाहतूक' होय. | १. माहितीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देवाणघेवाण ज्या सेवेने शक्य होते, ती सेवा, म्हणजे 'संदेशवहन' होय. |
| २. रिक्षा, ट्रक, आगगाडी, मालगाडी, बोट, जहाज, हेलिकॉप्टर, विमान इत्यादी वाहतुकीची साधने होत. | २. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, आंतरजाल मोबाईल फोन इत्यादी संदेशवहनाची साधने होत. |
| ३. वाहतूक सेवेत वाहतूक कोंडी, अपघात, ध्वनी प्रदूषण, हवेचे प्रदूषण इत्यादी समस्या असतात. | ३. संदेशवहन सेवेत माहितीच्या ध्वनी प्रसारणातील तांत्रिक अडथळे, सायबर गुन्हे इत्यादी समस्या असतात. |
(इ) पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने.
| पारंपरिक संदेशवहनाची साधने | आधुनिक संदेशवहनाची साधने |
|---|---|
| १. प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने, म्हणजे 'पारंपरिक संदेशवहनाची साधने' होत.` | १. आधुनिक काळात वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने, म्हणजे 'आधुनिक संदेशवहनाची साधने' होत. |
| २. पत्र,वर्तमानपत्र, आकाशवाणी, दुरदर्शन इत्यादी संदेशवहनाची पारंपरिक साधने होत. | २. मोबाईल फोन, आंतरजाल इत्यादी संदेशवहनाची आधुनिक साधने होत. |
| ३. पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या साहाय्याने माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतोच, असे नाही. | १. आधुनिक काळात वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने, म्हणजे 'आधुनिक संदेशवहनाची साधने' होत. |
प्रश्न २. सविस्तर उत्तरे लिहा.
(अ) विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे.
उत्तर : (१) वर्तमानपत्रांत शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक इत्यादी बातम्या व ताज्या घडामोडी याविषयी माहिती छापली जाते.
(२) वर्तमानपत्रांद्वारे अत्यंत कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे, वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो.
(आ) टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा.
उत्तर : (१) टीव्ही या संदेशवहनाच्या साहाय्याने मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक क्रीडाविषयक इत्यादी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते.
(२) टीव्हीद्वारे अत्यंत कमी खर्चात देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे, टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे.
(इ) भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते ?
उत्तर : (१) भ्रमणध्वनीचा वापर करून प्रत्यक्षपणे संभाषण साधून शाब्दिक व तोंडी स्वरूपाचे संदेशवहन करता येते. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलिंग देखील करता येते.
(२) मेसेजच्या साहाय्याने शाब्दिक व लिखित स्वरूपाचे संदेशवहन करता येते.
(३) मोबाईलमधील विविध ॲप्सच्या साहाय्याने शाब्दिक व अशाब्दिक स्वरूपाचे संदेशवहन करता येते.
प्रश्न ३. खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.
(अ) विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे.
(१) मुंबई (२) पुणे (३) नाशिक (४) नागपूर (५) नांदेड.
(आ) टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा.
(१) संदेशवहन (२) आयुर्विमा (३) बचत सुविधा (४) बँकिंग सुविधा (५) माहितीचे संकलन इत्यादी.
(इ) तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग.
उत्तर : आमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग : NH-17.
(नोंद : विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहत असल्याचे गृहीत धरले आहे. तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्गानुसार तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.)
(ई) महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे.
(१) डहाणू (२) वसई (३) मुंबई (४) घारापुरी (५) श्रीवर्धन (६) हर्णे (७) जयगड (८) रत्नागिरी (९) मालवण (१०) वेंगुर्ले इत्यादी.
प्रश्न ४. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा.
उत्तरे :
| टपालसेवा | संदेशवहनाची पारंपरिक पद्धत | माहितीचे आदान-प्रदान |
| शिवनेर | रस्तेमार्ग | स्पीडपोस्ट |
| आंतरजाल | संगणक जोडणीच जागतिक जाळ | आरामदायी प्रवास |
| रो-रो वाहतूक | लोहमार्ग | इंधन वेळ व श्रमाची बचत |


