४. पर्यावरणीय व्यवस्थापन

Ranjit Shinde
४.पर्यावरण व्यवस्थापन इयत्ता दहावी स्वाध्याय | Paryavaran Vyavasthapan Swadhyay | paryavaran vyavasthapan 10th class

paryavaran vyavasthapan 10th class | पर्यावरण व्यवस्थापन स्वाध्याय


Q.1 खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.

नाकतोडा - साप - भातशेती - गरुड - बेडूक

उत्तर →भातशेती - नाकतोडा - बेडूक - साप - गरुड

वरील अन्नसाखळी भू-परिसंस्थेतील आहे. भू-परिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात. जसे - कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी
उदाहरणार्थ भातशेती म्हटले आहे याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी. भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते म्हणून तेथे बेडूक वास्तव्य करतात. 
वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत, प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे,  द्वितीय भक्षक बेडूक आहे, तृतीय भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे.
या प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकांवर जिवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपांतून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषण पातळीत हस्तांतरित होते.

Q.2 आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाले आहे, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर → ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली नाही त्यामुळे कोणीही पृथ्वीवर वारसा हक्क सांगू शकत नाही.
निसर्गाच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्व पूर्णपणे अवलंबून आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे कर्तव्य आहे.
नैसर्गिक संसाधनाचा अविवेकी वापर केल्याने ती नष्ट होऊ शकतात.
उसनवार घेतलेल्या मालमत्तेप्रमाणे नैसर्गिक साधनांची काळजी घेणे गरजेचे आहे कारण हा ठेवा आपल्याला पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवायचा आहे. येणाऱ्या पुढील पिढीसाठी या नैसर्गिक संसाधनाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवावर सोपवण्यात आली आहे आणि म्हणूनच आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

Q.3 टिपा लिहा.

अ. पर्यावरण संवर्धन

उत्तर →पर्यावरणाचे संरक्षण करणे, त्याची जोपासना करणे, त्याचे व्यवस्थापन करणे म्हणजेच पर्यावरण संवर्धन होय.

१) पर्यावरणातील कोणत्याही स्वरूपात संतुलन थेट जैविक घटकांच्या अस्तित्वास हानी पोहोचू शकते म्हणूनच पर्यावरण संवर्धन करणे आवश्यक आहे
२) अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पर्यावरण पूर्ण करते. पर्यावरणातील घटकातून आपली अन्नसाखळी पूर्ण होते त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.
३) पर्यावरणाची पातळी अधिक खालावू नये याकरता नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे हे पर्यावरण संवर्धनात अपेक्षित आहे.

आ. बिश्नोई चिपको आंदोलन

उत्तर → राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी हे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी नावाच्या वनस्पती वरून घेण्यात आले आहे. येथेच प्रथम बिश्नोई समाजाच्या आंदोलन झाले होते. खिचडी या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलना सारखे आंदोलन इसवी सन 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृता देवीच्या पुढाकाराने गावातील 363 मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केलेले होत. या गावात खिचडी या वनस्पतीची बरीच झाडे होती या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. 

इ. जैवविविधता

उत्तर → निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व अनुवंशिक फरक सजीवांच्या जातींचे प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था असे संपूर्ण सजीव सृष्टीमुळे त्या प्रदेशात ची जैवविविधता ठरते. ही जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसून येते.
१) आनुवंशिक विविधता : एकाच जातीतील सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजेच आनुवंशिक विविधता होय. 
उदा -  प्रत्येक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडासा वेगळा असतो.
२) प्रजातींची विविधता : निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात त्यांना प्रजातींची विविधता असे म्हणतात.
उदा - वनस्पती, प्राणि सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार.
३) परिसंस्थेची विविधता : प्रत्येक प्रदेशात आढळणारे परिसंस्थांचे वैविध्य म्हणजेच परिसंस्थेची विविधता. या परिसंस्था व वनस्पती प्राणी त्यांचे अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून निर्माण होतात. प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळे जैविक आणि अजैविक घटक असतात.

ई. देवराई

उत्तर → देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन.
हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड शिकार व क्रिया करत नाहीत. हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्यच असते. सरकारचे वन खाते देवराईचा संभाळ करीत नाही परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो.
भारताच्या केवळ पश्चिम घाटात नव्हे तर संपूर्ण भारतभर अशा तेरा हजार पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत.

उ. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन

उत्तर → १) पर्यावरणात अनेक वेळा घडून येणाऱ्या धोकादायक घटना जीविताच्या, संपत्तीच्या, तसेच पर्यावरणाच्या नुकसानीचे कारण ठरतात त्यांना आपत्ती असे म्हणतात.
उदा - महापूर, भूकंप, दुष्काळ, वादळे इत्यादी.
२) नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. 
३) आपत्तीला रोखण्यासाठी किंवा तिला तोंड देण्यासाठी सुसज्ज असणे किंवा किमान त्या आपत्तीला तोंड देण्यासाठीची क्षमता प्राप्त करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.
४) आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन भाग करता येतात.

Q.4 प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा.

उत्तर → १) प्रदूषित पदार्थाचा विपरीत परिणाम हा सर्व पर्यावरणावर होतो.
२) प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा सजीवांच्या अस्तित्वावर होतो.
३) विकसनशील देशांमध्ये प्रदूषणामुळे आरोग्य मृत्यू अपंगत्व असे दुष्परिणाम अधिक तीव्र प्रमाणात झालेले आढळून येतात.
४) प्रदूषण कमी केल्याने विषारी कचऱ्याच्या निर्मितीत घट होते त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा खर्चही वाचतो.
५) आपले पर्यावरण हे आपली सर्वांची जबाबदारी असल्यामुळे प्रदूषणावर मात करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे यामुळे मौल्यवान पर्यावरण संसाधनांचे जतन होईल आणि पर्यावरणाची गुणवत्ता वाढीस लागेल.
अशाप्रकारे प्रदूषणावर मात करणे हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे.

Q.5 पर्यावरण संवर्धना संदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल ? कसे ?

उत्तर → झाडे लावणे, पुनर्चक्रीकरणासाठी प्लास्टिक कचरा गोळा करणे, जैवविविधतेचे संवर्धन इत्यादी उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी राबवले जाऊ शकतात.

हे उपक्रम खालील प्रमाणे राबवले जाऊ शकतात.
१) झाडांचे महत्त्व लोकांना पटवून देणे आणि झाडे लावण्याचा उपक्रमात लोकांना सहभागी होण्यासाठी तयार करणे.
२) प्लास्टिकच्या वापराचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट व कचरा व्यवस्थापन याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे.
३) पर्यावरण संवर्धन ऊर्जेची आणि इतर नैसर्गिक संसाधनांची बचत याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणारी भीती पत्रके तयार करून लावणे.
४) पर्यावरण तज्ञ विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाविषयी मार्गदर्शन करतील असे परिसंवाद आयोजित करणे.

Q.6 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.

उत्तर → १) पर्यावरणावर जैविक आणि अजय घटक परिणाम करतात यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात.
२) जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात.
३) जंगल तोड औद्योगीकरण नागरिकरण अशा मानवनिर्मित आपत्ती पर्यावरणावर घातक परिणाम करतात.
४) भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो.

आ. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे ?

उत्तर → १) मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे.
२) मानवी लोकसंख्या व औद्योगीकरण यांची झपाट्याने वाढ होत असल्याकारणाने मानवाकडून नैसर्गिक संसाधनाचा अवाजवी वापर होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे.
३) अन्नसाखळीत सर्वोच्च भक्षक म्हणून सगळ्यात वरचे स्थान मानवाचे आहे त्यामुळे मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो.
४) मानवामध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याची व त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे. म्हणून निसर्गाचा समतोल साधण्यात मानव प्रमुख भूमिका बजावू शकतो.
त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते.

इ. जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.

उत्तर → जैवविविधता तीन पातळीवर दिसून येते.
१) आनुवंशिक विविधता - एकाच जातीतील सजीवांमध्ये असणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय.
उदा - प्रत्येक प्राणी किंवा माणूस एकसमान नसतो थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते.

२) प्रजातींची विविधता - निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात त्यांना प्रजातींची विविधता असे म्हणतात.
उदा - वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचे विविध प्रकार.

३) परिसंस्था विविधता - प्रत्येक प्रदेशात आढळणारे परिसंस्थाचे वैविध्य म्हणजेच परिसंस्थेची विविधता होय. या परिसंस्था वनस्पती प्राणी त्यांचे अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून निर्माण होतात. प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळे जैविक आणि अजैविक घटक असतात.

ई. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल ?

उत्तर → पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल.
१) दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे.
२) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांची निर्मिती करणे.
३) काही क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे.
४) विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.
५) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.
६) पर्यावरण विषयक कायद्यांचे पालन करणे.
७) पारंपारिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.


उ. जादव मोलाई पयंगाच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो?

उत्तर → जादव मोलाई पयांग हा तसे पहिले तर सामान्य आणि गरीब माणूस केवळ कामगार असलेल्या पयांगणा पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याचे जाण होती यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर १३६० एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्य माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे त्यांनी समाजाला दाखवून दिले अनेक माणसे मिळून संपूर्ण जंगल नष्ट करतात पण एक माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते हे, महत्त्वाचे सत्य जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपल्याला समजते.
एक माणूस एवढा मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकत असेल, तर अनेक माणसांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास क्रांति घडून येईल

ऊ. जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र सांगा.

उत्तर → जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे.
भारतातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे :
पूर्व हिमालय,  इंडो-बर्मा, पश्चिम घाट व श्रीलंका
जगातील जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे :
मदागास्कर, फिलिपिन्स, सुंदालँड, ब्राझीलचे अटलांटिक वन, कॅरिबियन आयलँड इत्यादी.

ए. प्राणी आणि वनस्पतीच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचवता येईल?

उत्तर → प्राणी आणि वनस्पतीच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे पुढील प्रमाणे :
१) नैसर्गिक कारणे - भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वणवा, महापूर, दुष्काळ इत्यादी.
२) मानवनिर्मित कारणे - शिकार करणे, वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट करणे, अति प्रमाणात होणारी जंगलतोड, अति प्रमाणातील मासेमारी, प्रदूषण तसेच औषधे, सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने इत्यादींच्या निर्मितीसाठी वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचा होणारा वापर इत्यादी.

धोक्यात असलेल्या प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजाती वाचवण्यासाठी उपाय : 
१) प्रदूषण नियंत्रण केल्यास प्राणी आणि वनस्पती वर त्यांचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल.
२) प्राणी आणि वनस्पती प्रजातींच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि त्यातील मानवी हस्तक्षेप मर्यादित करणे.
३) वन्यजीव आणि वनस्पती यांचे महत्त्व व त्यांचे संरक्षण याविषयी लोकजागृती करणे.
४) या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञ यांच्या मदतीने उपाययोजना करणे.

Q.7 खालील चिन्ह संकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.


अर्थ→ पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण
भूमिका → कचरा निर्मिती कमी होण्यासाठी पदार्थांचे पुनर्चक्रीकरण व त्यांचा पुनर्वापर करावा हा संदेश या चिन्हातून मिळतो.



अर्थ→ पाणी वाचवा
भूमिका → पाणी वाया घालवू नये, पाणी गळती तपासून पहावी, पावसाचे पाणी वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे हा संदेश या चिन्हातून मिळतो.



अर्थ→ सौर ऊर्जा
भूमिका → सौर ऊर्जेचा वापर करावा जेणेकरून अनूतनीकरणक्षम ऊर्जास्त्रोतांचा वापर कमी करून नूतनीकरणक्षम ऊर्जा वापरावी हा संदेश या चिन्हातून मिळतो.









𓇽 Best Of Luck for Your Study 𓇽



Study Storm | Ranjit Shinde